आराधना जोशी
साहित्य
- तांदूळ – 1 वाटी
- हरभरा डाळ – पाव वाटी
- उडदाची डाळ – पाव वाटी
- धणे – पाव वाटी
- जिरे – 2 टेबलस्पून
- मेथी – अर्धा चमचा
- तिखट – 1 टेबलस्पून
- हळद – 1 टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- हिंग – पाव टीस्पून
- तीळ – 3 टेबलस्पून
- कणीक – 2 टेबलस्पून
- तेल – 3 टेबलस्पून (मोहन म्हणून)
- तेल – वडे तळण्यासाठी
- कोथिंबीर – अर्धी वाटी (चिरलेली)
पुरवठा संख्या : 7 ते 8 जणांसाठी
तयारीस लागणारा वेळ :
- तांदूळ धुवून वाळवून घेण्यासाठी – अर्धा तास
- भाजून घेण्यासाठी – 10 मिनिटे
- भरडा काढण्यासाठी – 5 मिनिटे
तळण्यासाठी लागणारा वेळ : 15 मिनिटे
एकूण वेळ : एक तास
विशेष आहार माहिती : शाकाहारी
हेही वाचा – Recipe : खमंग आणि रुचकर मूंगलेट
कृती
- तांदूळ स्वच्छ धुवून थोडावेळ चाळणीत निथळत ठेवा.
- नंतर स्वच्छ सुती कापडावर धुतलेले तांदूळ पसरवून पंख्याखाली अर्धा तास वाळत ठेवा.
- एका पातेल्यात हरभरा डाळ, उडदाची डाळ, धणे, जिरं, मेथी हे साहित्य एकत्र करून घ्या.
- अर्ध्या तासाने जाड बुडाची कढई गरम करून गॅस बंद करा.
- आता या गरम कढईत तांदूळ घालून ते भाजायला सुरुवात करा. हे करताना गॅस बंदच ठेवायचा आहे.
- तांदूळ गरम झाले की, हरभरा डाळ, उडदाची डाळ एकत्र केलेले साहित्य त्यात घाला. तेही जरा कोमट होईल इतपत परतून घ्या. या सगळ्यात गॅस बंदच ठेवायचा आहे.
- आता हे साहित्य पूर्ण गार झाल्यावर मिक्सरमधून त्याचा जाडसर भरडा काढून घ्या. हा भरडा एअर-टाइट डब्यात भरून ठेवा.
- वडे करताना तीन वाट्या भरडा बाऊलमध्ये घ्या. त्यात तिखट, हळद, चवीनुसार मीठ, हिंग, तीळ, कोथिंबीर घालून छान मिक्स करा.
- दुसरीकडे तीन टेबलस्पून तेल गरम करून या वड्याच्या मिश्रणावर घाला. सर्व परत एकदा नीट मिक्स करा.
- आता त्यात 2 टेबलस्पून कणीक आणि अर्धी वाटी गरम पाणी घालून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
- आता लागेल तसं कोमट पाणी घेऊन संपूर्ण पिठ भिजवावे. भिजवताना ते फार सैल नाही, फार घट्ट नाही अशाप्रकारे असावे.
- तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवावे.
- दूधाची प्लास्टीकची पिशवी घेऊन त्याला तेलाचा हात लावून त्यावर लिंबाएवढा वड्याच्या पिठाचा गोळा घेऊन तो हाताने खूप जाड नाही, खूप पातळ नाही अशाप्रकारे थापून घ्या.
- मध्यम आचेवर तेलात खरपूस तळून घ्या.
- भरडा वडा तयार आहे.
हेही वाचा – Recipe : मिक्स हर्ब राईस आणि चीज स्पिनॅच सॉस
टीप
- हे वडे पितृपक्षातील नेवैद्यासाठी करणार असाल तर याला मधे भोक पाडत नाही.
- वडा थापून करणं जमत नसेल तर लाटण्याला थोडंसं तेल लावून त्याने लाटून केले तरी चालतील.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
अवांतर, Recipe, delicious, स्वादिष्ट, भरडा वडा, वडा, थापलेला वडा, पितृपक्ष विशेष, Bharda Vada, Vada, Thaplela Vada, Pitrupaksha Special