Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: दिलीप कजगांवकर
तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.
जवळ जवळ दोन तास नेहा साड्या बघत होती, परंतु आवडलेल्या साड्या तिच्या बजेटमध्ये बसत नव्हत्या आणि बजेटमध्ये बसणाऱ्या साड्या तिला आवडत नव्हत्या. वैतागून सेल्समन म्हणाला. “मॅम, एकतर तुम्ही तुमचे बजेट वाढवा, नाहीतर सिलेक्शन क्रायटेरिया बदलवा.” नेहाला दहा हजार रुपयांची एक साडी खूप आवडली होती, परंतु तिचे बजेट फक्त आठ हजार रुपयांचे होते. “दादा, तुम्ही शेठजींना विचारून पहा ना काही डिस्काऊंट मिळेल का?” नेहाने विनवले. त्याचवेळी दुकानात एकटाच आलेला एक रुबाबदार तरुण, सेल्समनला म्हणाला. “मला साडी घ्यायची आहे. कोण दाखवेल?” “सर, पाचच मिनिटे थांबा. या मॅमचे झाले की, तुम्हाला साड्या दाखवतो. तुम्ही इथेच बसा.” “आमच्याकडे कोणतंही डिस्काऊंट दिलं जात नाही…” शेठजींनी…
कंपनीचा ई-मेल आणि चक्क पर्सनल मेल आयडीवर! राजला आश्चर्य वाटले. “तुम्हाला कामावरून कमी केलं असून कालपर्यंतच्या कामाचं पेमेंट आज संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होईल…” हा तर खूप मोठा धक्का होता राजला! नुकत्याच घेतलेल्या आलिशान तीन बेडरूम फ्लॅटचा ईएमआय जबरदस्त होता. दोन महिन्यांनी बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं होतं. आईचं उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन, धाकटी बहीण रीनाचं लग्न… एक तारखेला जमा होणारी पगाराची भलीमोठी रक्कम येणं बंद झालं तर कसं होणार? अनेक खर्चांचा भार कसा पेलायचा? हा विचारच त्याला घाबरवत होता.” फक्त एका लाइनच्या मेलने असंख्य प्रश्न निर्माण केले होते. आई-बाबा आणि नेहाला हा धक्का पचवणे कठीण जाईल म्हणून त्यांना काहीच…
भाग – 2 निळा कोट आणि हेल्मेट बघितल्यावर नेहाला वाटले बसमध्ये भेटलेला तो तरुण नक्कीच सुपरवायझर असावा आणि मी जर ऑफिसर म्हणून या कंपनीत रुजू झाले तर, कदाचित तो माझ्या हाताखाली असेल. मी खुर्चीवर बसेन आणि तो आजसारखा कायम उभा राहील, न रागावता ‘मॅम, मॅम’ करेल. नेहा दिवास्वप्नात रमली असतानाच साहेबांच्या सेक्रेटरीने नेहाला सांगितले, ‘तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे.’ केबिनचा दरवाजा हळुवारपणे वाजवून नेहाने विचारले, ‘सर, मी आत येऊ का?’ साहेबांचा होकार मिळाल्यावर नेहा केबिनमध्ये शिरली आणि बघते तर काय! बसमधील तो तरुणच केबिनमध्ये साहेबांच्या चेअरवर बसला होता! ज्याला तिने अतिशय तुच्छ लेखले होते, ज्याचा सर्वांसमोर अपमान केला होता, तो तरुणच…
भाग – 1 “एक्सक्यूज मी मिस, तुम्ही तुमची पर्स सीटवरून उचलता का प्लीज?” राजने बसमध्ये विंडो सीटपाशी बसलेल्या तरुणीला नम्रपणे विचारले. या आधीही दोन-तीन तरुणांनी इतरत्र जागा असतानाही हाच प्रश्न तिला विचारल्याने ती चिडली होती. “काय हो मिस्टर, संपूर्ण बसमध्ये तुम्हाला फक्त ही एकच जागा दिसली का? की सुंदर मुलगी दिसली की, तिच्या बाजूची जागा पटकवायची घाणेरडी पुरुषी प्रवृत्ती?” नेहाचा राग तिच्या लालबुंद झालेल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. “अहो मॅडम, का ओरडता तुम्ही? त्यांनी तिकीट काढलं आहे, पर्स मांडीवर घ्या आणि त्यांना बसू द्या,” कंडक्टर साहेब समजावणीच्या सुरात म्हणाले. “कंडक्टर साहेब, हे घ्या माझ्या पर्सच्या तिकिटाचे पैसे. मी कुणालाही माझ्या…
पहाटेचे साडेपाच वाजले होते. सूर्यनारायण अजून पूर्व क्षितिजावर अवतरला नव्हता; पण स्वयंपाकघरात आणि हॉलमध्ये मात्र दिवे लागले होते. हॉल आणि स्वयंपाकघर झाडून-पुसून स्वच्छ झाले होते. बाल्कनीतील झाडांनाही मायेने पाणी घालून झाले होते. गॅसवर चहा ठेवला होता, गाजर हलवा तयार होता आणि बिर्याणी बनत होती. बाकी घरात मात्र सामसूम पसरली होती, कारण बाकीचे अजून निद्राधीन होते… “नेहा… चहा झाला का?” आतून पतीदेवांचा आवाज आला. “हो, तयार आहे. तुम्ही ब्रश करून या. लगेच देते.” ती कपात चहा ओतताना सहज हसली. घरातल्या प्रत्येकाची सकाळ तिच्यामुळे सुरू होत होती. मुलगा उठला… “आई, माझ्या प्रोजेक्टची फाइल कुठे आहे?” “तुझ्या बॅगेत आहे… रात्रीच ठेवून दिली.” मुलगी…

