Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: हर्षा गुप्ते
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… 3 जानेवारी 2011ला आमच्या सोसायटीमध्ये बेबी नावाच्या डॉगीने 7 पिल्लांना जन्म दिला. तीन महिने माझा नवरा, मुलगा आणि मुलगी या तिघांनी बेबीचं बाळंतपण केलं. मग तिच्या सहा पिल्लांना adoption मिळवून दिलं. सातवी म्हणजे जन्माने तिसरी असलेली ब्रँडी… आम्हीच तिचं नामकरण केलं. तिच्या इतर भावंडांच्या मानाने अर्ध्या मापाची जन्माला आलेली माझी ब्रँडी. तिला न्यायला टिटवाळ्याहून दोन मुले आली होती. तिला ट्रेनने नेणार होते. आम्ही म्हटलं की, नको आम्ही स्वतः गाडीने तिला आणून सोडू. पण छे तो योग काही आलाच नाही. ब्रँडी आमच्याच घरी राहिली. एरवी कुत्र्यांना घाबरणारी मी कधी विरघळले मलाच कळलं…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. मुलगी म्हटलं म्हणजे तिला स्वयंपाक बनवता आलाच पाहिजे. आजच्या काळात तर तो मुलांनाही बनवता आला पाहिजे! COVIDने हे अगदी सिद्ध केलं की, फक्त स्वयंपाकच नव्हे तर, घरातली सगळीच कामं फक्त मुलींनाच नव्हे तर मुलांनाही येणं खूप गरजेचं आहे. मी अगदी चौथीला असल्यापासून आईसोबत पोळ्या भाजायला बसायचे. थोडंस कणिक मळायचे. कधी तर पोळ्यासुद्धा लाटायचे. शिक्षण, नाटक, नाटकाचे दौरे, शूटिंग हे सुरू असतानाच, अधून मधून किचनमध्ये सुद्धा लक्ष द्यावं लागायचं… एकूणच बेसिक स्वयंपाक मला येत होता. लग्नानंतर छान नवनवीन प्रकारचा स्वयंपाक आणि तोही रूचकर आणि झटपट कसा बनवायचा ते सासूबाईंकडे शिकले. त्या म्हणजे…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. ‘सावधान इंडिया’ ही जोरदार चाललेली सीरियल. तिथे माझे एक आवडते डायरेक्टर होते सचिन सर. ते जी स्टोरी डायरेक्ट करत त्यात माझ्यासाठी एकतरी रोल असायचाच. त्यांच्या म्हणण्यानुसार, मी कोणतंही कॅरेक्टर फार सहज अंगिकारते. सचिन सर एक नवीन स्टोरी डायरेक्ट करणार होते. मला प्रॉडक्शनमधून कॉल आला. या या तारखांना मोकळ्या आहात का? शूट करायचं आहे. मी ‘हो’ म्हणाले. पण स्टोरी काय आहे? माझा रोल? विचारलं तर, म्हणे, ते सगळं तुम्हाला सचिन सर सांगतील! मी काय सामान कपडे वगैरे घेऊन जायचं तेवढं मला सांगितलं. शूटिंगचा दिवस उगवला. मी सेटवर पोहोचले. सचिन सर किंवा त्यांच्या…

