Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeअवांतरटोनी अन् टिंकरबेल

टोनी अन् टिंकरबेल

मंदार अनंत पाटील

लंडनला एकदा मी आणि पल्लवी घरी कामावरून परत येत असताना आमची भेट टोनी नावाच्या जर्मन स्पिट्झ जातीच्या अतिशय बोलके डोळे, ठेंगणा बांधा, भरपूर केस आणि अंबाडा बांधावा अशी शेपटी… असे रुपडे असलेल्या श्वानाशी झाली. त्याची मालकीण जेनिटा पण भारतीयच आहे आणि कोरोना काळात एक सहचारी म्हणून हे श्वान आणले गेले. अतिशय हुशार आणि मस्तीखोर हा साधारण 22 महिन्यांचा नर श्वान… काही मिनिटांतच माझी आणि त्याची दोस्ती झाली. जेनिटाची रीतसर परवानगी घेऊन वेळ मिळेल तेव्हा टोनीला फिरवायची जबाबदारी घेतली आहे. आता तो माझा सध्याचा सखा आहे.

लिओला जाऊन अवघे दोन-तीन महिने झाले आणि टिंकरबेल नावाची डच ससुली आमच्या घरी दाखल झाली. माझी सहकारी कॅरोलिना हिने तिच्या मित्राबरोबर पाळलेली ही टिंकरबेल आमच्या घरी काही अपरिहार्य कारणांमुळे पाहुणी म्हणून आली; पण आता घरातील एक सदस्य झाली आहे. पल्लवी नेहमी म्हणते की, You are the reason to smile again! देवाच्या मनात काय आहे, हे माहीत नाही… पण आमची ओंजळ कधीच रिकामी ठेवायची नाही असेच ठरविलेले दिसते.

निराधार आणि मुक्या प्राण्यांची मदत हेच व्रत

लंडनमध्ये मी एक पण केला आहे की, जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत जमेल तितकी मदत निराधार, मुक्या प्राण्यांची तसेच गरजू प्राणीमित्रांची करायची. त्याकरिता पाच फेसबुक पेज, तीन WhatsApp ग्रुप तसेच जवळ-जवळ 125 फेसबुक ग्रुप यांच्यामार्फत कामाचा पसारा करून ठेवला आहे. प्राणी-पक्षी याबाबत माझे जितके ज्ञान आहे, त्याचा जास्ती जास्त लोकांना मोफत फायदा होईल हीच सेवा.

प्रत्येक भारतभेटीत अनेक मुक्या जीवांना कायमस्वरुपी घरं मिळवून द्यायचे काम सुरूच असते. जेव्हा त्यांची खुशाली कळते, तेव्हा मनाला कुठेतरी हेच समाधान वाटते की, रीगल, लिओ, रॅंबो आणि ब्रुस यांना हीच खरी श्रद्धांजली.

लंडनमध्ये ‘Say No to Dog Meat’ नावाची एक एनजीओ आहे, जी चायनामधून जिवंत कुत्रा किंवा मांजरांचे मांस विकणारे मार्केट आहे, तिथून या मुक्या जिवांची सुटका करून आणतात आणि युकेमध्ये लोकांना दत्तक देतात.

आतापर्यंत या उपक्रमात मला मोलाची साथ मिळत आहे, ते प्रामुख्याने माझी पत्नी पल्लवी मंदार पाटील, सेव्ह दी पॉज पूनम गिडवानी, संध्या शेट्टी, साक्षी सतकर, मेहेरीन खान यांची. हे कार्य असेच पुढे सुरू ठेवणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!