Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeआरोग्यHair care :  अनावश्यक केसांसाठी... Epilation

Hair care :  अनावश्यक केसांसाठी… Epilation

लीना जोशी परुळेकर

Hair removal (अनावश्यक केस काढून टाकणे) बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. कारण, आजकाल बाजारात खूप प्रकार उपलब्ध आहेत आणि कुठला प्रकार आपल्यासाठी उत्तम आहे, हे त्याची माहिती असेल तर ठरवणे सोपे जाते.

सगळ्यात प्रसिद्ध असलेला Hair removal चा प्रकार म्हणजे waxing. Waxing हे Painful असले तरी त्याचा परिणाम हा जास्त वेळ राहाणारा असतो. कारण, त्यात केस हे मूळापासून निघतात. ज्यामुळे नवीन केस येण्यास वेळ लागतो. Waxing केल्यावर घ्यायची काळजी म्हणजे, जर waxing केल्यावर लालसरपणा येत असेल तर, बाजारात Aleo Vera Gel मिळते ते सर्वप्रथम लावावे, बर्फ फिरवावा. त्वचा नॉर्मल झाल्यावर त्यावर Astringent वापरावे, कारण त्यात antiseptic property असतात. नंतर Hand and body lotion लावावे, ज्यामुळे त्वचेला Hydration मिळते. जेव्हा आपण पार्लरमध्ये जाऊन Waxing करून घेतो, तेव्हा काही गोष्टींचा आग्रह धरला पाहिजे. त्या म्हणजे आपल्यासाठी नवीन Spatula (ज्याच्या मदतीने wax लावला जातो) घेतला गेला आहे की नाही, ते बघणे आणि Waxing झाल्यावर मी वरती जी after care सांगितली आहे, ती फॉलो करणे…

Waxing हे सामान्यत: Parlour मध्येच जाऊन करून घ्यावे; कारण wax जेव्हा skin वरून Pull करून काढला जातो, तेव्हा जर नीट Pull झाले नाही तर, नंतर येणारे काही केस हे ingrown (त्वचेच्या आत होणारी केसांची वाढ) येऊ शकतात. पुढच्या वेळेला जेव्हा waxing करायचे असेल, तेव्हा clean Waxing होणार नाही.

बाकीचे Hair removal चे जे प्रकार आहेत ते घरच्या घरी होणारे असतात, जसे Hair removal cream, razor, Hair removal machine.

हेही वाचा – Skin care : मेकअपचे तंत्र

Hair removal creams मध्ये असे chemical असतात ज्यामुळे केस मऊ होतात आणि ते वरच्या वर निघतात. पण यात केस मूळापासून निघत नाहीत, त्याचमुळे नंतर केसांची वाढ ही पटकन होते. या creams मध्ये chemicals असल्याने जर याचा वापर सतत केला तर, काही वेळा त्वचा काळी पडू शकते.

जेव्हा Hair removal साठी रेझरचा (razor) वापर केला जातो, तेव्हा मिळणारा रिझल्ट हा Immediate आणि वेदनारहित असतो. पण यात सुद्धा निघणारे केस हे वरच्यावर निघतात, मूळापासून नाही. त्यामुळे नंतर केस पटकन येतात. काही वेळा रेझर वापरताना त्वचा कापली जाऊ शकते, लालसरपणा येऊ शकतो. नंतर येणारे केस हे जाडसर वाटतात. कारण, केसांचा नवीन येणारा भाग हा बोथट येतो, त्याला टोक नसते.

Hair removal machine जी बाजारात मिळतात, त्यांना Epilators (एपिलेटर्स) म्हणतात. या मशीनमुळे केस मूळासकट आढले जाऊन निघतात; त्यामुळे ही पद्धत थोडी वेदनादायी आहे. पण Hair growth खूप झाली असेल तर Epilators हे त्रासदायक होऊ शकते. कमी Hair growth वर हे चांगले काम करते. त्यात सुद्धा skin irritation होऊ शकते.

हेही वाचा – Skin care : मेक-अप करताना रंगसंगतीकडे लक्ष द्या

यात तुम्ही तुमच्या comfort नुसार पद्धत निवडलीत तरीही नंतर आवश्यक ती काळजी ही घेतलीच पाहिजे. त्याची महिती वर दिलेलीच आहे.

Threading ही सुद्धा Hair removal ची एक पद्धत आहे. सामान्यत: ही प‌द्धत Facial Hair Removal साठी वापरली जाते; जसे की eyebrow, upper lip, chin इत्यादी.

आता पुढच्या भागात आपण केसांबद्दलची माहिती बघू…

(क्रमश:)

lee.parulekar@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!