Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeआरोग्यAyurveda : वसंत ऋतुचर्या

Ayurveda : वसंत ऋतुचर्या

डॉ. प्रिया गुमास्ते

वसंत (Spring) हा शिशिर ऋतूनंतर येणारा आदान काळातील दुसरा ऋतू. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत! शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा – त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा म्हणजे वसंत ऋतू.

महिने – चैत्र  आणि  वैशाख (Mid March to Mid May)

भारतासारख्या अतिविशाल देशात, नैसर्गिक वैविध्यामुळे, निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ-फाल्गुन, काही ठिकाणी फाल्गुन-चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र-वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो.

ऋतू वर्णन

वसन्ते च समागत्य नराः कुसुमोत्सवम्।
कुर्वन्ति परमां प्रीतिं, वनं दृष्ट्वा मनोहरम्॥

अर्थ – वसंत ऋतूच्या आगमनामुळे सर्व मनुष्यगण फुलांचे उत्सव साजरे करतात. सुंदर जंगले बघून सर्वजण प्रसन्न होतात.

दोष आणि वसंत ऋतू

कफश्चितो हि शिशिरे वसन्तेऽर्कांशुतापितः । हत्वाग्निं कुरुते रोगानतस्तं त्वरया जयेत् ॥

शिशिर ऋतूत साठलेला कफ, वसंत ऋतूत ‘अर्क’ म्हणजेच सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो. त्यामुळे शरीरात अग्निमांद्य होते. शरीराची पचनक्रिया कमी होते आणि त्यामुळे निरनिराळे आजार उद्भवू शकतात. हे आजार टाळण्यासाठी योग्य आहार आणि विहाराची आवश्यकता असते.

हेही वाचा – Ayurveda : आदान काल आणि विसर्ग काल

वसंत ऋतूतील योग्य आहार

पुराणयवगोधूमक्षौरजाङ्गलशूल्यभुक् |

  • पचनक्रिया मंदावल्याने सहज पचणारे पदार्थ खावेत.
  • या ऋतूत धान्यांमध्ये जुने गहू, तांदूळ, जुने बार्ली (यव) खाण्याची शिफारस केली जाते.
  • डाळींमध्ये, मसूर, मूग इत्यादी पदार्थ खावेत.
  • कडू, कटू (तिखट), कशाय (तुरट) चवीचे पदार्थ खावेत.
  • आहारात मधदेखील घ्यावा. त्यामुळे वाढलेला कफ कमी करण्यासाठी मदत होते.
  • या ऋतूत आसव (fermented infusion), अरिष्ट (fermented decoction),सिद्धू (fermented sugarcane juice), पाण्यात मिसळलेले मध आणि चंदनाच्या (चंदनाचे लाकूड) अर्काने उकळलेले पाणी यासारखे पेये देखील मदत करतात. आंब्याच्या रसाचे सेवन करावे.

वसंत ऋतूतील योग्य विहार म्हणजेच जीवनशैली

तीक्ष्णैर्वमननस्याद्यैर्लघुरूक्षैश्च भोजनैः ।व्यायामोद्वर्त्तनाघातैर्जित्वा श्लेष्माणमुल्वणम् ॥
स्नातोऽनुलिप्तः कर्पूरचन्दनागुरुकुङ्कुमैः । ॥

  • आंघोळीसाठी कोमट पाणी वापरणे उपयुक्त मानले जाते.
  • वसंत ऋतू दरम्यान व्यायाम करणे आवश्यक आहे.
  • चंदन, केसर, अगरूच्या पावडरने मालिश म्हणजेच उद्वर्तन करण्याचा सल्ला दिला जातो. कवल (गुळणी करणे), औषधी वनस्पती वापरून धूम पान करणे यामुळे कफ कमी होतो.
  • तसेच, वाढलेला कफ कमी करण्यासाठी वमन, नस्य यासारख्या पंचकर्म क्रियांचा उपयोग करता येतो.

वसंत ऋतूत कोणत्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात ते आता पाहू –

गुरुशीतदिवास्वप्नस्निग्धाम्लमधुरांस्त्यजेत् ||

पचायला जड अन्न, थंड अन्न, आंबट, गोड आणि चरबीयुक्त पदार्थ टाळावेत. कारण, त्यामुळे कफ वाढतो. तसेच दिवास्वप्न म्हणजेच दिवसा झोपणे टाळावे.

वासंतिक वमन

वमन ही एक पंचकर्म चिकित्सा आहे. प्रकुपित कफावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे वमन पंचकर्म. वमन म्हणजे उलटीद्वारे शरीरातील अतिरिक्त दोष बाहेर काढणे. आता उलटीद्वारे शरीरातील घाण बाहेर काढणं, हे थोडंस किळसवाणे वाटत असलं तरी, याचे परिणाम बघता, हे कर्म खरंच खूप प्रभावशाली आहे.

हेही वाचा – Ayurveda : शिशिर ऋतुचर्या

वासंतिका वमन हे वसंत ऋतूमध्ये साधारण मार्च आणि एप्रिल महिन्यात केले जाते जेणेकरून वाढलेला कफदोष नष्ट होतो आणि त्यामुळे कफविकार तसेच त्याच्या जागी उद्भवणारे किंवा स्थिर होणारे पित्तविकार बरे करता येते.

उदाहरणार्थ –

  • दमा (Bronchial Asthama)
  • श्वासनलिकेत येणारी सूज (Allergic Bronchitis)
  • नासिकाशोथ (sinusitis)
  • मायग्रेन
  • हायपरअ‍ॅसिडिटी, अपचन, लठ्ठपणा, मधुमेह, सोरायसिस, एक्झिमा, शीत पित्त (Urticaria) इत्यादी आजार टाळता येतात.

नस्य

‘नस्य’ ही सुद्धा पंचकर्मातील एक आयुर्वेदिक उपचारपद्धती आहे .नाक हे मानवी मेंदूचे प्रवेशद्वार आहे आणि विविध आजार बरे करण्यास मदत करू शकते. या पंचकर्म पद्धतीत रुग्णाच्या नाकपुड्यात औषधी तेल किंवा हर्बल काढा हा बिंदू रुपात (drops) घातला जातो. डोके आणि मानेच्या क्षेत्रातील वाढलेल्या कफामुळे होणारे डोकेदुखी (Sinusitis), मायग्रेन आणि इतर श्वसन समस्यांसह अनेक विकार नस्य देऊन बरे करता येतात.

परंतु या शास्त्रोक्त पद्धतीने केले जाणारे उपचार असून योग्य परिणामांसाठी त्या निष्णात आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच कराव्यात.

अशाप्रकारे योग्य आहार, विहार पाळून हा प्रसन्न करणारा सुंदर असा वसंत ऋतू आपण आनंदात घालवू शकतो.

(लेखिका ही आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सलटन्ट आहे.)

Mobile : 9819340378

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!