मागील लेखात आपण निरामय मानसिक आरोग्य या विषयाच्या विविध पैलूंबद्दल सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण निरामय आरोग्यासाठी आहार-विहार या विषयाच्या विविध पैलूंविषयी जाणून घेणार आहोत.
निरामय आरोग्य कल्पवृक्ष
आरोग्य संकल्प करून नियमित योगाभ्यास आणि योग्य आहार-विहार यातून शिस्तबद्ध संतुलित जीवनशैली, निरामय मानसिक आणि शारीरिक आरोग्य तसेच संकल्पसिद्धी अशी फलप्राप्ती.
1. आहार-विहार अभ्यास : पार्श्वभूमी
आयुर्वेद आणि मानवी शरीर, पंचमहाभूते, शरीरातील त्रिदोष, सप्त धातू, सात ऊर्जाचक्रे, स्वस्थ आरोग्य, आरोग्य बिघडविण्याची कारणे आणि संतुलित जीवनशैली.
हेही वाचा – निरामय मानसिक आरोग्य
2. सर्वसाधारण आहार मुद्दे
शरीरातील पंचकोश, आहाराचे उद्देश, सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, आहारातील पाणी तेल मीठ, अनाहार/अपथ्याहार, विरुद्ध आहार, शाकाहार, संस्कारित आहार, चौरस आहार आणि सात्त्विक आहार.
3. सर्वसाधारण विहार मुद्दे
जैविक घड्याळ, निसर्गचक्र, त्रिदोष चक्र, ब्राह्ममुहूर्तावर उठणे, शांत आणि योग्य प्रमाणात झोप, रात्रीचे जागरण, निद्रानाश, अभ्यंगस्नान आणि चालणे : उत्तम आरोग्यदायी व्यायाम.
4. प्रकृतीनुसार आहार-विहार
वात, पित्त, कफ प्रकोपक आणि शामक आहार-विहार, त्रिदोष संतुलन.
5. ऋतूमानानुसार आहार-विहार
आयुर्वेदानुसार ऋतुचर्या, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या मोसमातील आहार-विहार.
6. वयोमानानुसार आहार-विहार
किशोरवयीन मुलेमुली, तरुण-प्रौढ पुरुष आणि महिला तसेच ज्येष्ठ पुरुष आणि महिला यांच्यासाठी आहार-विहार.
7. शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी तसेच अवयव कार्यक्षमता वाढविण्यासाठी आहार -विहार.
शरीराची प्राकृत आणि विकृत अवस्था, आरोग्य बिघडण्याची कारणे आणि टिकवण्यासाठी आहार-विहार.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक…
8. वैयक्तिक स्वच्छता आणि निगा
स्वच्छतेचे महत्त्व, शरीरातील अवयवांची स्वच्छता आणि निगा.
9. आरोग्य काळजी आणि सुरक्षा
योगशास्त्रातील शुद्धिक्रिया, आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सा, निसर्गोपचार, पंचमहाभौतिक चिकित्सा आणि आरोग्य तपासणी.
10. आरोग्यवर्धक आहार पदार्थ
आरोग्यवर्धनासाठी धान्ये, डाळी, कडधान्ये, भाज्या, फळे, सुकामेवा इत्यादी उपयुक्त आहार पदार्थ.
अशा रितीने आपण आहार-विहार या विषयासंबंधित बरेच पैलू जाणून घेतल्यानंतर सहजी लक्षात येणारी बाब म्हणजे यावर यथायोग्य मार्गदर्शन खरोखरच आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, सात्त्विक आहार आणि आरोग्यदायी विहार यांचा जीवनशैलीत नियमित अवलंब केल्यास निरामय आरोग्य प्राप्ती खचितच सुकर होईल.
या संदर्भात इथे यथार्थ उल्लेख करावासा वाटतो की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ या पुस्तकात आहार-विहार या विषयातील पैलूंवर नित्य जीवनात उपयुक्त असे सर्वांगीण, सर्वसमावेशक सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.
क्रमशः


