सायली कान्हेरे
थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणात गरमागरम सूप प्यायला खूप मजा येते. पण ही सूप्स करायला काहींना कठीण वाटतात. आज मी एका सोप्या सूपची रेसिपी सांगणार आहे. जी करायला सोपी आणि खूप टेस्टी आहे. तुम्हीही नक्की करून बघा.
साहित्य
- टोमॅटो – 5
- छोटा कांदा – 1
- छोटा बटाटा – 1
- लसूण- 3 पाकळ्या
- आलं – 1 इंच
- मीठ – चवीनुसार
- साखर – चवीनुसार
- मिरी पावडर – पाव टीस्पून
- कोथिंबीर – मूठभर
पुरवठा संख्या – चार व्यक्तींसाठी
हेही वाचा – Recipe : एकदम टेस्टी कुळीथ सूप
तयारीसाठी लागणार वेळ – सर्व भाज्या चिरण्यासाठी 10 मिनिटे
शिजवून घ्यायला – 15 मिनिटे
मिक्सरमधून फिरवायला – 10 मिनिटे
एकूण वेळ – 35 मिनिटे
कृती
- टोमॅटो, कांदा, बटाटा यांच्या मोठ्या फोडी करून घ्या.
- छोट्या कुकरमध्ये या फोडी, लसूण, आलं घालून 4 शिट्या करा.
- शिजवून घेतलेले मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्या.
- आता हे मिश्रण गाळण्याने गाळून घ्या.
- नंतर जाड बुडाच्या कढईत गाळून घेतलेले मिश्रण घेऊन त्यात आवश्यक तेवढे पाणी टाका. हे सूप खूप पातळ नसते, हे लक्षात घेऊन सूपचा दाटसरपणा ठेवा.
- एक उकळी आल्यावर त्यात चवीनुसार मीठ, साखर, मिरी पावडर घाला.
- या सूपमध्ये बटाटा घातल्याने छान दाटपणा येतो. त्यामुळे वेगळे कॉर्नफ्लोअर लावायची गरज नसते.
- सर्व्ह करताना कोथिंबीर बारीक चिरून घालावी.
हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड
टिप्स
- टोमॅटो निवडताना शक्यतो रसरशीत, लालबुंद घ्या. यामुळे सूपला छान रंग येतो.
- आवडत असेल तर बीटाचा एखादा लहान तुकडा टोमॅटो शिजवताना त्यात घाला. रंग सुरेख येतो.
- ब्रेडचे चौकोनी तुकडे करून तळून किंवा बटरवर हलकेसे परतून ते सूपमध्ये घालता येतील.
- थोडेसे किसलेले चीजही तुम्ही सूपमध्ये वरून घेऊ शकता. त्यामुळे एक वेगळी चव येते.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


