सायली कान्हेरे
साहित्य
- वालाचे दाणे – पाव किलो
- सुरती पापडी – पाव किलो
- तूर शेंगा – पाव किलो
- कंद (जांभळा) – पाव किलो
- छोटी वांगी – पाव किलो
- छोटे बटाटे – पाव किलो
- सांबारासाठी वापरतात ते छोटे कांदे – पाव किलो
- मटार – पाव किलो
- नारळ – 1
- लसूण पात – 1 जुडी
- मिरच्या – 5 (लवंगी असल्यास 3)
- चिरलेली कोथिंबीर – वाटीभर
- गोडा मसाला – अर्धी वाटी
- गूळ – अर्धी वाटी
- तिखट – 4 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
भज्यांसाठी साहित्य
- मेथी – 1 जुडी
- बेसन – 1 वाटी
- तांदूळ पीठ – अर्धी वाटी
- मीठ – चवीनुसार
- तिखट – 2 टेबलस्पून
- ओवा – अर्धा टीस्पून
- हिंग – 1 टीस्पून
- हळद- 1 टीस्पून
- तेल- तळण्यासाठी
पुरवठा संख्या – 8 ते 10 व्यक्तींसाठी
तयारीसाठी लागणार वेळ –
सगळ्या शेंगा सोलणे; वांग्याच्या फोडी करणे; कंद, बटाटे चौकोनी तुकडे करणे; कांदा बारीक चिरून घेणे; नारळ खोवून घेणे; लसूण पात, मेथी निवडणे; मेथी बारीक चिरून घेणे – दीड ते दोन तास
पाककृती करण्यासाठी – 30 मिनिटे
एकूण वेळ – दोन ते अडीच तास
हेही वाचा – Recipe : एकदम टेस्टी कुळीथ सूप
मेथी भजीची कृती
- प्रथम चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या मेथीमध्ये बेसन, तांदूळ पीठ, मीठ, हिंग, हळद, तिखट, ओवा घालून भज्यांप्रमाणे भिजवावे.
- आता तेल कढईत व्यवस्थित तापवून घ्या.
- तापलेल्या तेलात वरील मिश्रणाचे छोटे गोळे करून भजी तळून घ्या आणि बाजूला ठेवा.
भाजीची कृती
- मिक्सरच्या भांड्यात नारळ (पाव वाटी नारळ बाजूला काढून ठेवा), लसूण पात, मिरच्या, कोथिंबीर बारीक वाटून घ्या.
- आता मोठ्या कढईत मेथी भजी तळून घेतल्यानंतर जे तेल उरेल त्यातले साधारण 2 वाट्या तेल घ्या.
- गॅसच्या मध्यम आचेवर तेल तापल्यावर त्यात कांदा घालावा आणि मऊ होईपर्यंत परतावा, मग त्यात वाटलेले मिश्रण घालावे.
- मिश्रणाला तेल सुटायला लागले की, त्यात अनुक्रमे कंद, सुरती पापडी, वालाचे दाणे, तुरीचे दाणे, मटार, बटाटे, वांगी हे सगळे घालून छान परतून घ्या.
- परतून झाले की, त्यात पाणी घालून शिजवायला ठेवावे. शिजवताना त्यात गूळ, गोडा मसाला, तिखट घालावे.
- ही भाजी शिजायला अर्धा तास लागतो, त्यामुळे मधेमधे हे मिश्रण ढवळावे. सगळ्या भाज्या नीट शिजल्या पाहिजेत.
- सगळी भाजी छान शिजली की, मग त्यात तळून ठेवलेली भजी घालावी आणि परत हलक्या हाताने ढवळून गॅस बंद करावा. वाफ छान मुरू द्यावी.
- साधारणपणे पाच मिनिटांनी भजी तळून उरलेल्या तेलातील 1 डाव तेल भाजीवर घालावे. अतिशय चविष्ट आणि कमी तिखट असलेला उंधियो तयार.
- सर्व्ह करताना बाजूला काढून ठेवलेला नारळ आणि कोथिंबीर घालावी.
हेही वाचा – Recipe : लज्जतदार टोमॅटो सूप
विशेष टीप
- उंधियोमध्ये सुरण, कच्ची केळी, रताळं पण घालतात.
- काही कारणांनी लसूणपात नाही मिळाली तर, त्याऐवजी नुसता लसूण वापरला तरी चालेल.
- सांबारासाठी वापरतात ते लहान कांदे उपलब्ध नसतील तर आपले नेहमीचे कांदे चिरून ते वापरलेत तरी चालेल.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.


