Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके
    अध्यात्म

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    Team AvaantarBy Team AvaantarApril 27, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    इहींचि दोहीं डोळां । पाहावें विश्वरूपा सकळा । तोहि श्रीकृष्णें सोहळा । पुरविला ऐसा ॥196॥

    अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् । अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥10॥

    मग तेथ सैंघ देखे वदनें । जैसी रमानायकाची राजभुवनें । नाना प्रकटलीं निधानें । लावण्यश्रियेचीं ॥197॥ कीं आनंदाचीं वनें सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली । तैसीं मनोहरें देखिलीं । हरीचीं वक्त्रें तेणें ॥198॥ तयांही माजीं एकैकें । सावियाचि भयानकें । काळरात्रीचीं कटकें । उठावलीं जैसीं ॥199॥ कीं यें मृत्यूसीचि मुखें जाहलीं । हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं । कीं महाकुंडें उघडलीं । प्रळयानळाचीं ॥200॥ तैसीं अद्भुतें भयासुरें । तेथ वदनें देखिलीं वीरें । आणिकें असाधारणें साळंकारें । सौम्यें बहुतें ॥201॥ पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें । परि वदनांचा शेवटु न टके । मग लोचन तें कवतिकें । लागला पाहों ॥202॥ तंव नानावर्णें कमळवनें । कीं विकासिलीं तैसे अर्जुनें । डोळे देखिले पालिंगनें । आदित्यांचीं ॥203॥ तेथेंचि कृष्णमेघाचिया दाटी- । माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी । तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळीं ॥204॥ हें एकेक आश्चर्य पाहतां । तिये एकेचि रूपीं पांडुसुता । दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ॥205॥ मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट कें दोर्दंडें । ऐसी वाढविताहे कोडें । चाड देखावयाची ॥206॥ तेथ भाग्यनिधि पार्था । कां विफलत्व होईल मनोरथा । काय पिनाकपाणीचां भातां । वायकांडीं आहाती ॥207॥ ना तरी चतुराननाचिये वाचे । आहाती लटिकिया अक्षरांचे सांचे । म्हणोनि साद्यंतपण अपारांचे । देखिलें तेणें ॥208॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे

    अर्थ

    याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे, अशी त्याची इच्छा होती. त्या इच्छेचा लळा श्रीकृष्णांनी याप्रमाणे पुरविला. ॥196॥

    ज्यामध्ये अनेक मुखे आणि डोळे होते, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य अलंकारांनी युक्त, अनेक दिव्य आयुधे धारण केलेले हात, ॥10॥

    मग तेथे त्याने अनेक मुखे पाहिली. ती मुखे (जणू काय) लक्ष्मीकांत श्रीकृष्ण यांच्या राजमंदिरासारखी होती अथवा सौंदर्यलक्ष्मीची प्रकट झालेली भांडारेच होती. ॥197॥ किंवा आनंदाचे बगीचेच बहराला आलेले किंवा जणू काय सौंदर्याला राज्य प्राप्त झाले, तशी त्याने मन हरण करणारी श्रीकृष्णाची मुखे पाहिली. ॥198॥ त्यात देखील कित्येक मुखे जणू काय प्रळयरात्रीच्या सैन्याने उठाव केला आहे, अशी सहजच भयंकर होती. ॥199॥ किंवा ही मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेली आहेत, अथवा जणू काय भयाचे किल्लेच रचलेले आहेत, अथवा प्रळायाग्नीची महाकुंडेच उघडली आहेत, ॥200॥ अशी अद्भुत आणि भयंकर मुखे शूर अर्जुनाने तेथे (विश्वरूपात) पाहिली. आणखी कितीएक निरुपम अलंकारयुक्त अशी मुखे पाहिली आणि पुष्कळ सौम्य मुखे पाहिली. ॥201॥ अर्जुनाने ती मुखे ज्ञानदृष्टीने पाहिली, परंतु मुखांचा अंत लागेना, म्हणून मुखे पाहणे सोडून देऊन, तो मग कौतुकाने (विश्वरूपाचे) डोळे पाहू लागला. ॥202॥ तेव्हा जणू काय अनेक रंगांच्या कमळांचे बाग प्रफुल्लित झाले आहेत, तसे ते (विस्तृत आणि तेजाने) सूर्याच्या समुदायासारखे डोळे अर्जुनाने पाहिले. ॥203॥ डोळे पाहात होता, तेथेच काळ्या मेघांच्या गर्दीमध्ये प्रलयकाळची वीज चमकावी तशा अग्नीने पिंगट झालेल्या दृष्टी, चढवलेल्या भिवयांच्या (भुवयांच्या) खाली त्याने पाहिल्या. ॥204॥ हे एक एक आश्चर्य पाहात असता, अर्जुनाला त्या एकाच विश्वरूपामध्ये दर्शनाची अनेकता फलद्रूप झाली. ॥205॥ मग अर्जुन म्हणाला, विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत? मुकुट कोठे आहे? आणि त्या बळकट भुजा कोठे आहेत? अशी कौतुकाने तो पाहण्याची इच्छा वाढवीत आहे. ॥206॥ तेथे अर्जुन दैवाचा ठेवा असल्याने त्याची इच्छा व्यर्थ का होईल? पिनाक नावाचे धनुष्य हातात असलेल्या शंकराच्या भात्यामध्ये निष्फळ बाण आहेत काय? ॥207॥ अथवा ब्रह्मदेवाच्या जिव्हेवर खोट्या अक्षरांचे ठसे असतात काय? म्हणून अर्जुनाने अमर्याद विश्वाचा आदि आणि अंत पाहिला. ॥208॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : सा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : सा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें

    April 26, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे

    April 25, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    April 24, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : सा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें

    By Team AvaantarApril 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें । तया चमत्काराचें एकार्णव जाहलें । चित्त समाजीं…

    Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे

    April 25, 2026

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    April 24, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026

    चांगुलपणाचा असाही अनुभव

    April 27, 2026

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 280
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 398
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 582
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.