लीना जोशी परुळेकर
आतापर्यंत आपण आपली त्वचा कशी असते आणि तिच्यावर कुठल्या गोष्टींचे परिणाम होतात ते पाहिले. आता आपण त्वचेची काळजी कशी घ्यावी, ते पाहू.
त्वचेची काळजी घेताना आपण कायम एक महत्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे सातत्य. कधीतरी त्वचेची काळजी घेतली तर त्वचा तेवढ्या पुरतीच टवटवीत दिसेल. पण जर रोजच्या रोज काळजी घेतली तर, ती कुठल्याही ऋतूत, दिवसाच्या कुठल्याही प्रहरी टवटवीतच दिसेल.
त्वचेची काळजी घेताना आपण दिवसा CTMS आणि रात्री CTN हा Plan follow करणार आहोत. यात C म्हणजे Cleansing आणि T म्हणजे Toning. दिवसा यात M म्हणजे Moisturizing आणि S म्हणजे Sunscrean. रात्री CTN Plan आहे. यात N म्हणजे Nourishing.
आपल्या चेहऱ्यावर धूळ, आपल्या त्वचेतून स्त्रवणारे नैसर्गिक तेल (sebum), घाम, प्रदूषण, Make Up इत्यादी गोष्टींचा मारा होत असतो. या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर वरवर नसतात तर, त्या रंध्रांच्या आत अडकून बसलेल्या असतात, त्या गोष्टी आपण नुसते पाणी वापरून स्वच्छ करू शकत नाही. हे deeply स्वच्छ करण्यासाठी बाजारात उत्पादने मिळतात त्यांना cleanser म्हणतात. ही उत्पादने वापरून जेव्हा आपण आपली त्वचा स्वच्छ करतो, त्याला cleansing म्हणतात.
हेही वाचा – Skin Care : त्वचा आणि तिचे प्रकार
Cleansing करण्याची पद्धत असते ती Follow केली, तर त्याचे फायदे होतात. त्वचा व्यवस्थितपणे स्वच्छ होते. Cleanser हातावर घेऊन चेहऱ्यावर लावावे. कापूस ओलसर करून तो आकृतीत दाखविल्याप्रमाणे चेहऱ्यावर ऊर्ध्व दिशेने (upward direction) आणि मधून बाहेरच्या दिशेने (outward direction) फिरवावा.
Cleansing नंतरची पायरी आहे toning. Toning केल्यामुळे त्वचेची रंध्रे बंद होऊन, त्वचा तुकतुकीत दिसते. त्वचेच्या Phचा समतोल राखला जातो. Toning करताना कापूस ओला करून त्यावर toning उत्पादन घ्यावे आणि ते चेहऱ्यावर हलक्या हाताने Pat करावे. सगळे उत्पादन चेहऱ्यात मुरू दयावे.
Cleaning आणि toning नंतरची पायरी आहे. Moisturizing. Moisturizer हे त्वचेला ओलावा देते. त्यामुळे त्वचेचा पोत smooth राहण्यास मदत होते. Moisturizer लावताना ते बोटांवर घ्यावे. दोन्ही हातांनी ते चेहऱ्यावर लावून घ्यावे. ज्या प्रकारे आपण cleansing केले, तसेच आकृतीत दाखवल्याप्रमाणे हाताच्या तळव्यांच्या मदतीने, हलक्या हाताने massage करत चेहऱ्यात मुरवावे.
आता आपण Sunscreen कडे वळू. तुम्ही उन्हात जाणार असाल किंवा नसाल, तरी चेहऱ्याला’ Sunscreen लावणे आवश्यक आहे. आजकाल हवेत प्रदूषणाचे प्रमाण खूप आहे. Sunscreen हे सूर्याच्या अतिनील किरणांबरोबरच प्रदूषणापासून सुद्धा त्वचेचे रक्षण करणार आहे. Sunscreen सुद्धा moisturizer सारखेच चेहऱ्याच्या त्वचेला लावावे. बाहेर जायचे नसले तरीही Sunscreen लावणे गरजेचे आहे.
हेही वाचा – त्वचा आणि त्वचेवर परिणाम करणारे घटक
रात्री जेव्हा आपण CTN Plan follow करणार आहोत, तेव्हा cleansing, toning नंतर nourishment देणारे उत्पादन चेहऱ्याच्या त्वचेवर लावणे गरजेचे आहे. कारण रात्रभर तुमची त्वचा आराम करणार आहे आणि तुम्ही लावलेल्या उत्पादनाचा फायदा तुमच्या त्वचेला मिळणार आहे.
या भागात आपण त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे, ते पाहिले. पुढच्या भागात कुठल्या प्रकारच्या त्वचेसाठी कुठली उत्पादने वापरावीत ते बघू.
(क्रमश:)
lee.parulekar@gmail.com