Monday, February 23, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe : पालक आणि कांद्याच्या पातीचे रायते

Recipe : पालक आणि कांद्याच्या पातीचे रायते

माधवी जोशी माहुलकर

पालकाचे वरण, डाळभाजी, पालक पनीर, मुगाची डाळ घालून नाहीतर लसणाच्या पाकळ्या वापरून पालक लसुणी अशा भाज्या तसेच पालक पुरी, पराठे, पुलाव वगैरे तर प्रकार नेहमीच होतात, परंतु पालक आणि कांद्याच्या हिरव्या पातीचे रायते तुम्ही कधी करून पाहिले आहे का? नसेल केले तर, खाली दिलेल्या पद्धतीने करून पाहा निश्चितच तुम्हाला ते आवडेल, याची मला खात्री आहे.

साहित्य

  • कोवळा पालक – एक वाटी (बारीक चिरलेला)
  • कांद्याची हिरवी पात – एक वाटी (बारीक चिरलेली)
  • कोथिंबीर – मूठभर (बारीक चिरलेली)
  • हिरव्या मिरच्या – 4 (बारीक कापलेले तुकडे)
  • शेंगदाण्याचे कूट – 3 टेबलस्पून
  • घट्ट आणि गोड दही – 4 टेबलस्पून
  • साखर – चिमूटभर
  • मीठ – चवीपुरते
  • तेल – 2 टेबलस्पून
  • मोहरी – 1 चमचा
  • जिरे – 1 चमचा
  • मेथी दाणे – 4 ते 5
  • हिंग – 1 लहान चमचा

हेही वाचा – Recipe : साबुदाणा, भगर, बटाटा पॅटिस विथ ग्रीन चटणी!

कृती

  1. स्वच्छ धुवून बारीक चिरलेली पालकाची पाने आणि हिरव्या कांद्याची पात एक बाऊलमध्ये मिक्स करून घ्यावी.
  2. नंतर त्यात जाडसर शेंगदाण्याचे कूट घालून बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकावी आणि सर्व मिश्रण एकत्र करावे.
  3. मग त्यात चार चमचे गोड दही, चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ आणि मूठभर कोथिंबीर टाकून सर्व साहित्य परत एकदा मिक्स करावे.
  4. एका छोट्या कढईत दोन चमचे तेल चाकून त्यात मोहरी, जिरे, मेथी दाणे आणि हिंगाची फोडणी करून ती या पालक, कांद्याच्या रायत्यावर टाकून रायते पुन्हा एकदा छान मिक्स करावे. जेवताना तोंडी लावण्यासाठी हे पालक आणि कांद्याच्या पातीचे रायते छान लागते.

हेही वाचा – Recipe : मोड आलेल्या मेथीदाण्यांचे रुचकर लोणचे!


तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!