आराधना जोशी
साहित्य
- बारीक रवा – 1 वाटी
- दही – अर्धी वाटी
- मीठ – चवीनुसार
- पाणी – साधारणपणे 1 वाटी
- तेल – दीड टेबलस्पून
- हिंग – अर्धा टीस्पून
- मोहरी – 1 टीस्पून
- बारीक चिरलेली हिरवी मिरची – 2
- चण्याची डाळ – 2 टीस्पून
- उडदाची डाळ – 2 टीस्पून
- किसलेले आले – 2 टीस्पून
- बारीक चिरलेला कांदा – अर्धी वाटी
- कढीलिंब – 10 ते 12 पाने
- बारीक चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी
- बेकिंग सोडा – 1 ते दीड टीस्पून
- तेल – डोशासाठी
पुरवठा संख्या : 2 जणांसाठी
तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे
मिश्रण मुरण्यासाठी – 20 मिनीटे
डोसा तयार करण्यासाठी लागणारा वेळ : 10 मिनिटे
एकूण वेळ : 40 मिनिटे
हेही वाचा – Recipe : मिक्स हर्ब राईस आणि चीज स्पिनॅच सॉस
कृती
- मिक्सरच्या भांड्यात रवा, दही, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून गुळगुळीत पीठ वाटून घ्या.
- हे वाटलेलं पीठ एका भांड्यात काढा.
- आता फोडणीसाठी एका छोट्या कढईत तेल गरम करा. तेल गरम झाले की, त्यात हिंग, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात चण्याची डाळ, उडदाची डाळ घाला. दोन्ही डाळी छान मिक्स करा.
- आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं, कांदा आणि कढीलिंब घाला.
- कांदा फार शिजवायचा नाही. एखादा मिनिट कांदा परतून गॅस बंद करा.
- आता ही फोडणी रवा दह्याच्या वाटून घेतलेल्या मिश्रणात घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. छान मिक्स करा. थोडावेळ बाजूला ठेवा. म्हणजे रवा चांगला फुलेल. मिश्रण 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा.
- डोशाला बनसारखा आकार द्यायचा आहे. त्यामुळे लहान तडका पॅन किंवा तशा आकाराचे एखादं खोलगट छोटं भांडं यासाठी लागणार आहे.
- तडका पॅन मंद गॅसवर गरम करायला ठेवा. तोवर रव्याच्या मिश्रणात बेकिंग सोडा किंवा इनो घालून मिश्रण चांगले फेटून घ्या.
- गरम तडका पॅनमध्ये पाव चमचा तेल घालून ते सगळीकडे पसरवून घ्या. मग त्यात एक डाव रव्याचे मिश्रण घाला.
- एक बाजू छान गोल्डन कलरची झाली की चमच्याच्या मदतीने डोसा उलटला आणि दुसरी बाजूही छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या. गरज असेल तर कडांना थोडे तेल घाला.
- दोन्ही बाजूंनी छान भाजून झाला की, प्लेटमध्ये काढून हिरवी चटणी किंवा टोमॅटो चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
विशेष आहार माहिती : शाकाहारी
टीप
- हा डोसा इन्स्टंट डोसा म्हणून दिला आहे.
- बेकिंग सोडा किंवा इनो वापरायचा नसेल तर घरी तयार केलेल्या रेग्युलर डोशाच्या मिश्रणाचाही वरील पद्धतीने बन डोसा करता येईल.
- वरील मिश्रणात साधारणपणे 6 बन डोसे तयार होतील. अर्थात तडका पॅनच्या आकारावर देखील डोसे कमी जास्त होऊ शकतात.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.