हर्षा गुप्ते
कोबीचे पॅनकेक
एकूण कालावधी – अर्धा तास.
पुरवठा संख्या – दोन व्यक्तींसाठी
साहित्य
- बारीक चिरलेला कोबी – 1 वाटी
- बारीक चिरलेला गाजर – अर्धी वाटी
- कांदा – 1 मध्यम आकाराचा
- लसूण – 5-6 पाकळ्या
- आले – अर्धा इंच
- हिरव्या मिरच्या – आवडीनुसार
- बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धी वाटी
- जिरे – 1 लहान चमचा
- अर्ध्या लिंबाचा रस
- तेल – एक पळीभर
- बेसन – 2 चमचे
- कणीक – जरुरीपुरते
- मीठ – चवीनुसार
- साखर – चवीनुसार
कृती
- खूप बारीक चिरलेला कोबी, गाजर, कांदा, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्या.
- नंतर त्यात मीठ, साखर, लिंबाचा रस घालून नीट कालवून घ्या.
- या मिश्रणाला थोडं पाणी सुटलं की, त्यात बेसन आणि थोडं थोडं कणीक घालून कालवून घ्या.
- तवा तापवून त्यावर तेल घालून, छोटे छोटे पॅनकेकचे मिश्रण तव्यावर पसरवून खरपूस fry करून घ्या.
- चटणी, सॉस आणि दह्यासोबत मस्त लागते.
हेही वाचा – Recipe : विविध भाज्यांचा उत्तप्पा
फ्लॉवरची भाजी
एकूण कालावधी – 20 मिनिटे
पुरवठा संख्या – 4 व्यक्तींसाठी
साहित्य
- फ्लॉवरचे तुरे – पाव किलो
- मोठा कांदा – 1
- मोठा टोमॅटो – 1
- हळद – 1 लहान चमचा
- तिखट – 1 लहान चमचा
- मीठ – चवीनुसार
- हिंग – चिमुटभर
- मोहरी – 1 लहान चमचा
- जीरे – 1 लहान चमचा
- तमालपत्र – 1
- दही – 2 चमचे
- बेसन – 2 चमचे
- साखर – चवीनुसार
हेही वाचा – Recipe : अनोखी अशी भरली अळूवडी!
कृती
- एका पातेल्यात हळद, मीठ आणि पाणी घेऊन त्यात फ्लॉवरचे तुरे घालून उकळून घ्या.
- उकळल्यावर पाणी काढून फ्लॉवर चाळणीवर निथळून घ्यावेत.
- आता कढईमध्ये तेल घेऊन त्यात हिंग, मोहरी, तमालपत्र यांची फोडणी करावी.
- या फोडणीत बारीक चिरलेला कांदा आणि चवीपुरते मीठ घाला.
- कांदा छान परतून घ्या. त्यात हळद आणि तिखट घालून पुन्हा परतून घ्या आणि त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढा.
- आता त्यात 2 चमचे बेसन घालून खमंग परतून घ्या. एक वाफ काढून घ्या.
- आता एका टोमॅटोची प्युरी घालून कांद्याचे मिश्रण पुन्हा परतून घ्या.
- त्यात 2 चमचे दही घालून त्यात चवीपुरती साखर घाला आणि पुन्हा एकदा परतून घ्या.
- आता त्यात वाफवलेले फ्लॉवरचे तुरे घालून एक वाफ काढून घ्या आणि नंतर वरून थोडी कोथिंबीर घाला.
- सर्व्ह करायला फ्लॉवरची भाजी तयार!


