मानसी देशपांडे
काही दिवसांपूर्वी व्हेलेंटाईन डेचा माहोल होता. म्हणजेच, नुकतंच प्रेम झालेले प्रियकर – प्रेयसी, तसंच प्रेमाचं रुपांतर लग्नात झालेले नवरा – बायको… सर्वच कमी-जास्त प्रमाणात साजरा करताना दिसतात. खोटं का बोला, मी पण साजरा करते! आपल्या आयुष्यात प्रेमाला खूप जास्त महत्त्व आहे आणि असायलाच हवं. एका ठराविक वयानंतर काही गोष्टी या अशा असतात, ज्या आपण आई-वडिलांशी बोलू शकत नाहीत, मग तिथे लागते आपली हक्काची, प्रेमाची व्यक्ती. हे प्रेम कसं होतं? काहींचं एका नजरेत, तर कोणी डोळ्यांच्या प्रेमात पडतं. हे प्रेमाचं गाव फारच सुंदर असतं… जिथे राग असतो, रुसवा असतो, लाडिकपणा असतो तसंच शपथा पण असतात. एकदा जीव गुंतला की, मनात असणाऱ्या प्रेमाची मुक्तहस्ते उधळण होते. जसं म्हणतात, “प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे…”
लव्ह मॅरेजमध्ये प्रेम आधी होते, मग लग्न होतं. म्हणजेच, दोघेही एकमेकांना सुरुवातीपासून ओळखत असतात. पण खरं प्रेम घडतं, ते अरेंज मॅरेजमध्ये…! कारण, दोघांनाही एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी या नंतर समजतात किंवा लग्न होईपर्यंतचा जो काळ असतो, त्यात या गोष्टी हळूहळू उलगडू लागतात.
हेही वाचा – सुरेश भट… शब्द, स्वरांचा पारिजात
हे प्रेम फुलवतात ते डोळे.. म्हणून तर, मनात असलेल्या भावना डोळे कधीच लपवू शकत नाही. आपली आवडती व्यक्ती समोर आली की, हे डोळे आपोआप झुकतात. तेव्हाच तर गाण्याच्या ओळी आहेत –
डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे…
मला सांगा, प्रेम फक्त नवरा, बायको किंवा प्रियकर, प्रेयसी यांच्यातच होतं का? तर, अजिबात नाही! एक सोपं उदाहरण देते… पोटात वाढत असणाऱ्या बाळावर देखील आई-वडील प्रेमच करतात. जेव्हा ती नाळ जोडली जाते, हालचाल जाणवू लागते, तेव्हा तर ते प्रेम कित्येक पटीने वाढते. आपल्याच जोडीदाराचा अंश आपल्या पोटात वाढतो आहे, या जाणिवेने दोघांवर ती तेवढंच प्रेम करते.
प्रेमाची धुंदी ही सर्वांवर असते. फक्त ते प्रेम आंधळं नसावं… बोलके असावं. त्यात ईगो नसावा तर आपलेपणा असावा. जिथे शेअरिंग असावं, पण वर्चस्व नसावं. मग काय, हे प्रेमाचं गाव नेहमीच हवंहवंसं वाटेल…
हेही वाचा – वपुंबद्दल लिहिण्यासारखं खूप, पण…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


