Author: रेवती निलेश पांडे

Avatar photo

विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 8552893399

दवाखान्यातून बाहेर पडताना कवीशने एक दीर्घ श्वास घेतला आणि जड पावलांनी तो तिथून निघाला. हातातल्या फाइलमधील कागदावर उमटलेल्या ‘ॲनोस्मिया’ या शब्दाभोवतीच त्याच्या विचारांचे चक्र गरगरत होते… हे सारे घरी जाऊन स्नेहाला कधी सांगतो, असे त्याला झाले होते. त्याने बाजारात एका कोपऱ्यावर गाडी थांबवली आणि स्नेहासाठी तिच्या आवडीचे पेरू विकत घेतले. सवयीप्रमाणे तो पेरू नाकाला लावून बघितला, पण या पेरूचा वास त्याला आला नाही; मात्र त्याला लहानपणी त्याच्या शेतात असलेल्या पेरूंचा तो परिचित सुगंध आठवला. त्याच्या आयुष्यात आता फक्त या ‘गंध-स्मृतीच’ दरवळणार होत्या! तो घरी पोहोचला, तेव्हा स्नेहाने हसतमुखाने दार उघडले. कवीशने आणलेले पेरू बघून तिला खूप आनंद झाला. या मुंबई…

Read More

माणसांच्या आवाजाचे एक अनाकलनीय गारूड असते. काही आवाज उपजत गोड नसले, तरी त्यांच्यातील भारदस्तपणा आणि त्यातील आर्तता आपल्याला मनापासून भावते. असे काही आवाज स्मृतीमध्ये कायमचे घर करतात. मला आजही आठवतो तो प्रसंग, जेव्हा मी आणि माझी मैत्रीण महाविद्यालयीन दिवसांत रिक्षामधून प्रवास करत होतो. त्या प्रवासात रिक्षावाला अचानक ‘तू वेडा कुंभार’ हे गाणे गुणगुणायला लागला. सुरुवातीला तो आवाज त्याच रिक्षावाल्याचा असेल, यावर आमचा विश्वासच बसला नाही. पण हळूहळू लक्षात आले की, त्या मळकट कपड्यांमागे आणि घामाने डबडबलेल्या शरीरामध्ये एक उत्कृष्ट सुरांची जाण असलेला गायक दडलेला आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्याच्या विवंचनेत, एका उत्कृष्ट सुरांची जाण असलेल्या त्या व्यक्तीने रिक्षा चालवण्यात आपले…

Read More

“कंटाळले बाई मी! असं वाटतं हे सगळं सोडून कुठेतरी जंगलात निघून जावं…” आम्ही लहान असताना आई वैतागून अनेकदा हे वाक्य म्हणायची. तेव्हा आम्हीही निरागसपणे म्हणायचो, “आई, आम्ही पण येतो गं तुझ्यासोबत!” प्रत्यक्षात आई कधीच सगळं सोडून जंगलात गेली नाही; पण तेव्हा मात्र मला नवल वाटायचं की, हिला सारखं जंगलात का जायचं असतं? तिथे असं काय असेल? पुढे काळ पुढे सरकला, आणि जेव्हा मी स्वतः ‘आई’ या भूमिकेत शिरले, तेव्हा मधे मधे मलाही जंगलात निघून जावसं वाटू लागलं. संसाराच्या जबाबदाऱ्या, रोजची धावपळ आणि अपेक्षांचं ओझं अंगावर पडलं की, आईकडून ऐकलेले ते शब्द मनात पुन्हा जिवंत व्हायचे. पण तरीही कित्येक वर्षं मला…

Read More

दोन महिन्यांपूर्वी एकटीने रेल्वेने प्रवास करण्याचा योग आला. प्रवास बराच लांबचा होता. मला ‘साइड अप्पर’ सीट मिळाली होती, त्यामुळे मी, हातातील पुस्तक आणि मधेच येणारा चहा अशी आमची तिघांची मस्त मैफल जमली होती… माझ्या समोरच्या उजवीकडच्या लोअर बर्थवर एक स्त्री आणि डावीकडच्या लोअर बर्थ वर एक पुरुष असे दोघं बसले होते. सुरुवातीला त्यांच्या नात्याचा अंदाज आला नाही, पण थोड्या वेळाने चित्र स्पष्ट झाले. तो माणूस एका स्टेशनवरून पेपर घेऊन चेहऱ्यासमोर धरून बसला होता. ती स्त्री मात्र घरच्या काही तक्रारी, जावेबद्दल किंवा नणंदेबद्दल काहीतरी सांगत होती. तिचे बोलणे अतिशय सौम्य शब्दांत होते, पण तो पुरुष साधं ‘हं’ म्हणण्याची तसदीही घेत नव्हता.…

Read More