Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 25 भाद्रपद शके 1947; तिथि : दशमी 24:21; नक्षत्र : आर्द्रा 06:45, पुनर्वसू 30:25 योग : वरियान 24:33; करण : वणिज 12:53 सूर्य : कन्या; चंद्र : मिथुन 24:27; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:40 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 दशमी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस शुभ आणि फायदेशीर ठरेल. अनेक निर्णय तुमच्या बाजूने लागतील, ज्यामुळे आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. नोकरी करणाऱ्या…
दत्तात्रय पांडुरंग मानुगडे ग्रामीण भागामध्ये शाळा कमी शिकलेल्या मुलांची अवस्था मी डोळ्यांनी पाहत होतो. ही मुले सुद्धा रोजगाराचा काहीतरी मार्ग शोधत होते. पण काहींची स्वप्नंच वेगळी होती. त्यापैकीच नंदू, दिलीप, शिवा, एकनाथ! गावामध्ये या चार मुलांना शेती कामाला कोणी शेतकरी सांगत नव्हते. कारण ही मुले चांडाळ चौकडी आहे, हे गावातील लोकांच्या लक्षात आलं होतं. या मुलांचं असं होतं की, ‘थोडे काम करणे आणि टाइमपास जास्त करणे.’ घरातील ज्वारी विकून विड्या ओढणे, नशा करणे आणि गावभर फिरणे हाच यांचा मुख्य उद्योग होता. सकाळ झाली की, घरात चहा पिऊन लक्ष्मीच्या देवळाच्या कट्ट्यावर ही चौकडी येऊन बसत होती. दोन महिन्यांपूर्वी ही चार मुले…
रश्मी परांजपे मागील लेखात आपण विद्यार्थ्यांप्रती शाळेच्या जबाबदाऱ्यांबाबत प्राथमिक माहिती घेतली. या आणि पुढील काही लेखांत आपण शाळेच्या जबाबदाऱ्या टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत. शाळेच्या जबाबदाऱ्या म्हणजे पर्यायाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि सेविका यांच्या जबाबदाऱ्या होत. विद्यार्थीकेंद्रित शिक्षणामध्ये या जबाबदाऱ्या जाणून घेताना आपण शालेय व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नियोजित उपक्रम, विद्यार्थ्यांची सुरक्षा अशा अनेक बाबींचा विचार करणार आहोत. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश. आता आपण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी या मुद्द्यापासून सुरुवात करूयात. शालेय वर्ष जूनमधे सुरू होते आणि प्रवेश प्रक्रिया साधारणतः जानेवारी / फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. मुख्याध्यापिकेला प्रवेशाबाबतचे नियोजन एक महिना अगोदर सुरू करावे लागते. यातील काही ठळक…
आराधना जोशी साहित्य तांदूळ – 1 वाटी हरभरा डाळ – पाव वाटी उडदाची डाळ – पाव वाटी धणे – पाव वाटी जिरे – 2 टेबलस्पून मेथी – अर्धा चमचा तिखट – 1 टेबलस्पून हळद – 1 टीस्पून मीठ – चवीनुसार हिंग – पाव टीस्पून तीळ – 3 टेबलस्पून कणीक – 2 टेबलस्पून तेल – 3 टेबलस्पून (मोहन म्हणून) तेल – वडे तळण्यासाठी कोथिंबीर – अर्धी वाटी (चिरलेली) पुरवठा संख्या : 7 ते 8 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : तांदूळ धुवून वाळवून घेण्यासाठी – अर्धा तास भाजून घेण्यासाठी – 10 मिनिटे भरडा काढण्यासाठी – 5 मिनिटे तळण्यासाठी लागणारा वेळ : 15…
पराग गोडबोले अगदी मागच्याच आठवड्यातली गोष्ट. ठाणे स्थानक ते ऑफिसचा प्रवास, नेहमीचाच… शिस्तीत पुढे सरकणाऱ्या रांगेचा मी एक भाग… पाऊस जास्त नव्हता, तरी सगळं ओलं-चिप्पं वातावरण. आजूबाजूला विविधरंगी छत्र्या आणि रेनकोटसचा कोलाहल… जवळजवळ दहा मिनिटांनी रिक्षा मिळाली. गांधी टोपी घातलेला पोरगेलेसा मराठी चालक होता. खूप बरं वाटलं. मीटर टाकून झोकात निघालो आम्ही ऑफिसच्या दिशेने, रस्त्यावरची पाण्याची थारोळी आणि खड्ड्यांची मालिका चुकवत… थोडं पुढे गेल्यावर चालकाचा फोन वाजला. त्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला घेतली आणि फोन उचलून बोलू लागला… “आत्ता कसे पैसे पाठवू? पहिलंच भाडं मारतोय आजचं!… थोडा धंदा झाला की पाठवतो…” समोरची व्यक्ती बहुदा काकुळतीला आली असावी, असं एकंदर संभाषणावरून जाणवत होतं.…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा ना तरी झकवीतु आहासी मातें । की तत्वचि कथिलें ध्वनितें । हे अवगमतां निरुतें । जाणवेना ॥16॥ म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मर्हाटा जी ॥17॥ मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियसें । कृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥18॥ देखें रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें ॥19॥ तैसें सकळार्थभरित । तत्व…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 सप्टेंबर 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 24 भाद्रपद शके 1947; तिथि : नवमी 25:31; नक्षत्र : मृगशीर्ष 07:31 योग : व्यतिपात 26:33; करण : तैतिल 14:15 सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:41 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 नवमी श्राद्ध अविधवा नवमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अनेक दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. वरिष्ठ कामावर खूप खूश असतील, परंतु…
प्रदीप केळूस्कर भाग 2 वाचकांना मी या कथेचा शेवट काय असावा.. याबद्दल आपली मते कळवायला सांगितले होते. त्याचा उद्देश म्हणजे, वाचकांनीपण कथा लिहिण्याच्या प्रक्रियेत सहभाग घ्यावा… मला आनंद होतो की, या कथेचा शेवट करण्यासाठी चांगली चर्चा झाली. आपण मंडळी काय लिहिणार याचा थोडाफार अंदाज होताच.. तसेच झाले. एकंदरीत सध्याची तरुण पिढी परदेशात गेली किंवा त्यांनी आपले संसार थाटले की, आपल्या पालकांना विसरतात, याचे सर्वांना दुःख आहे. त्यामुळे ‘कंडक्टर आणि त्याच्या बायकोने मुलांच्या मदतीला मुळीच जाऊ नये…,’ असे म्हणणारे अनेक आहेत. तर, ‘मुले अशी वागली तरी, त्याना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यावी; पण नातवाच्या किंवा नातीच्या जन्मावेळी आणि मुलांना गरज आहे…
हर्षा गुप्ते भाताचे कटलेट पुरवठा संख्या – 4 माणसांसाठी एकूण कालावधी – अर्धा तास साहित्य शिजवलेला भात – दीड वाटी रवा – अर्धी वाटी दही – अर्धी वाटी हिरव्या मिरच्या – चवीनुसार लसूण – 5-6 पाकळ्या आले – अर्धा इंच कोथिंबीर – अर्धी वाटी (चिरलेली) चिरलेला कांदा – 1 वाटी गाजर – 2 मध्यम सिमला मिरची – 1 मध्यम स्वीट कॉर्न – 1 लहान वाटी कढीपत्ता – 4-5 पाने हिंग – चिमुटभर मोहरी – 1 लहान चमचा तेल – फोडणीपुरते मीठ – चवीनुसार साखर – चवीनुसार इनो – एक चमचा कृती भात, रवा, दही, मीठ, साखर एकत्र कालवून घ्यावे. गाजर,…
प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक स्पर्धेला वा संघर्षाला तोंड द्यावे लागू शकते. तरीही न डगमगता पुढे जात रहा. वादग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. काम विलंबाने होऊ शकतात. तुम्ही आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून यश मिळवू शकता. आजूबाजूच्या लोकांना या राशीच्या महिलांचे महत्त्व कळेल. तथापि, कोणाशी वाद घालू नका. कामे उशिराने होतील म्हणून विद्यार्थ्यांची चिडचिड होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा, यश मिळेल. वृषभ या आठवड्यात वरिष्ठांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मात्र, स्वतःच्या मतावर ठाम रहा. कुटुंबातील व्यक्तीवर खर्च होण्याची शक्यता आहे. तुमची शिस्त, निरीक्षण यांचा उपयोग…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

