Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
प्रदीप केळुस्कर भाग – 4 आपला दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल, याची केशवराव यांना काळजी वाटे. मोठा मोहन अभ्यासात हुशार होता. सीए झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. केशवराव गेल्यावर तेराव्या दिवशी नाडकर्णी वकिलांनी मोहन आणि वसंताला मृत्यूपत्र वाचून दाखवलं. त्यानुसार राहते घर मोहन आणि वसंत यांच्या नावावर तर, गावातील 32 गुंठे जमीन आणि त्यावरील 26 आंब्याची कलमे, 20 काजूची झाडे तसेच 10 गुंठे भातशेती जमीन फक्त वसंत याच्या नावावर ठेवली होती. त्यावरून मोहन आणि त्याची पत्नी आशा यांनी वसंता याच्यावर तोंडसुख घेतले. त्यावेळी त्यांची बहीण यशोदाने वसंताची पाठराखण केली. मोहन आणि आशा यांनी कणकवलीच्या भोसले वकील…
दीपक तांबोळी भाग – 1 “फक्त सात दिवस….” समोरच्या कॅलेंडरकडे पहात मकरंद पुटपुटला. आजकाल असेच तो दिवस मोजत होता. याची सुरुवात खरंतर मागच्या वर्षीच झाली होती. पण त्यावेळी तो महिने मोजत होता. आता मात्र एप्रिल सुरू झाल्यापासून त्याने दिवस मोजायला सुरुवात केली होती. साहजिकच होतं… बरोबर सात दिवसांनी म्हणजे 30 एप्रिलला तो रिटायर होणार होता. मागच्या डिसेंबरमध्ये त्याचा एक सहकारी रिटायर झाला, तेव्हा एक मोठा निरोप समारंभ झाला होता. हारतुरे, गिफ्ट्स, खाणंपिणं, ती स्तुतीपर भाषणं यांची नुसती रेलचेल होती. खरंतर, त्याचा सहकारी रागीट आणि तुसड्या स्वभावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये थोडासाही प्रिय नव्हता. पण निरोप समारंभाची जनरीत पाळणं महत्त्वाचं होतं. शिवाय मोठ्या साहेबांची…
माधवी जोशी माहुलकर विदर्भातील खाद्यसंस्कृती समृद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा या गावांसह इतर खेड्यांमधे वाळवणाचा असाच एक पापडा हा पारंपरिक प्रकार केला जातो. पापडा करताना गहू ओलावून पीठ तयार करतात. हे पीठ चांगले मळून, दीड-दोन तास मुरत ठेवतात. नंतर त्याच्या मोठमोठ्या पोळ्या लाटून घेतात आणि त्या परत हातावर घेऊन त्यांना दोन्ही हातांनी गोल गोल फिरवत अजून मोठा आकार देतात. एका मोठ्या परडीवर तो पापडा वाळत घालतात. पापडा उन्हात कडकडीत वाळले की त्यांचा हातानेच चुरा करून हवाबंद डब्यात भरून ठेवतात. हा प्रकार वर्षभर साठवून ठेवला जातो. अगदी फोडणीच्या पोळीसारखा किंवा फोडणीच्या शेवयांसारखाच असणारा हा पदार्थ कसा करतात ते पाहूया! एकूण…
हिमाली मुदखेडकर माहेरी गावी जाण्याचा खूप वर्षांनी योग आला होता. वामकुक्षी आटोपून मस्तपैकी फक्कड चहा घेतला… आणि फेरफटका मारून यावा म्हणून निघाले. आजूबाजूचा परिसर अनोळखी वाटावा, इतका बदल झाला होताच. तरी काही ओळखीच्या… जुन्या खुणा शोधण्याचा अट्टाहास नजर करत होती… पण कुठे काही खाणाखुणा सापडत होत्या… तर कुठे अगदीच नावीन्य पसरले होते… अशीच पुढे पुढे जात मी त्याच जुन्या पाण्याच्या टाकीजवळ आले… सहज नजर वर टाकीकडे टाकली… पण ते मधमाशांचं पोळं नव्हतं तिथे, जे पूर्वी आम्ही तेथून जात असताना नेहमी दिसायचं… सवयीने नजर समोरील घराकडे वळली. असं वाटल की, तिथेही अपेक्षित चाफा नसेल आता… पण सुखद आश्चर्याचा धक्का! चाफा होता…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जीविता । तोहि निका वर उभयतां । दिसत असे ॥229॥ ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङ्गपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥230॥ हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसलें । परि आता पुसेन कांहीं आपुलें । अपेक्षित ॥231॥ अर्जुन उवाच : अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः । अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥36॥ तरी देवा हें ऐसें कैसें ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 01 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 09 आश्विन शके 1947; तिथि : नवमी 19:00; नक्षत्र : पूर्वाषाढा 08:05 योग : अतिगंड 24:32; करण : बालव 06:38 सूर्य : कन्या; चंद्र : धनु 14:26; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:27 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 महानवमी नवरात्रोत्थापन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – ऑक्टोबर महिन्याचा आजचा पहिला दिवस खूप शुभ असेल. दिवसभर सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. नोकरी शोधणाऱ्यांना एखादी चांगली बातमी…
डॉ. अस्मिता हवालदार पाऊस म्हटल्यावर मला सॉमरसेट मॉमची ‘Rain’ ही कथा आठवते आणि दुसरी शंकर पाटील यांची ‘वळीव’. गेले दोन-तीन दिवस पाऊस पडतोय. पावसाळी वातावरण झालंय… हलका गारवा आला आहे. रस्त्यावर पाणी साचल्यावर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या चिंता आहेत. छत्री किती दिवस सोबत ठेवायची? कपड्यांवर चिखल उडेल… गाडी खराब होईल… घरात चिखलाचे पाय येतील… कपडे वाळणार नाहीत… आज ट्रॅफिक जॅम होईल… अशा अनेक. यातल्या सर्व किंवा बऱ्याचशा माझ्याही मनात आहेत. विचारचक्र सुरू झालंय. घरी खिडकीत पाऊस enjoy करत नुसते बसून रहाण्याचे आता दिवस नाहीत. तर ‘रेन’ आणि ‘वळीव’ कथांबद्दल. ‘रेन’ कथा प्रशांत महासागरातल्या एक बेटावर घडते. लहानशा बेटावर भरपूर, सतत मुसळधार…
सतीश बर्वे महेशने माझ्या हातात एक पत्र ठेवले… आज ना उद्या ते होणारच होते, याची मला जितकी खात्री होती, त्याच्या दसपटीनं अधिक खात्री महेशला होती. अपेक्षेप्रमाणे बॅंकेने महेशला निर्दोष ठरवून सन्मानपूर्वक परत कामावर रुजू व्हायला सांगितले होते! उद्यापासून महेश नसण्याची सवय मला आणि माझ्या हॉस्पिटलच्या स्टाफला करून घ्यायची होती. मला आठवला तो दिवस… रोज तो दिसायचा सोसायटीच्या मुख्य दरवाजाच्या आत लावलेल्या बाकड्यावर… शून्यात नजर लावून बसललेला… आज शेवटी संध्याकाळी घरी परत येताना त्याला याबाबतीत विचारायचं असं ठरवूनच सकाळी मी हॉस्पिटलला जायला म्हणून घराबाहेर पडलो होतो… संध्याकाळी सुदैवाने तो तिथेच होता बसलेला. मी त्या बाकड्यापाशी थांबून त्याच्या खांद्यावर हात ठेवला अन्…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – रोजच्या जेवणात कढीपत्ता अथवा करेपाक नेहमीच वापरला जातो. अशावेळी कढीपत्त्याची चटणी हा एक प्रकार रोज आहारात वापरला तर मधुमेह, रक्तदाब आणि ॲसिडिटी असणाऱ्यांना थोडाफार फायदा होतो. कढीपत्त्याची पाने चांगली कोरडी होतील, अशी वाळवावीत, पण तीही सावलीत. पानांच्या प्रमाणात अंदाजाने एक-दोन सुक्या लाल मिरच्या, दोन चमचे धणे, प्रत्येकी एक चमचा जिरे आणि मिरे, थोडासा आंबटपणा येण्यास लिंबाएवढी चिंच किंवा आमसूल घेऊन, तेल किंवा तूप न घेता कढईमध्ये चांगले कोरडे होईपर्यंत परतून घ्यावे. कढीपत्त्याची वाळलेली पाने आणि सर्व…
चंद्रकांत पाटील तात्या पाटलाला दोन मुली आणि दोन मुलगे… दोन्ही मुलींची आणि थोरल्या मुलाचे लग्न झाले होते. शेवटचा पांडू त्याचे लग्न झाले की, तात्या मोकळा होणार होता. पांडु शिकला नाही, त्यामुळे शेतीच करत होता. अर्थात, शिकायचीबी काही गरज नव्हती म्हणा, कारण तात्याकडे जमीन भरपूर होती. शिवाय… भलेमोठे घर, जनावराने भरलेला गोठा, गडीमाणसं… मोठा खटाला होता… तर अशा या पांडूच्या लग्नाचं बघायचं चाललं होतं. गेली दोन-तीन वर्ष बघणं सुरू आहे, पण मनासारखं स्थळ मिळत नव्हतं. कधी मुलगी पसंत पडायची तर, तिला मुलगा पसंत नसायचा. मुलीला मुलगा पसंत असायचा तर, घरचं बरोबर नसायचं. हे सगळं जुळून यायचं तवा पत्रिका जुळायची नाय आणि…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

