Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…
    ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    शोभा भडकेBy शोभा भडकेMarch 22, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, राम सिया विवाह, शिव आराधना विवाह, शिव आरू विवाह, लग्नाची खरेदी, आरूचे रडणे, रामचे आरूला समजावणे, सिया आरूची मैत्री, आरू आणि सिया,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 19

    राम  जाता जाता मधेच थांबला आणि मागे वळत पुन्हा शिवच्या समोर आला… त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला म्हणाला, “एकुलते एक जावई आहात तुम्ही असं दारातून जाणं बरं दिसत नाही, आत चला… तुमची आई आणि बहीणही आहे… त्यांनाही सोबत घेऊन जा,” असं म्हणून तो पुढे निघून गेला.

    “बरं, आता आम्ही निघतो. तसं तर सगळी तयारी तुम्हीच करताय, आम्हालाही आमच्या सुनेच्या स्वागताची तयारी करावी लागेल ना!” सुधा आत येणाऱ्या आरूकडे प्रेमाने पाहात म्हणाल्या.

    घरात आल्यावर समोर भावी सासूबाईंना आपल्याकडे हसताना पाहून फास्ट चालत आलेल्या आरूची चाल आपोआपच मंदावली आणि ती नजर झुकवत, हळू चालत त्यांच्याजवळ आली.

    सुधा आणि सिया निघण्याच्या तयारीत होत्या. कलावती, सरिता तसेच भावना पण तिथेच होत्या. बाकी घरातली पुरुष मंडळी लग्नाच्या तयारीत मग्न होती. काही पाहुणे पुण्यात आले आले होते, तर त्यांना आणायला आरूचे बाबा चौकात गेले होते.

    “आलीस का बाळा! झाली का खरेदी? आणि हे काय तू एकटीच आलीस? शिव तुला सोडायला आला नाही का? आणि खरेदीच्या बॅगा कुठे आहेत?” सुधा यांनी ती जवळ येताच प्रश्न विचारायला सुरुवात केली.

    अशा अचानक एव्हढ्या सगळ्या प्रश्नांनी आरू गोंधळून गेली… काय बोलावं ते तिला कळेना… त्यात तिची आई, आत्या पण चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन, तिच्याकडे रोखून पाहात होत्या.

    ‘आत्ता जर आपल्या तोंडून काही वेडवाकडं निघालं ना, तर आई यांच्या समोरच आपल्याला मारायला कमी करायची नाही! काय गरज होती आरू तुला जास्तीचा शहाणपणा करायची? महाग होते कपडे तर, तुला कुठं स्वतः काढून द्यायचे होते पैसे! त्यांचं त्यांनी बघितलं असतं ना काय ते?… आता यांना काय सांगू? हे पण गेले वाटतं बाहेरच्या बाहेरच! पण बरंच झालं… नाहीतर मी केलेला कारनामा सांगून माझी तक्रार केली असती… मग तर मला आईच्या हातून कोणीच वाचवू शकलं नसतं!’ आरू आपल्याच विचारात एकटक पाहात होती.

    सुधा काहीतरी विचारत आहेत, कलावतींचाही आवाज देऊन झाला, पण आरूचं काहीच लक्ष नाही!

    “आरू… आरू.. आगं लक्ष कुठाय तुझं? काय झालंय?” भावनाने तिला गदागदा हलवत भानावर आणलं.

    “हं… क… काय झालं?” ती सगळ्यांकडे गोंधळून पाहू लागली.

    “तेच विचारतोय आम्ही सगळे… काय झालं म्हणून? कसला विचार करत होतीस?” भावना.

    “नाही… कसला नाही… मी कुठे काय विचार करत होते!” आरू अडखळत, आईकडे एक नजर पाहून, आवंढा गिळत कशीबशी सुधाकडे पाहून म्हणाली. कारण आत्ता कलावती तिच्याकडे अतिशय रागाने पाहात होती…

    “मॉम… लग्नासाठी विशेष असं काही मिळाल नाही… सो… मला काहीच आवडलं नाही… तर मीच काहीही न घेता घेऊन आलो तिला. सध्या वेळ पण नाही… आहे ते ती ‘वेअर’ करेन म्हणाली. सो…” शिव आत येत तिच्यावर नजर टाकत म्हणाला.

    “सो… सो… काय शिव? अरे, लग्न आहे तुमचं… तिला काहीच नाही घेतलं तू! का तर तुला आवडलं नाही म्हणून!!” सुधा शिवला रागवत म्हणाल्या.

    हेही वाचा – दुकानाबाहेर येऊन शिवने समोर बघितलं आणि डोक्याला हातच लावला…

    त्यांना खूपच राग आला होता. एक तर घरी त्यांचा नवरा आणि सासूबाई या लग्नात कसलाच उत्साह दाखवत नव्हते आणि शिवचे हे असं वागणं! त्यांना वाईटही वाटत होतं… त्या अतिशय चिडून बोलत होत्या.

    खरंतर त्यांची अशी रीॲक्शन शिवसाठी शॉकिंग होतं हे… सियाचीही वेगळी अवस्था नव्हती! सहसा त्या चिडत नसायच्या… आरू पण आता जास्तच घाबरली. त्यात वाईटही वाटलं की, आपल्यामुळे उगाच यांना ओरडा खावा लागतोय…

    “मॉम, काम डाऊन… एवढं का चिडतेस?” सिया सुधाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

    “हो, मॉम… तुम्ही चिडू नका. त्यांची काहीच चूक नाही. ते ड्रेस लई महाग होते. विनाकारण कशाला इतके पैसे खर्च करायचे ना! किती मेहनत करावी लागत असंल ते कमवायला? म्हणून मीच नाही काही घेतलं. तशीच बाहेर निघून आले… माझीच चूक आहे. त्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्यावर नका चिडू… आणि तुम्ही शांत व्हा!” आरू एका दमात बोलून मोकळी झाली. तिने डोळे झाकून मोकळा श्वास सोडला… चूक नसताना आपल्यामुळे कुणी असा ओरडा खावा, असं तिला अजिबात आवडायचं नाही. जे मनात आहे, ते ती बोलून मोकळी व्हायची.

    आरूचा चेहरा असा झाला होता की, ती आता कुठल्याही क्षणी रडेल… खरंतर तिला सगळ्या गोष्टींचं दडपण आल होतं. गावात झालेला तो तमाशा… तिची झालेली बदनामी… त्यानंतर हे अचानक ठरलेलं लग्न… तिचं कॉलेज आणि तिचं स्वप्न तर कुठेतरी हरवल्यातच जमा झालं होतं… गावावरून परत आल्यानंतर ती घराबाहेर पडली ते लग्नाची खरेदी करण्यासाठी!

    पुण्यामध्ये येऊन फॅशन डिझायनरच्या कोर्ससाठी कॉलेजला जायचं… नवनवीन डिझाइन्सचे कपडे शिवायचे… मोठमोठ्या शॉपमध्ये जाऊन डिझाइनर ड्रेस कसे तयार होतात, त्याची माहिती गोळा करायची… वगैरे वगैरे स्वप्नं तिने पाहिली होती… आणि आज अशाच ड्रेस डिझायनर शॉपमध्ये ती गेली होती. पण तो तिच्या शिक्षणाचा भाग म्हणून नाही तर, तिच्या लग्नाची खरेदी करायची होती! शिव तिला घेऊन गेला होता. तिथे जाऊन पुन्हा एकदा तिच्या तुटलेल्या स्वप्नांची आठवण तिला आली होती… आणि त्यात त्या किमती… बापरे!

    सगळ्याच गोष्टींचं दडपण आलं… आणि म्हणून तिची चिडचिड झाली. आता तिला स्वतःला सांभाळणं कठीण झाल आणि ती रडायला लागली. बाहेरून आलेला राम घाईत तिच्याजवळ आला आणि तिला मिठीत घेतलं… आणि आता ती जास्तच रडायला लागली. राम तिला शांत करत होता… पण सोबत रागाचा एक कटाक्ष तो शिववर टाकायला विसरला नाही!

    त्याने शिव आणखीनच गोंधळात पडला, ‘मी काय केलंय? मी तर तिची बाजू सावरून घेत होतो… तिनेच खरं सांगितलं आणि आता स्वतःच रडतेय…’ असं विचार त्याच्या मनात आले. सध्या तरी त्याला तिच्या अवस्थेची कल्पना नव्हती…

    बाकी कोणाला काहीच समजत नव्हतं, तिला आता कसं शांत करावं ते! सुधाला पण वाईट वाटलं, उगाच आपण जास्तच चिडलो… पण आता विचार करून काय उपयोग!

    आरू रामच्या मिठीत शिरून लहान मुलांसारखी रडत होती… राम तिला घेऊन रूममध्ये आला होता आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता…

    “आरू… आरू शांत हो बरं, काय झालंय? का रडतेस तू? मला नीट सांग बरं. मला सांग तो… तो शिवराज काही म्हणाला का तुला? तू मला सांग…” राम त्याच्या पद्धतीने समजूत काढत तिला विचारत होता.

    “नाही… नाही त्यांनी काहीच नाही केलं… ते मी… मी… मला…” तिलाच समजत नव्हतं तिला काय होतंय… तर त्याला काय सांगणार होती ती!

    आरू नुसती रडत होती, रामच्या कुशीत शिरून… तोच दारावर टकटक झाली आणि सोबत सिया आत आली आणि दोघांसमोर उभी राहिली.

    “राम ने तिच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच विचारलं काय म्हणून…

    “मी… मी बोलू का आरूसोबत?” ती अडखळत म्हणाली. कारण, रामची नजर अशी काही होती की, जणू तो सांगत होता, तुमच्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे… जाळ होता त्याच्या नजरेत! त्याचा हा राग खरंतर सियासाठी कोडंच बनला होता. पण सध्या हा विचार बाजूलाच ठेवणं तिला योग्य वाटलं.

    पुन्हा अर्जव करत म्हणाली,  “प्लीज!”

    त्याने सुस्कारा सोडत आरूला स्वतःपासून बाजूला केलं आणि तो उठून बाहेर गेला… आरू अजूनही खाली मान घालून रडत होती… सिया बेडवर तिच्या शेजारी बसली आणि तिने तिच्या हनुवटीला बोटांनी वर करत तिचे डोळे पुसले… आणि नाही म्हणून मान हलवली… आरुने पण लहान मुलांसारखी नाही म्हणत मान हलवली आणि तिच्याकडे पहिलं… त्यावर सियाने फक्त स्मित केले आणि म्हणाली…

    “भीती वाटतेय?”

    “हं…” डोळ्यांची उघडझाप करत आरूनं एवढंच म्हटलं.

    “वाटणारच… प्रत्येक मुलीला वाटते आणि त्यात तू अजून खूप लहान आहेस ना, म्हणून तुला समजत नाही…” सिया तिच्या गालावर हात ठेऊन म्हणाली.

    “मला कसंतरी वाटतंय… कळत नाहीये काय ते! धडधड वाढतेय… तू… तुम्हाला माहितीय वहिनी… ते… ते ना असे माझ्याजवळ आले ना की, पोटात काहीतरी होतं! त्यांची भीती पण वाटली मला… ते ड्रेस खूप महाग होते… ते मी… मला… मला हे नाही सांगायचंय… काय बोलायचं… मलाच कळत नाहीये… मला भीती वाटतेय… मला ना लग्नच नाही करायचंय… पण, करायचंही आहे… पण… नाही…” आता आरू रडायची थांबली होती आणि आता वैतागून उठून बाजूला जाऊन उभी राहिली होती. कारण, तिला जे वाटतंय ते तिला नीट सांगताच येत नव्हतं.

    “शु… शु… एकदम शांत.  मोकळा श्वास घे. ये इथे बस… बस बरं शांत आणि डोळे मिटून मोठा श्वास घे आणि हळूवार सोड… चल.. चल कर…”

    सियाने सांगितल्याप्रमाणे आरूने दोन-तीन वेळा श्वास घेऊन सोडला…

    “आता बरं वाटतंय?” सियाने विचारलं.

    “हो… माफ करा वहिनी तुम्ही घरी आलात आणि मी अशी रडतेय…” ती निरागसपणे म्हणाली.

    “असू दे काही होत नाही, रडायला पण पाहिजे कधी कधी…” सिया हसत म्हणाली.

    त्यावर आरू पण खुदकन हसली, ‘हसताना किती क्यूट दिसते ही! खरंच रामची काळजी आणि राग बरोबरच आहे, लहान आहे अजून ही… खूप सांभाळून घ्यावं लागणार आहे हिला… खरंच हिच्या या अवस्थेला मीच तर जबाबदार नाही ना?’ सिया विचार करत होती.

    “वहिनीSSS ओ वहिनी, काय झालं?” तिला असं विचारात हरवलेलं पाहून आरूने विचारलं.

    “नाही… काही नाही ते असंच…” सिया स्वतःला सावरत म्हणाली.

    “बरं ऐक… हे जे काही होतंय ना, त्याचं अजिबात दडपण येऊ देऊ नकोस… लग्न म्हटलं की, खूप साऱ्या गोष्टी असतात… नवीन घर, नवीन जागा, नवीन माणसं… त्यांचे स्वभाव… जिथे आपण लहानाचे मोठे झालो, ते घर, आई-बाबा, भाऊ, मैत्रीणी सगळं सोडून आपल्याला जावं लागतं… प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतोच! हा तुझ्या आयुष्यात लवकर आला… जिथे आपण आत्तापर्यंतचं आयुष्य घालवलं ते आपलं घर सोडून नवीन घरी, जिथे आपलं पुढचं सगळं आयुष्य जाणार आहे… ती लोक जर प्रेमळ आणि समजूतदार असतील ना तर तिथे मिसळून जायला वेळ लागत नाही… आणि मी खात्री देते तुला आमच्या घरी सगळेच तुला खूप प्रेम देतील आणि समजूनही घेतील… हा शिव थोडा रागीट आहे… तो जर तुझ्यावर चिडला ना तर, मला सांग… बघ मग मी त्याचा कान कसा पिरगळते ते!” सियाचं शेवटचं वाक्य ऐकून आरू खळखळून हसू लागली.

    तिचं ते निरागस हास्य पाहून सियाच्या चेहऱ्यावर पण स्मितरेषा उमटली आणि दारात उभ्या राहिलेल्या रामच्या डोळ्यात आनंद अन् समाधान एकत्रच उमटलं…

    “वहिनी, तुम्ही खूप गोड आहात…” अस म्हणत आरूने सियाच्या गालावर ओठ टेकवले आणि तिला गच्च मिठी मारली.

    “तू पण खूप गोड आहेस…” असं म्हणत सियाने मिठी आणखी गच्च केली.

    “वहिनी… किती वेळ आपण इथे बसलोय… आई ओरडेल मला… आधीच रडून गोंधळ घातलाय मी…” असं म्हणत ती उठली आणि हात धरून सियालाही उठवलं…

    “हं, चल जाऊ…” दोघी निघाल्या तर दारात राम उभा होता.

    “दादाSS” आरूने पुढे होऊन त्याला मिठी मारली… “थँक्यू दादा, खूप गोड वहिनी दिलीस मला तू…” असं म्हणत ती पुढे निघून गेली.

    हेही वाचा – रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    सिया आणि रामची नजरा नजर झाली. त्याने डोळ्यांनीच तिचे आभार मानले… आता त्याच्या डोळ्यांत राग नव्हता… तिनेही हसून डोळ्यांनीच त्याला दिलासा दिला की, सगळं ठीक होईल…

    बाहेर आल्यावर आरूने सुधा यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले, “…आणि मी मघाशी उगाच रडले त्यासाठी माफ करा…”

    त्यांनीही, “काही हरकत नाही…” असं म्हणून मान डोलावली.

    सिया आणि आरू जेव्हा रूममध्ये होत्या, तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा उद्यापासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या तयारीची चर्चा केली… त्या दोघी बाहेर आल्यानंतर थोडंफार इकडचं तिकडचं बोलून शिव आणि त्याची फॅमिली घरी निघून गेली….

    शिवने त्याच्या मर्जीने आरूसाठी काही साड्या ऑर्डर केल्या होत्या… तेवढ्या वेळात त्या पण घरी पोहचल्या होत्या… त्या साड्या पाहून तर आरू खूपच खूश झाली… तिला आवडतील अशाच होत्या त्या… त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर चमक आली होती… नाही म्हटलं तरी, आलेलं दडपण आता कमी झालं होतं…

    क्रमशः


     

    Avatar photo
    शोभा भडके

    मूळ गाव कांबी, जिल्हा बीड. मूळ राहण्याचे ठिकाण बीड. मी लेखनाला सुरुवात करायच्या आधी फक्त एक वाचक होते. म्हणून प्रतिलिपी ॲपवर कथा वाचनच करत होते. तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं मी एखादी स्टोरी लिहू शकेन. पण वाचन करत करता मनात आलं आणि लिहू लागले. लिहिलेलं वाचकांना आवडत गेलं, तसं माझा लिहिण्याचा हुरूप वाढत गेला... आज लेखनामुळे आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी झाले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

    Related Posts

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026 ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पाप आणि पुण्य

    By प्रदीप केळुस्करApril 16, 2026

    गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती. ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होती. ड्रायव्हरच्या बाजूला…

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 270
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 387
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026
    Most Popular

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.