हर्षा गुप्ते
झिरकसाठी साहित्य
- भाजून सोललेले शेंगदाणे – अर्धी वाटी
- भाजलेल सूके खोबर – 2 टेबलस्पून
- तीळ – 1 चमचा
- हिरव्या मिरच्या – 4
- लसूण – 15 पाकळ्या
- कढीपत्ता – 10 पाने
- कोथिंबीर – 1 वाटी
- हिंग – चिमुटभर
- मोहरी – 1 लहान चमचा
- जिरे – 1 लहान चमचा
- तेल – फोडणीसाठी
- मीठ – चवीनुसार
- पुरवठा संख्या – 4 व्यक्तींसाठी
एकूण वेळ – 15 मिनिटे
कृती
- शेंगदाणे, सुक खोबरं आणि तीळ पाणी न घालता वाटून घ्यावे आणि ते बाजूला ठेवावे.
- मिरच्या, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता, थोडे मीठ आणि पाणी घालून वाटून घ्या.
- पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे यांची फोडणी करा. वरून चिमुटभर हिंग घाला.
- आता वाटलेले हिरवे वाटण फोडणीत घाला. लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्या.
- लहान आचेवरील या पॅनमध्ये लहान चमचा हळद घालून त्यात सहा वाट्या पाणी घाला. खूप चांगली उकळी येऊ द्या.
- आता शेंगदाण्याचे वाटण त्यात घाला. अजून एक चांगली उकळी आली की, झाकण देऊन मंद आचेवर राहू द्यात.
- पाच – सात मिनिटांनी गॅस बंद करा.
टीप
- झिरक भातासोबत वाढून घ्या आणि आवडत असल्यास साजूक तूपाची धार सोडा.
हेही वाचा – Recipe : ही कोथिंबीर वडी करून पाहा…
गोविंद लाडूसाठी साहित्य
- पोहे – 2 वाट्या
- शेंगदाणे – 1 वाटी
- काजू आणि बदाम – पाव वाटी
- सफेद तीळ – 2 मोठे चमचे
- जायफळ आणि वेलची पूड – चमचाभर
- चिरलेला गूळ – 1 वाटी
- साजूक तूप – लाडू वाळण्यासाठी
एकूण कालावधी – अर्धा तास
हेही वाचा – Recipe : भाताचे स्वादिष्ट कटलेट आणि दही ब्रेड
कृती
- थोड्याशा तूपावर पोहे खरपूस भाजून घ्यावे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे
- शेंगदाणे, काजू, बदाम आणि तीळ छान खरपूस भाजून मिक्सरमध्ये जरा भरड बारीक करावे.
- पोह्याची पावडर आणि सगळ्या दाण्यांची पावडर मिक्स करून त्यात चिरलेला गूळ आणि वरून थोड साजूक तूप घालून मिक्स करून लाडू वळायचे.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.