Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeआरोग्यSkin Care : कोरडी त्वचा आणि त्यावर वापरायची उत्पादने

Skin Care : कोरडी त्वचा आणि त्यावर वापरायची उत्पादने

लीना जोशी परुळेकर

मागच्या भागात आपण त्वचेचा pH आणि तेलकट त्वचेवर कुठल्या प्रकारची उत्पादने वापरावीत ते पाहिले. आता आपण कोरडी त्वचा आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची उत्पादने वापरावीत, ते पाहू.

कोरड्या त्वचेचा pH हा 5.5 या range च्या पुढे असतो, म्हणजेच त्वचेच्या नैसर्गिक pH range पेक्षा जास्त. थोडक्यात कोरडी त्वचा ही थोड्याफार प्रमाणात alkaline असण्याकडे झुकलेली असते. कोरड्या त्वचेत sebum Secretion चे प्रमाण कमी असते. म्हणजेच, त्वचेत नैसर्गिक तेल बनण्याचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळेच या प्रकारच्या त्वचेवर अशी उत्पादने वापरली जातात, जी तेल आणि पाणी यांच्या मिश्रणातून बनवलेली असतात. ही उत्पादने, Cream base असतात आणि Cream base असल्यामुळे Heavy असतात. ही उत्पादने त्वचेत शोषली गेल्यावर त्वचेवर एक प्रकारचे barrier तयार करतात, ज्यामुळे त्वचेतील moisture त्वचेत अडकून राहिल्यामुळे त्वचा जास्त वेळ Hydrate रहाते.

कोरड्या त्वचेवर रोज दिवसा CTMS आणि रात्री CTN हे Plan वापरले गेले पाहिजेत.

हेही वाचा – त्वचा आणि त्वचेवर परिणाम करणारे घटक

कोरड्या त्वचेसाठी

  • Cleansing : Cleanser हे Cream base असणे गरजेचे आहे.
  • Toning : Toner हे Alcohol free असणे गरजेचे आहे. सामान्यतः या toners मध्ये glycerine, rose water इत्यादी ingredients असतात. ज्यामुळे त्वचा hydrate रहाण्यास मदत मिळते. कोरड्या त्वचेला काही वेळा दाह जाणवतो, तो दाह कमी करण्यास आणि त्वचा शांत / थंड होण्यास हा toner फायदेशीर ठरतो.
  • Moisturizing : कोरड्या त्वचेवर Cream base moisturizer वापरावीत.
  • Sunscreen : सामान्यत: Sunscreen ही Lotion base, Gel base आणि Cream base या तिन्ही प्रकारात उपलब्ध आहेत. ज्यांना सतत बाहर जावे लागते, त्यांनी Cream base Sunscreen वापरणे चांगले. जे Indoor जास्त वेळ असतात त्यांनी Lotion / Gel base Sunscreen वापरायला हरकत नाही.

रात्री आपण CTN Plan follow करणार आहोत. त्यात आपण Cleansing, Toning आणि मग Nourishing करणार आहोत. Nourishing म्हणजे Heavy Night Creamचा वापर, जो कोरड्या त्वचेसाठी गरजेचा आहे.

झोपेत आपल्या त्वचेचे repair (दुरुस्ती) आणि regeneration (नवीन त्वचा तयार होणे) ही प्रक्रिया जास्त actively सुरु असते. रात्री झोपायच्या आधी Nourishing cream लावल्यामुळे हे cream कोरड्या त्वचेच्या repair आणि regenerationमध्ये Hydration आणि काही प्रमाणात nutrients पुरवण्याचे काम करतात, जी या त्वचेची गरज असते.

कोरड्या त्वचेला वाफ घेण्याची गरज नसते. वाफ घेतल्याने त्वचेची रंध्रे मोकळी होऊन त्यातून excess oil बाहेर पडून त्वचा साफ होते. आता मुळातच कोरड्या त्वचेत तेलाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वाफ घेतल्यावर त्वचा अजूनच कोरडी पडते.

कोरड्या त्वचेवर scrub हा आठवड्यातून एकदा किंवा त्वचा फारच कोरडी असल्यास पंधरवड्यातून एकदा वापरावा. कोरड्या त्वचेवर वापरायचा Scrub हा non- granulated असावा, म्हणजेच गंधाप्रमाणे गुळगुळीत असावा. गुळगुळीतपणामुळे Scrub कोढताना त्वचेवर त्याचे अतिघर्षण होणार नाही आणि त्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही.

कोरड्या त्वचेवर mask हा आठवड्यातून दोन वेळा वापरू शकतो. non- setting (पूर्णत: कोरडे न होणारे) mask हे कोरड्या त्वचेसाठी जास्त चांगले असतात.

हेही वाचा – Skin care : उत्पादने वापरण्यापूर्वी आपल्या त्वचेचा pH जाणून घ्या

जेव्हा आपण आठवड्यातून एकदा Scrub आणि mask वापरू तेव्हा प्रथम cleansing करावे. मग Scrub वापरावा. नंतर थोडे moisturizing cream लावून त्यावर mask वापरावा. Mask काढल्यावर toning, moisturizing करावे आणि sunscreen लावावे.

जेव्हा नुसता mask वापरायचा असेल तेव्हा cleansing नंतर mask वापरावा. त्यानंतर toning करून Moisturizer आणि Sunscreen लावावे.

पुढच्या भागात आपण मिश्र आणि संवेदनशील त्वचेवर कुठली उत्पादने वापरावीत ते पाहूया.

(क्रमशः)

lee.parulekar@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!