लीना जोशी परुळेकर
मागच्या लेखात आपण make-up बद्दल आणि make-up उत्पादनांबद्दल माहिती घेतली. आता या भागात सुद्धा आपण Make-Up बद्दल माहिती घेऊ.
Make-up ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याचे structure हे समान असते, पण shape वेगवेगळा असतो. त्यामुळेच Make-up करायचे technique सारखे असते म्हणजेच कुठले उत्पादन चेहऱ्याच्या कुठल्या भागात लावायचे, हे ठरलेले असते. उदा. Eyeliner पापण्यांच्या केसांना, blusher हे cheek bone वर, lipstick ओठांना इत्यादी.
Make-up उत्पादने ही सर्व त्वचा प्रकारांसाठी उपलब्ध असतात. Make-up उत्पादने घेताना ती चांगल्या Brand ची घ्यावीत. एकतर ही उत्पादने व्यवस्थित test करूनच बाजारात उपलब्ध होतात. या उत्पादनांमध्ये जे colour pigment वापरलेले असतात ते long lasting असतात. ज्यामुळे कमीत कमी उत्पादनात जास्तीत जास्त effect मिळतो. म्हणजेच, कमी Product quantity मध्ये जास्त face area cover होतो. जेव्हा Foundation विकत घेतले जाते, तेव्हा त्याचा रंग (shade) हा आपल्या चेहऱ्याच्या त्वचेशी मिळता-जुळता घ्यावा. हे foundation आपल्या हाताच्या आतल्या बाजूला मनगटाजवळ लावून बघावे. ते जर आपल्या त्वचेत मिसळल्यासारखे वाटले तर, ते आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर सामान्यतः चालते आणि foundation लावल्यावर आपली त्वचा आपल्या असलेल्या त्वचेच्या रंगापेक्षा काळपट किंवा पांढरट न दिसता नैसर्गिक दिसते.
दिवसा करायचा make up हा हलका असावा आणि त्यात भडक रंगांचा वापर कमी करावा; तेच रात्री करायचा Make-up हा थोडा Dark आणि glitter चा समावेश असलेला चालू शकतो. तुम्ही eye-shadow आणि lipstick हे तुमच्या पेहरावाला compliment करणारे लावू शकता. सगळाच make-up गडद किंवा फिकट केल्याने तो फसतो आणि तो चांगला दिसत नाही. सामान्यत: डोळ्यांचा Make-up हा गडद केला तर, lipstick ही नैसर्गिक रंगाची, कमी मडद करावी आणि lipstick गडद वापरणार असाल तर, eye shadow एकदम light वापरावी. Blush हा सामान्यत: डोळे आणि ओठ यांच्यावर वापरलेल्या रंगाला compliment करणारा असावा.
हेही वाचा – Skin care : मेकअपचे तंत्र
Make-up ही अशी गोष्ट आहे की, ती केल्याशिवाय तुम्हाला त्याचा परिणाम दिसत नाही. आपल्यावर कुठले रंग उठून दिसतात, कुठली रंगसंगती केल्यावर आपले रूप अजून खुलते, हे सर्व कळण्यासाठी trial आणि error ही पद्धती फार गरजेची आहे. त्यासाठी सराव हा गरजेचा आहे. आपण जरी फक्त lipstick लावणार असू तरी ती ओठांच्या बाहेर जाणार नाही, दातांवर लागणार नाही ह्यासाठी सरावाची गरज आहे.
Make – up ची उत्पादने चेहऱ्यावर लावण्यासाठी विविध brush, sponge हे उपलब्ध असतात. सामान्यतः हे brush त्या त्या उत्पादनाच्या नावाने बाजारात मिळतात. उदा. eyeshadow brush, Powder brush, lipstick brush, eyeliner brush, lipliner brush इत्यादी. Foundation हे हातांच्या बोटांच्या मदतीने तसेच sponge च्या मदतीने लावता येते.
हे brush, sponge वापरल्यावर स्वच्छ करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण, त्यात Product अडकून रहाते. जेव्हा वेगवेगळे रंग वापरले जातात, तेव्हा brush स्वच्छ नसतील तर रंग एकत्र होऊ शकतात, bacteria वाढू शकतो. हे brush, sponge साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावेत. थोड्यावेळाने पाणी बदलत बदलत स्वच्छ करावेत. जोपर्यंत पाणी clear येत नाही तोपर्यंत स्वच्छ करावेत. पूर्णपणे वाळल्यानंतरच ते परत वापरावेत.
हेही वाचा – Skin care : Sunscreen वापरणे अनिवार्य
Make up केल्यावर तो काढणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. Make काढण्यासाठी Make up removal sprays, cream बाजारात उपलब्ध आहेत. हे उत्पादन कापसावर घेऊन ते पूर्ण चेहऱ्यावर फिरवावे. चेहरा पूर्ण स्वच्छ होईपर्यंत हे परत परत करावे. पूर्णपणे make up निघाल्यानंतर tonning आणि moisturizing करावे. यामुळे चेहऱ्याला make-up चा त्रास होणार नाही.
पुढच्या लेखात आपण Epilation (Hair Removal) बद्दल माहिती घेऊ.
क्रमश:


