हर्षा गुप्ते
साहित्य
- ताजे (फ्रोजन) मटार – 1 वाटी
- शिजवलेला भात – 1 वाटी (शिळा चालेल)
- रवा – 1 वाटी
- ENO – 1 पाकीट
- आले – अर्धा इंच
- मीठ – चवीनुसार
- हिरवी मिरची – आवडीनुसार
- दही – अर्धी वाटी
- साखर – 2 चमचे (आवडीप्रमाणे)
- कोथिंबीर – पाव वाटी
- हिंग – 1 लहान चमचा
- मोहरी – 1 लहान चमचा
- कढीपत्ता – 11 ते 12 पाने
एकूण कालावधी – अर्धा तास
पुरवठा संख्या – साधारण 4 व्यक्तींसाठी
हेही वाचा – Recipe : रव्याचे खमंग बन
कृती
- मटार, मिरची, आलं, कोथिंबीर, भात, दही हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्या.
- त्यानंतर हे मिश्रण एका वाडग्यात काढून, त्यात रवा घालून ढवळा. ते भजीच्या पिठापेक्षा थोड घट्ट असले तरी चालेल.
- त्यात मीठ, साखर घालून रवा फुगण्यासाठी थोडा वेळ ठेवा.
- तोपर्यंत भांड्यात पाणी घेऊन ते गरम करायला ठेवा.
- पाण्याला ‘मुंगेरी’ आधण आले की, ढोकळा पिठात एक पाकीट ENO घालून फेटून घ्या.
- एका डब्याला किंवा फ्लॅट भांड्याला तेल लावून ढोकळ्याचे मिश्रण त्यात ओता.
- नंतर 20 मिनिटे मध्यम आचेवर ढोकळ्याचे मिश्रण ठेवून एक वाफ काढून घ्या.
- गॅस बंद करून पाच मिनिटे थांबा. तोवर हिंग, मोहरी, कढीपत्ता यांची फोडणी करून त्यात अर्धी वाटी पाणी उकळून घ्या.
- ढोकळ्याचे मिश्रणाची वाफ जिरली की, डबा बाहेर काढून तो उपडा करून ठेवा.
- डबा बाजूला केल्यावर ढोकळ्याच्या वड्या पाडून वरून फोडणीचे पाणी पसरवून घाला. ढोकळा पाणी शोषून घेईल.
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी
टिप्स
- या ढोकळ्याच्या वर बारीक चिरलेली कोथिंबीर, खवलेला नारळ, शेव, डाळिंबाचे दाणे, किसलेल चीज आवडीप्रमाणे ढोकळ्यावर पसरवून सजवा.
- मटार ढोकळा चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.
- मुंगेरी आधण म्हणजे पाणी तापताना भांड्यात छोटे ठिपके तयार होतात. ते मुंग्या आल्यासारखे दिसते, त्याला मुंगेरी आधण म्हणतात.
रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


