Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    October 3, 2026

    फिट्टमफाट

    October 3, 2026

    टेंशन घेताय? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, October 4
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » फिट्टमफाट
    ललित

    फिट्टमफाट

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेOctober 3, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, पराग गोडबोले, लेखक पराग गोडबोले, फिट्टमफाट, वेंधळेपणा, स्कूटी विसरणे, बायकोची स्कूटी, स्कूटी विसरणारी बायको, स्कूटी विसरणारी पत्नी, बायकोचा वेंधळेपणा, बायकोकडून शिक्षा, गोष्ट विसरलेल्या स्कूटीची
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माझी बायको मला वेंधळा म्हणते, हे तर सर्वश्रुत आणि जगजाहीर आहे… आणि मी आहे तसा, हे मी मान्यही केलेलं आहे. असतात काही जण तसे जन्मतःच, त्याला कोण काय करणार?  बायको मात्र टेंभा मिरवीत असते… ‘आम्ही गोखले म्हणजे सर्वगुणसंपन्न. इथे गोडबोल्यांकडे येऊन, माती झाली माझ्या गुणांची. कोणाला कौतुकच नाही मुळी आमच्या चटपटीतपणाचं…’ वगैरे वगैरे.

    आता आयुष्याची जास्त वर्षे अलीकडच्या बाजूला काढूनही, पलीकडचंच कुरण जर अजूनही हिरवंगार भासत असेल, तर कोण काय करणार त्याला? अर्थात, तिच्या वेंधळेपणाचे बरेचसे किस्से आहेत माझ्या पोतडीत, पण ते सांगून, हात दाखवून अवलक्षण कोण करून घेणार उगाचंच!

    पण कधीकधी माझीही सहनशक्ती संपुष्टात येते आणि मग तिच्या वेंधळेपणाचे किस्से फेकतो मी तिच्या तोंडावर. तेवढ्यापुरती बाजी मी जिंकलेली असते, कारण परत लवकरच मी तिच्या तावडीत सापडतोच सापडतो. असा उंदीर मांजराचा खेळ कायम सुरू असतो आमचा.

    अलीकडेच असंच झालं. एका मैत्रिणिकडे गेल्या होत्या बाईसाहेब. तिथे कुलकर्णी ब्रदर्सचं, थंडगार पीयूष ढोसून आल्या ग्लासभर आणि मग परिणाम व्हायचा तोच झाला. सकाळी उठल्यावर गले में खिचखिच, बदन में कणकण वगैरे वगैरे. मग डॉक्टरकडे धाव आणि दोन दिवसांच्या लाल-पिवळ्या गोळयांसाठी पाचशे रुपयांची आहुती, विनाकारणच. म्हणजे ते पीयूष केवढ्याला पडलं बघा!

    हेही वाचा – स्कूटी, बायको आणि मी…

    तर, बाईसाहेब स्कूटीवर मांड ठोकून, गेल्या डॉक्टरकडे आणि येताना स्कूटी तिथेच विसरून, आल्या घरी चालत चालत… वाटेत भेटलेल्या मैत्रिणीशी गप्पा छाटत. आल्यावर किल्लीही लावली जागेवर, नेहेमीप्रमाणे!

    ती आल्यावर मलाही जायचं होतं, म्हणून मी किल्ली घेऊन बाहेर पडलो. आमच्या पार्किंगमध्ये जिथे स्कूटी विराजमान असते, तिथे जाऊन बघितलं तर गाडी नाही जागेवर. कुठेतरी दुसरीकडे लावली असेल म्हणून इकडे तिकडे फिरून शोध घेतला, पण स्कूटी काही गावेना… वॉचमनला विचारलं, तेव्हा तो म्हणाला, “मॅडम गाडी घेऊन गेल्या, पण येताना चालतच आल्या.”

    मला दिसली संधी… आपदा में अवसर! मी जवळच असलेल्या दवाखान्याशी गेलो आणि  आमची स्कूटी दिसली तिथे, अपेक्षेप्रमाणेच. ती घेऊन मी गेलो, ब्राह्मण सभेत पुस्तक बदलायला. तिथूनच तिला फोन केला आणि विचारलं, “स्कूटी कुठाय? दिसली नाही मला कुठे… तुला फोन केला होता लगेच, पण तू उचलला नाहीस, मग मी आपला चालत आलो पुस्तक बदलायला.”

    “म्हणजे काय, सोसायटीत नाही स्कूटी? मग कुठे गेली?”

    मी म्हणालो, “तूच नेली होतीस ना, मला काय विचारतेस?”

    आता तिला आठवलं, “मी दवाखान्यातून चालत आले मैत्रिणीबरोबर. मी बघून येते पटकन, तिथेच असणार, नक्कीच!”

    मनाशीच हसत मी तिला म्हणालो, “जा लवकर बघून ये, आहे का तिथे ते…”

    गेली बिचारी धावत पळत आणि तिथून मला फोन…

    “अरे, नाहीये तिथे. मला वाटतं मी तिथेच ठेवली होती, पण आता काही आठवतच नाहीये मला. कळेनासंच झालंय रे काही,  किती वेंधळी मी. डोकं आहे का खोकं माझं…” इत्यादी इत्यादी!

    मनात म्हटलं, ‘अब आया ना, उंट पहाडके नीचे?’ स्वतःच मान्य केलं म्हणून ठीक आहे.

    मला विचारलं, “आता काय करायचं रे?”

    “आरटीओवाल्यांनी नेली असेल उचलून, नाहीतर गेली असेल चोरीला!” मी आणखी पीळ भरला.

    आता मात्र फोनमधून हुंदक्यांचा आवाज यायला लागला… “सगळं माझ्यामुळे होतंय. गाडी गेली, तर नवीन घ्यायला लाखभर तरी पडतील.”

    मी पण थोडा अभिनय केला… “जाऊदे गं, तू काही मुद्दाम नाही केलंस. मागे नाही का एकदा मंगळसूत्र हरवून आलीस कुठेतरी, तेव्हा केलं की नाही आपण नवीन? तसंच हे… घेऊ आपण नवी गाडी. नको रडूस!”

    “नाही, तू लगेच ये. आपण शोधू स्कूटी, नाहीतर पोलिसांत तक्रार करू… कष्टाचा पैसा आहे आपला, नक्की मिळेल आपली गाडी.”

    मला फुटणाऱ्या उकळ्या कशातरी आवरत, मी गांभीर्याचा आव आणून म्हणालो, “थांब तिथेच. आलोच रिक्षा करून.”

    हसतहसत स्कूटी सुरू केली आणि निघालो. दवाखान्याजवळ पोहोचल्यावर ती दिसली. दोन्ही हातात गच्च डोकं धरून, अश्रू ढाळत बसलेली माझी बायको!

    थेट तिच्यासमोर नेऊन उभी केली गाडी आणि जोरात हॉर्न वाजवला. तिच्याच स्कूटीवर मला बघून आश्चर्याचा धक्का तिला आणि मग प्रश्नांची सरबत्ती… हसणाऱ्या मला बघून, तिला सगळा उलगडा झाला आणि मग अश्रू ढाळणाऱ्या तिचं, चंडिकेत रूपांतर झालं!

    हेही वाचा – एका केरसुणीची कहाणी…

    नेहेमीच्या, शेलक्या विशेषणांचा भडिमार झाला आणि “किती घाबरवलंस मला, मला तर काही सुचतच नव्हतं रे,” म्हणत परत अश्रुपात सुरू झाला… “नको करूस अशी जीवघेणी थट्टा परत, माझी शपथ आहे तुला…” म्हणत, “आज शिक्षा आहे तुला, मला रडवलंस म्हणून! माझा स्वयंपाक नाही झालेला अजून या भानगडीत. बाहेर ने आता जेवायला मला.”

    मी काय, तयारच होतो, न केलेल्या अन्यायाचं परिमार्जन करायला!

    बाहेर जाऊन मनसोक्त खादाडी करून आलो, पण मी एक वेंधळा तर तू सात वेंधळी, हे तिच्यापर्यंत पोहोचवण्यात मात्र मी नक्कीच यशस्वी झालो होतो, नाही का?

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    October 3, 2026 ललित

    तीन मित्र

    October 3, 2026 ललित

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    By प्रदीप केळुस्करOctober 3, 2026

    आज सचिनचा वाढदिवस. त्याचे बाबा पेपर वाचत होते, आई चहा गाळत होती. एवढ्यात फोन वाजला.…

    तीन मित्र

    October 3, 2026

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026

    सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    October 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    October 3, 2026

    फिट्टमफाट

    October 3, 2026

    टेंशन घेताय? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026

    तीन मित्र

    October 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : रुखाचा आवांका, जैसी बीजकणिका

    October 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 ऑक्टोबर 2026

    October 3, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 458
    • अवांतर 215
    • आरोग्य 154
    • पंचांग आणि भविष्य 610
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 968
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    October 3, 2026

    फिट्टमफाट

    October 3, 2026

    टेंशन घेताय? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.