हर्षा गुप्ते
घरात झटपट, पण स्वादिष्ट काय करायचं? हा प्रश्न गृहिणींच्या मनात असतो. त्यातही असा पदार्थ हवा जो, मुलांना आवडणारा हवा! घरात उपलब्ध सामग्रीत हा पदार्थ बनवायचा असतो. मग अशावेळी ‘बन’ हा प्रकार कामाला येतो. साधारण 40 ते 45 मिनिटांत बन डोसा तयार करता येतो. तर, अर्ध्या तासात खमंग असा रव्याचा बन तयार करता येतो. पाहूयात रव्याचा बन करण्याची रेसिपी. बच्चे कंपनीला हा पदार्थ नक्की आवडेल.
साहित्य
- रवा – दीड वाटी
- दही – अर्धी वाटी
- पाणी – अर्धा ग्लास
- कांदा – 1 मध्यम आकाराचा
- टोमॅटो – 1 मध्यम आकाराचा
- भोपळी मिरची – अर्धी
- मटार – पाव वाटी
- लसूण – 10 पाकळ्या
- आले – अर्धा इंच
- हिरव्या मिरच्या – आवडीप्रमाणे
- थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
- मीठ – चवीनुसार
- ENO – 1 पाकिट
- तेल – 1 पळी
- तीळ – 1 लहान चमचा
- फोडणी पॅन – 1
हेही वाचा – Recipe : भाताचे स्वादिष्ट कटलेट आणि दही ब्रेड
कृती
- दीड वाटी रव्यात अर्धा वाटी दही आणि थोडे पाणी घालून बॅटर बनवून घ्या.
- चॉपरच्या डब्यात कांदा, टोमॅटो, मटार, भोपळी मिरची, आले, लसूण, मिरची, कोथिंबीर सगळे घालून बारीक करून घ्या.
- नंतर हे मिश्रण आणि चवीनुसार मीठ रव्याच्या बॅटरमध्ये घालून ढवळून घ्या.
- मग एक पाकीट ENO त्यात घाला. Eno वर चमचाभर पाणी घालून सगळं नीट ढवळून घ्या.
- फोडणी पॅनमध्ये थोडसं तेल आणि चिमूटभर तीळ घालून दोन चमचे बॅटर घालावे.
- गॅसच्या मंद आचेवर, फोडणी पॅनवर झाकण देऊन हे बॅटर शिजवा.
- एक बाजूने बन खरपूस झाल्यानंतर बन उलटवून त्याची दुसरी बाजूही खरपूस करा.
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी
एकूण कालावधी – साधारण अर्धा तास
पुरवठा संख्या – चार व्यक्तींसाठी
टिप्स
- गरमागरम बन चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा, खूप छान लागतात.
- चॉपरचा डबा नसेल तर, कांदा, टोमॅटो, मटार, भोपळी मिरची, आले, लसूण, मिरची, कोथिंबीर मिक्सरमधून फिरवा. पण ते जरा सरसरीत ठेवा.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


