Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिकज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञान

ज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञान

जी. भालचंद्र

ज्ञान आणि माहिती यांचा एकमेकांशी संबंध आहे. ज्ञान हे सर्वांसाठी खुले असते. ज्ञान आणि माहिती यातील संदर्भ वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि म्हणूनच काही पैलूंमध्ये त्यात समानता आहे. माहिती हा ज्ञानाचा एक प्रकार आहे. ज्ञान ही जरी माहिती नसली तरी, उपलब्ध माहितीच्या प्रमाणावर आधारित आहे.

उपलब्ध माहितीमधून जे काही मिळवता येते, ते ज्ञान. तथ्ये, सिद्धांत आणि तत्वे ही शिक्षणाचा आधार असतात आणि त्यांची माहिती गोळा करण्याचे तसेच ती क्रमबद्ध करण्याचे कौशल्य आपल्याकडे आहे. माहिती ही अधिक तथ्यात्मक असली तरी ज्ञान हे विश्वास आणि बांधिलकी याच्याशी जास्त निगडीत आहे. ज्ञान हे कृतीबद्दल असते. ज्ञानाचा उपयोग शेवटपर्यंत होतो. माहिती, ज्ञान आणि डेटा हे समानार्थी नाहीत. तरी पण, त्यांची व्याख्या करण्याचा प्रयत्न करून बरेचसे संशोधक हे शब्द समानार्थी म्हणून सहजपणे वापरतात.

ज्ञान आणि तंत्रज्ञान असे धूमकेतू आहे की, ज्यावर आपण एकाच वेळी स्वार होण्याचा प्रयत्न करत आहोत. हे दोन्ही धूमकेतू वेगवान असून त्यांच्यावर आपले नियंत्रण नाही. ते आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातीलच, अशी आपणास आशा असते. आधुनिक तंत्रज्ञानाला अद्ययावत ज्ञानाशिवाय पर्याय नाही. बहुतेक प्रसंगी ज्ञानाशिवाय तंत्रज्ञान हानिकारक असते. तंत्रज्ञान आपल्याला नेहमीच यशाच्या शिखरावर घेऊन जात नाही आणि ज्या क्षणी तंत्रज्ञान ज्ञानाचे नेतृत्व करू लागते, त्यावेळी आपली दिशाभूल होते.

तंत्रज्ञान आणि ज्ञान यांची सांगड अतिशय आक्रमक आहे, कारण दोघेही अत्यंत महत्त्वकांक्षी आहेत आणि वेगाने या जगात पसरत आहे. सध्याच्या युगात भविष्यातील घडामोडी अपेक्षेपेक्षा वेगाने घडत आहेत.

आपण जुन्या तंत्रज्ञानाला धरून राहू शकत नाही. उत्कृष्टतेसाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजे, हे जरी खरं असलं तरी वास्तव हे आहे की, जे काही नवीन आहे ते नेहमीच चांगले किंवा उपयुक्त नसते. नवीन तंत्रज्ञानामुळे बाजारपेठेत खूप उत्साह आहे, जो कधी कधी अनावश्यक असतो. जेव्हा जेव्हा आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा सामना करावा लागतो, तेव्हा आपण त्यावर अवलंबून राहण्यापेक्षा ते तंत्रज्ञान आपली गरज पूर्ण करते की, नाही हे शोधण्यासाठी त्याचा अभ्यास केला पाहिजे.

माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे उपलब्ध माहितीचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे ज्ञानाचा स्फोट झाला आहे. इंटिग्रेटेड सर्किटच्या शोधामुळे संगणकाचा खूप विकास झाला असून माहितीवर प्रक्रिया करण्याची त्याची क्षमता वाढली आहे. वेगवेगळ्या कंपन्या काही महिन्यांच्या अंतराने मायक्रोचीपची प्रोसेसिंग क्षमता दुप्पट करत आहेत. मायक्रोचीपच्या प्रगतीमुळे माहितीचा स्फोट होऊन ज्ञानाचा विस्तार झाला आहे. तांत्रिक बदलाचा वेग प्रचंड आहे आणि त्याचा समाजावर, राहणीमानावर खोलवर परिणाम झाला आहे.

म्हणून आपण सर्वांनी यावर विचार करून आपले जीवनमान सुधारण्याची वेळ आली आहे.

(क्रमश:)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!