Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeललितसीमेपल्याडही वार्धक्याच्या...

सीमेपल्याडही वार्धक्याच्या…

प्रमोद मनोहर जोशी

आपल्या मनात आपल्या आजीचं एक कल्पनेतलं आदर्श असं चित्र नक्की कसं असू शकेल ते आज फेसबुकवर पाहिलेल्या या छायाचित्रात बघून वाटलं.

या आजी नेमक्या कोण? यांना मी ओळखत नाही, पण त्यांचं ते सात्विक सोज्वळ निरागस आणि सुमधुर हसू असणारं रूप बघून मला ही कविता सुचली. आपलं वार्धक्यातील रूप देखील अतिशय दिमाखात मिरवणारी एक वृद्ध स्त्री म्हणून या आजी मला जास्त भावल्या आणि अगदी आपसूकच ओळी कागदावर उतरल्या…

सीमेपल्याडही वार्धक्याच्या
अजून भासशी चिरतरुणी तू
वदनावरती प्रसन्नता अन्
ओठांवरती मधाळ हासू !!

सोसलेच असशील तूही ग
अडीअडचणी ऊन उन्हाळे
कधी काळोख्या रातीमधली
कडाडणारी खिन्न वादळे
उभी राहुनी तशीच कणखर
लंघलास तू खडतर सेतू
सीमेपल्याडही वार्धक्याच्या
अजून भासशी चिरतरुणी तू !!

प्रसन्नता तव मुखकमलावर
दावी आरसा तुझ्या मनीचा
निकोप काया तुझी दाविते
नितळ, निरागस गंध मनाचा
भस्म कपाळी सहजची सांगे
निराकार निर्विकार हेतू
सीमेपल्याडही वार्धक्याच्या
अजून भासशी चिरतरुणी तू !!

सार्थकता जीवनी अवतरे
आता हाक तुज पैलतीराची
संध्यासमयी आयुष्याच्या
आस आता तुज ईश भेटीची
निर्माल्याचे फूल अजूनही
तसेच ताजे नव्हेच किंतु
सीमेपल्याडही वार्धक्याच्या
अजून भासशी चिरतरुणी तू !!


मोबाईल – 9422775554 / 8830117926

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!