Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बारशामध्ये आत्याला मान आणि आई?

    June 25, 2026

    फक्त आपण… आणि आपला शोध!

    June 25, 2026

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी अन् पडवळाची कोशिंबीर…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी अन् पडवळाची कोशिंबीर…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 23, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी, पडवळाची कोशिंबीर, टोमॅटो सूप, खुसखुशीत कटलेट, वांग्याची भाजी, दाण्याचे कूट,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी, खुसखुशीत कटलेट अन् पडवळाची कोशिंबीर करताना या टिप्स वापरून पाहा.

    • व्हेज कटलेट करताना शिजवलेल्या भाज्यांचे मिश्रण बरेच वेळा सैलसर होते,  ज्यामुळे कटलेटचा आकार नीट होत नाही. अशा वेळी पोहे भाजून मिक्सरमध्ये त्याची रवाळ पूड करून आवश्यक त्या प्रमाणात भाज्यांच्या मिश्रणात घालावी, म्हणजे आकार व्यवस्थित होऊन कटलेटही खुसखुशीत होतात.
    • कांद्याला मोड आल्यास ते सँडविच, चटणी, कोशिंबीर, सूप, सॅलेडमध्ये वापरावे, वेगळा स्वाद येतो.
    • टोमॅटो सूप करताना बीटचा तुकडा टाकला, तर सूपला चांगला लाल रंग येतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स

    • चटणीचा रंग हिरवागार हवा असल्यास वाटताना पालकाची पाने घाला. त्यामुळे कोथिंबीर अगदी थोडी पुरते (स्वादापुरती); रंग मात्र आकर्षक येतो.
    • भेंडी आणल्यावर पुष्कळ वेळा जून भेंडी त्यात असतात. त्या फेकून न देता, त्यातील बिया काढून त्या अर्धा चमचा तेलावर परताव्यात आणि पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटाव्यात. वाटताना त्यात हिरव्या मिरच्या, मीठ, अर्धा चमचा साखर घालावी. त्यात दही घालावे आणि हिंग घालून फोडणी द्यावी. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालावी. ही चटणी फारच छान लागते. सहा-सात भेंडीतील बिया घेतल्या तरी, त्याची वाटीभर चटणी सहज होईल.
    • कधी कधी भाज्यांना खूपच माती लागून येते किंवा काही भाज्या (आलं, कारली वगैरे) ज्यांच्या खाचाखाचांतून माती लागलेली असते. साध्या धुण्याने एकदम स्वच्छ होत नाही. अशा वेळेस त्या भाज्यांना एकदा धुऊन मग उभट भांड्यात, पाण्यात टाकून तुरटी फिरवून थोडा वेळ ठेवावं. सगळी माती तळाशी बसते. पुन्हा एकदा धुऊन वापरायला घ्याव्यात.
    • वांग्याच्या भाजीत दाण्याचे कूट नसेल तेव्हा चुरमुरे किंवा चिवडा बारीक करून घालावा. फारच खमंग भाजी होते.

    हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…

    • कोणतीही रसभाजी करताना, पालकाची सात-आठ पाने बारीक चिरून थोडे पाणी घालून मिक्सरच्या छोट्या भांड्यात वाटावी आणि भाजीत घालावी, म्हणजे ग्रीन ग्रेव्ही व्हेजिटेबल तयार होते.
    • काकडी जेव्हा महाग होते, तेव्हा पडवळ घ्या. तो किसा आणि घट्ट पिळून पाणी काढून टाका, त्यात नेहमीप्रमाणे दाण्याचे कूट, साखर, मीठ, दही, कोथिंबीर घाला. अगदी काकडीच्या कोशिंबिरीसारखी ही कोशिंबीर लागते.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पोळी करणे… चंमतग

    June 19, 2026 फूड काॅर्नर

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    June 19, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    पोळी करणे… चंमतग

    By प्रणाली मंगेश महाशब्देJune 19, 2026

    दोन मैत्रिणींमधला संवाद… पहिली – अगं फोटो बघितला का? आज किनाई माझ्या लेकाने मला पोळी…

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    June 19, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बारशामध्ये आत्याला मान आणि आई?

    June 25, 2026

    फक्त आपण… आणि आपला शोध!

    June 25, 2026

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 339
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 466
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 734
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बारशामध्ये आत्याला मान आणि आई?

    June 25, 2026

    फक्त आपण… आणि आपला शोध!

    June 25, 2026

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.