Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – जोडीदार आणि संततीकडून उत्तम सहकार्य मिळेल. कामात सुलभता आणल्याने प्रगती होईल. अंगभूत मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कामकाजाच्या ठिकाणी यश मिळेल. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. प्रवासामुळे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम मिळतील. आरोग्य चांगले राहील. वृषभ – परदेशातील व्यापाराशी संबंधितांना आज मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरदारांना आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करता येईल. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. प्रवास फलदायी होईल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. मिथुन – पूर्वनियोजित कार्यक्रम सहजपणे पूर्ण होतील. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ…
चंद्रकांत पाटील बाहेर उन्हाचा रट झालेला… कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन लागलेला… घराच्या बाहेर कोणी सुद्धा दिसत नव्हते. रस्ता सताड उघडा पडला होता. वारा आला की, रस्त्यावर पडलेली झाडाची वाळली पानं तेवढी उडत होती आणि शांततेचा भंग करत होती. अशा स्थितीत मी तोंडाला मास्क लावून डेस्टिनेशन्स सेंटरला औषधं आणायला चाललो होतो. कॉसमॉसच्या गेटवर वॉचमन पेगंत होता. मी गेटचा दरवाजा उघडला त्या आवाजाने तो जागा झाला आणि त्यानी कुठे चालला म्हणून विचारले मी “औषधं” म्हटल्यावर त्याने हातानेच जाण्याची खूण केली. डेस्टिनेशनला दोन-तीन मेडिकलची दुकाने सोडली तर, सगळी दुकाने बंद होती. फक्त तीन-चार कुत्री निवांत झोपली होती. दुपारच्या पार्यात एवढी नीरव शांतता त्यांना पहिल्यादांच…
माधवी जोशी माहुलकर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय? काहीतरी चटपटीत खावेसे वाटते आहे? चकली, चिवडा असे पदार्थ खाऊन खाऊन किती खाणार? त्याचीही चव जीभेला नकोशी झाली आहे, हो ना? मग बनवा चटपटीत, चटकदार, कुरकुरीत आणि चमचमीत असे पोळीचे खस्ते! शिळ्या पोळ्यांना हा एक नवीन ट्विस्ट देऊन एकदम चटकदार डिश तयार करता येते. हे बनतातही पटकन अन् संपतातही चटकन! साहित्य हेही वाचा – Recipe : मूगडाळ आणि तांदळाची लुसलुशीत इडली! कृती टिप्स एकूण कालावधी – साधारण अर्धातास हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा पैं मेघाचेनि मुखीं निवडला । समुद्र कां वोघीं पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपेयां ॥307॥ तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे । तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ॥308॥ आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें । ऐशिये विवंचनेपुरतें । उरेचिना ।।309॥ गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे । तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥310॥ म्हणोनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 डिसेंबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 11 अग्रहायण शके 1947; तिथि : द्वादशी 15:57; नक्षत्र : अश्विनी 20:51 योग : वरियान 21:08; करण : कौलव 26:14 सूर्य : वृश्चिक; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:54; सूर्यास्त : 17:59 पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127 भौमप्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नका. तुमच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षणांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिकबाबतीत महत्त्वाचे निर्णय चांगलं फळ देणारे…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. “भाऊ काका तुमच्या हातचा गरमा गरम चहा…” जयू आत्याने माझ्याकडे पाहिलं. आत स्वयंपाकघराकडे वळून म्हणाली, “अहो पपी आलीय… चहा ठेवा हो तिच्यासाठी.” भाऊ काका धडपडत बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर कितीतरी आनंदाची फुलं फुलली होती… “ये ग बस. आधी पाणी पी. मी तुझा फेव्हरेट चहा ठेवतो… आणि तुझ्या चहासाठी मी आता कुंडीत पुदिना लावलाय, बरं का!” आम्ही तिघेही खळखळून हसलो. भाऊ काकांनी मस्त चहा बनवून आणला आणि आम्ही तिघे गप्पामध्ये बुडालो. जयू आत्या. आमच्या समोर राहणाऱ्या रघूअण्णा मोगरे यांची मुलगी. तिची भाची माझी मैत्रीण. लहानपणी आम्ही त्यांच्याच घरी खेळायचो. एके…
आराधना जोशी थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात तुरीच्या ओल्या शेंगा हमखास पाहायला मिळतात. याच ओल्या दाण्यांची वैदर्भीय पद्धतीची आमटी कशी करतात ते बघू या. साहित्य पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : 30 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे एकूण वेळ : 40 मिनिटे (तुरीचे दाणे आधीच सोलून ठेवले असतील तर तयारीला 5 ते 7 मिनिटे पुरेशी आहेत.) हेही वाचा – Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी हेही वाचा – Recipe : आवळ्याचे रसम टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883…
पराग गोडबोले अशीच एक सुट्टी होती, आळसावलेली, रविवारसारखीच… बायकोच्या बहिणींचा ठाण्यात भेटायचा बेत ठरला होता, त्यामुळे स्वारी लगबगीत होती. आज ‘खानपान सेवा’ बंद राहील, अशी घोषणा करून, आवरून सावरून ती ठाण्याला जायला निघाली… मी आणि लेक उरलो घरात, दंगा घालायला! नेहमीच्या, तोंडपाठ झालेल्या सूचनांचा भडिमार झालाच निघताना आणि आम्ही डोळे मिचकावले एकमेकांकडे पाहून… ती एकदाची बाहेर पडल्यावर, आम्ही नि:श्वास सोडला सुटकेचा आणि तंगड्या पसरून बसलो. लेक आधीच म्हणाली होती, “बाबा, खानपान सेवा सुरूच राहील, नका काळजी करू तुम्ही… मै हूं ना!” पण न्याहारीला मॉडर्न कॅफेमधून इडली सांबार मागवलं गेलं… आणि हीच का खानपान सेवा? अशी शंकेची पाल चुकचुकली मनात. भल्यामोठ्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा युञ्जन्नेनं सदाऽत्मानं योगी नियत्मानसः । शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥15॥ ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहींचें रूप हारपे । मग तो डोळियांचि माजि लपे । जगाचिया ॥293॥ एऱ्हवीं आधिलाचि ऐसें । सावयव तरी असे । परी वायूचें कां जैसें । वळिलें होय ॥294॥ नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनि उभा । कां अवयवचि नभा । निवडला तो ॥295॥ तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर । हें पद होतां चमत्कार । पिंडजनी ॥296॥…
दर्शन कुलकर्णी मोक्षदा एकादशी / मौनी एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दुपारपूर्वीचा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यवसायात प्रगती होत राहील. व्यापारात नफा बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. व्यवहारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धार्मिक कार्यात वेळ आणि पैसा खर्च होईल. इतरांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. सौदेबाजीद्वारे काम करण्याचा प्रयत्न करणे अनुचित ठरेल. वृषभ – हा काळ नकारात्मक परिणाम देणारा आहे. हितचिंतक मानले जाणारे लोक तुमच्या पाठीमागे तुमचेच नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि समन्वय यामुळे परिस्थिती गंभीर बनणार नाही. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य स्थापित होईल. विवेकाने वागा. काळानुरूप पावले उचला.…

