Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    August 8, 2026

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 16 सप्टेंबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 16 सप्टेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 16, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 16 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 25 भाद्रपद शके 1947; तिथि : दशमी 24:21; नक्षत्र : आर्द्रा 06:45, पुनर्वसू 30:25
    • योग : वरियान 24:33; करण : वणिज 12:53
    • सूर्य : कन्या; चंद्र : मिथुन 24:27; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:40
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    दशमी श्राद्ध

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस शुभ आणि फायदेशीर ठरेल. अनेक निर्णय तुमच्या बाजूने लागतील, ज्यामुळे आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. अचानक पैसे मिळवण्याच्या संधी वाढण्याची शक्यता असून त्या हातून जाणार नाहीत, याची काळजी घ्या. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.

    वृषभ – व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. कार्यालयातील एखादे काम पूर्ण झाल्याने कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. बेरोजगार आहेत त्यांना आज मुलाखतीसाठी बोलावणे येऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू असणारे प्रयत्न यशस्वी होतील. मात्र आज खर्चात वाढ होईल. आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

    मिथुन – दिवस संमिश्र असेल. काही आनंददायी तर काही  निराश करणाऱ्या घटना घडण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस थोडा त्रासदायक असू शकतो‌, एखाद्या सहकाऱ्यामुळे नुकसान सोसावे लागेल. कुटुंबातील सदस्यांशी चांगला समन्वय राहील. तथापि, वैवाहिक जीवनात  जोडीदाराच्या भावनांची विशेष काळजी घ्यावी लागेल.

    कर्क – आज घाईघाईत कोणतेही काम करणे टाळा. व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. दुसऱ्याच्या सल्ल्याने गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित कामे वेगाने होतील आणि चांगला नफा मिळू शकेल. नोकरदार जातकांना आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगला पाठिंबा मिळेल.

    सिंह – दिवस खूप फायदेशीर ठरेल आणि तो  चमत्कारापेक्षा कमी नसेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल होऊ शकतो. संततीची प्रगती उत्तम असेल.  शिक्षण क्षेत्रात एखादी मोठी कामगिरी ते साध्य करतील. खाण्याच्या सवयीवर थोडे नियंत्रण ठेवा, अन्यथा मधुमेहासारखे आजार वाढू शकतो.

    हेही वाचा – पावसाची रिपरिप अन् रिक्षावाला…

    कन्या – आजचा दिवस खूप शुभ आणि फायदेशीर ठरेल. जे नोकरी करतात ते किंवा जे नवीन नोकरी शोधत आहेत, त्यांना आज चांगल्या ऑफर मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा फायदा मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खूश असतील. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना आज मोठे नुकसान होऊ शकते.

    तुळ – आजचा दिवस काहीतरी नवीन करण्यासाठी असेल.  कमाईच्या काही नवीन संधी मिळतील ज्या अनेक महिने फायदेशीर ठरतील.  कामाच्या ठिकाणी काही नवीन कामगिरी करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना आज व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांसाठी, आज कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.

    वृश्चिक – आज संपत्ती, सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. नोकरीच्या ठिकाणी काम करताना काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तिथे झालेली चूक महागात पडू शकते. शत्रू तुमचे काही नुकसान करू शकतात, त्यामुळे तुम्हाला खूप सावध राहण्याची आवश्यकता आहे. भौतिक सुखांवर थोडे जास्त पैसे खर्च कराल.

    धनु – कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कमी उत्पन्नामुळे तुम्ही मानसिक ताणतणावात असाल. नोकरदार जातकांवरील कामाचा ताण वाढू शकतो. ज्यांचा मालमत्तेशी संबंधित वाद होता, त्यात आता गुंतागुंत वाढू शकते, त्यामुळे चिंता वाढतील. आज वेळ तुमच्या बाजूने नाही, त्यामुळे खूप संयम आणि शांतपणे सगळी कामे करावी लागतील.

    मकर – आज खूप शांततेत दिवस घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जे जातक दुसऱ्याचे वाहन चालवणारे असतील त्यांनी सावधगिरी बाळगावी. एखादा लहानसा अपघात घडण्याची शक्यता आहे. दिवसाच्या शेवटी, एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आरोग्य चांगले राहील.

    कुंभ – आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत अविस्मरणीय ठरेल.  नोकरी आणि व्यवसायातून एखादी चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ मिळेल. आज कोणतेही कर्जविषयक व्यवहार टाळा. जे जातक कोणत्याही सरकारी कामाशी संबंधित आहेत, त्यांचे काम आज अडकू शकते, परंतु कौशल्याने ते काम पूर्ण करू शकाल.

    हेही वाचा – प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी

    मीन – आजचा दिवस अनुकूल असेल. व्यवसायात चांगली वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. आज नोकरदार जातकांसाठी पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. कामात उत्साह असेल आणि लोकांना भेटण्याची प्रक्रिया सुरू राहील. आज अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळू शकते. नवीन कामाच्या शोधात असलेल्या जातकांना आज चांगली बातमी मिळू शकते.


    दिनविशेष

    श्रेष्ठ भारतीय शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी

    टीम अवांतर

    कर्नाटक संगीतशैलीतील श्रेष्ठ गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म 16 सप्टेंबर 1916 रोजी मदुराई येथे झाला. त्यांच्या आई षण्मुखवाडिवु या नामवंत वीणावादक होत्या, तर त्यांच्या आजी अक्कमल या व्हायोलिनवादक होत्या. या दोघींच्या संगीताचा वारसा सुब्बुलक्ष्मी यांना लाभला. सेमनगुडी श्रीनिवास अय्यंगार हे सुब्बुलक्ष्मी यांचे कर्नाटक संगीतातील गुरू होत. पंडित नारायणराव व्यास यांनी त्यांना हिंदुस्थानी संगीत शिकविले. प्रख्यात नर्तकी बालासरस्वती यांनी त्यांना पदम्‌चे शिक्षण दिले, तर दिलीपकुमार राय आणि सिद्धेश्वरीदेवी यांनी त्यांना ठुमरी आणि टप्पा गायनाचे धडे दिले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका बाजारात आली तर, सतराव्या वर्षी मद्रासच्या संगीत अकादमीत गाण्याचा मान त्यांना लाभला. या मैफलीने त्यांचा खूपच नावलौकिक झाला. तमिळ चित्रपटसृष्टीतही त्यांचा प्रवेश झाला. 1938  मध्ये सेवासदनम् हा सुब्बुलक्ष्मी अभिनित पहिला तमिळ चित्रपट होय. यानंतर शकुंतला, सावित्री, मीरा या त्यांच्या चित्रपटांनी अमाप लोकप्रियता मिळविली. मीरा हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाल होता. या चित्रपटात त्यांनी संत मीरेची भूमिका केली. त्यांचा त्यातील अभिनय व त्यांनी गायिलेली मीरेची सुमधुर भजने देशभर अत्यंत गाजली व त्यामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या त्यानंतर त्यांनी अनपेक्षितपणे चित्रपटसंन्यास घेतला आणि शास्त्रीय संगीतोपासनेला सर्वस्वी वाहून घेतले. सुब्बुलक्ष्मींनी भक्तिसंगीतात अनेक प्रयोग केले. नवनवीन रचना निर्माण केल्या. कर्नाटक संगीतातील कृती, पदम्, वर्णम्, तिल्लाना इत्यादी संगीतप्रकार त्या बिनचूक आणि प्रभावीपणे सादर करीत. त्यांनी गायिलेल्या श्रीविष्णुसहस्रनाम आणि व्यंकटेशस्तोत्र या रचना त्यांच्या आवाजातील अवीट गोडीमुळे अजरामर ठरल्या आहेत. त्या जशा उत्तम गायिका होत्या, तशाच उत्कृष्ट वीणा आणि मृदंगवादकही होत्या. भारत सरकारकडून पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच सर्वोच्च असा भारतरत्न हे पुरस्कार त्यांना लाभले. स्पिरिट ऑफ फ्रीडम, राष्ट्रीय एकात्मतेचा इंदिरा गांधी पुरस्कार, तसेच रॅमन मॅगसेसे हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार  त्यांना मिळाला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली. चेन्नई येथे 11 डिसेंबर 2004 रोजी सुब्बुलक्ष्मींचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ 2016 मध्ये भारतीय टपाल खात्याने पोस्टकार्डाचे आणि संयुक्त राष्ट्रसंघाने एका टपाल तिकीटाचे अनावरण केले आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    By ॲड. अमोल दोरवटAugust 8, 2026

    बरेच जण फक्त लग्नापासूनचे भाव पाहतात, पण खरा नियम असा आहे – “कोणत्याही विषयाचे फलित…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    August 8, 2026

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव

    August 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 388
    • अवांतर 202
    • आरोग्य 137
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 524
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 837
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    August 8, 2026

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.