Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: स्नेहा सुतार
भाग – 10 अचानक आकाशात वीज काडाडली आणि जुईली भानावर आली. घाबरलीच ती… थरथरली… पाऊस अचानक धो धो बरसू लागला… गडबडून बावरून गेलेल्या जुईलीला काहीच सुचले नाही. त्याने तिच्याकडे धावत जाऊन तिच्या हातातली छत्री घेतली आणि उघडली. आधी तिला जवळ ओढून छत्रीत घेतलं. तिच्या खांद्यावरचा हात तसाच ठेऊन तिचा खांदा दाबत तिला भानावर आणत तो म्हणाला, “ओय वेडू, मी आलोय!” “अरे, काय हे!!” एवढंच काय ते ती बोलू शकली आणि… वरचा पाऊस आणि डोळ्यातला पाऊस यांची चुरस सुरू झाली. “अरे वेडू, काय असं हे! चल आधी गाडीत बसुयात की, इथेच भिजत राहायचंय?” त्याने तिला गाडीपाशी आणलं. ड्राइव्हरच्या बाजूच्या सीटचं दार…
भाग – 9 कितीतरी वादळं, कामातले फेरफार, नवीन विचारांनी आजची मीटिंग संपली. तिला बरं वाटलं. आज अगदी मनापासून चर्चा, उकल झालेली बैठकीत. तिच्या कामगिरीसाठी तिचं कौतुकही झालं. बैठक संपली आणि गोवर्धन सरांशी बोलायचं म्हणून ती थांबली. काही महत्त्वाचा कंटेन्ट तयार करण्यासाठी तिला मार्गदर्शन लागणार होतं सरांचं. नोटपॅड काढून ती सरांसमोर उभी राहिली. सरांनी बोलता बोलता सहजच अनेक संदर्भ, पुस्तकांची नावे तिला सांगितली. सरांचे शब्द ती कानात आणि नोटपॅडवर भरभर नोंदवून घेत होती. तिच्या मनातील सर्व प्रश्नांची उकल झाल्यानंतर तिने सरांचा निरोप घेतला. सगळं आवरलं. हॅन्डबॅग घेतली. आणि मोबाइलच्या सेल्फी मोडवर एकदा स्वतःवर नजर टाकून ती जायला निघाली. सकाळपासून तिने कित्येकदा…
भाग – 8 किसी रंजिश को हवा दो के मैं जिंदा हूं अभी मुझको एहसास दिला दो के मैं जिंदा हूं अभी… स्पीकरवर मंद आवाजात गजल विरघळत होती आणि ती लॅपटॉप घेऊन खिडकीत काम करत होती. “आज जायचं नाही का गं कॉलेजला?” आईने तिच्या रूमच्या दरवाजावर येऊन विचारलं. “नाही गं. आज ऑन ड्युटी आहे मी. डिपार्टमेंटचं काम आहे एक. जायचंय थोड्यावेळाने तिकडेच. हे एवढं काम करून निघणार मी.” “अय्या, म्हणजे आज पण तिकडेच वाटतं तू. रस्ते काय म्हणतायत?” “रस्ते गप्प आहेत सगळे… माणसंच कण्हतायत, त्याचा आवाज ऐकू येतोय सगळीकडून.” “नाहीतर काय बाई, विकासकाका सांगत होते परवा यांना, रोज पर्वरीला जाईपर्यंत…
भाग – 7 आईने हाक मारली तशी ती भानावर आली. वाचत असलेल्या पुस्तकातली नायक, नायिका आज भेटणार होते. कॉफी शॉपमध्ये… नायिकेची तयारी चाललेली. पुन्हा आईची हाक ऐकू आली. तिने पुस्तक बंद करून ठेवलं. त्या आधी पान क्रमांक लक्षात ठेवला. एकवार पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून तिने हात फिरवला. Too good to be true – प्राजक्ता कोळी. या पुस्तकाचं मुखपृष्ठ तिला खूप आवडलेलं. पुन्हा आता आईची निर्वाणीची हाक ऐकू आली म्हणून ती लवकर उठून गेलीच नाहीतर, मग ओरडा ठरलेलाच. आईने किचनमध्ये ताटं मांडायला घेतलेली. तीही मदतीला लागली. जेवणं होऊन तिने भांडी घासायला घेतली. आईने किचन आवरायला घेतलं. सगळं आवरून थोडावेळ सगळे बोलत बसले. आन्टीकडली…
भाग – 6 अगरबत्तीचा मंद सुवास आणि सोबतच आईच्या पावलांचा आवाज… एकदम तिला प्रसन्न वाटलं. रात्र सरून पहाटेचा अंगणातला प्राजक्ताचा सडा… आंबोलीला कावळेसादला डोळे मिटून चेहऱ्यावर घेतलेले दवासारखे मऊसूत पावसाच्या थेंबांचे तुषार… अंबाबाईच्या मंदिरात पहिल्या पावलाला मंदिराच्या पायरीचा झालेला थंडगार स्पर्श… संध्याकाळच्या वेळी आईचं देवघरातून असं बाहेर येणं… सोबत अगरबत्ती आणि हातात दिवा… ती मागे देवघरात सोडून आलेल्या धूप आणि भीमसेनी कापराचा मंद सुवास… हे सगळं रंध्रारंध्रांना एक एक करून जागं करणारं… दिवसभराची मरगळ कुठल्या कुठे पळवणारं… आईने दार उघडलं… दोघीही एकमेकींना बघून हसल्या… आईचं स्तवन सुरू असल्यामुळे काही न बोलताच तिने तिला आत जायला वाट केली. घरी आल्यावर तिला…

