Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळा, खरबूज आणि कलिंगड यांच्या बियांचा वापर हेही वाचा – Kitchen Tips : कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा अर्जुन उवाच : संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यत् श्रेय एतयोरेकं तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥1॥ मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचे बोलणें । एक होय तरी अंतःकरणें । विचारूं ये ॥1॥ मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु । तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ॥2॥ ऐसें द्वयर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांचिया चित्ता । आपुलिये चाडे अनंता । उमजू नोहे…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस आनंददायी आणि भाग्यशाली असेल. नफ्याच्या संधी वाढतील. याव्यतिरिक्त, नवीन संधी समोर येतील. करिअर बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. परदेशात व्यवसाय करण्याचा विचार करणाऱ्यांना आज संधी मिळू शकते. कुटुंबात प्रेम, सुसंवाद आणि आपुलकी राहील. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. वृषभ – आजचा दिवस संमिश्र असेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. कामावर काहीतरी नवीन करून पाहण्याची संधी मिळेल. नवीन संपर्कांचा फायदा होईल. पैसे कमविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. नोकरदार जातकांना आज काही चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. आरोग्य सामान्य राहील. मिथुन – दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. काही गोष्टींमध्ये यश मिळेल,…
नितीन फलटणकर रात्रीचे दहा वाजले होते. आजही प्राजक्ताला ऑफिसवरून यायला उशीर झाला होता. दिवसभराचं काम करून माणूस किती थकून जातो, या विचारातच तिनं गाडीला किक् मारली अन् ती कधी ऑफिसवरून निघाली आणि कधी घर आलं हे तिलाच कळलं नाही. गाडीवर बसल्यानंतर तिचे फक्त डोळेच उघडे होते. मन मात्र कुठंतरी गुंतलं होतं. मनात सततचे विचार. कल्लोळ, गोंधळ, मनाचे अन् मेंदूचे द्वंद चाललेलं… डोळ्यांवर समोरच्या गाड्यांचा तीव्र प्रकाशही तिच्या मनात निर्माण झालेला अंध:कार दूर करू शकत नव्हता. तिला अभिव्यक्त व्हायचं होतं, मनमोकळं रडायचं होतं. ती थकली होती, तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं. मन भरकटून हेलकावे खात होतं. तिने आपार्टमेंटमध्ये गाडी लावली.…
गजानन देवधर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला (3 तारीख) आमच्या आण्णांची (वडिलांची) 104वी जयंती होती. आयुष्यभर रसिकतेनं, उत्साहानं आणि माणसांशी नातं जपत जगलेल्या त्यांच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. खेळाडूपणा, नाट्याची आवड, खवय्येपणा, गप्पिष्ट स्वभाव आणि सतत काही ना काही उपक्रमात रमणं—या सगळ्या पैलूंनी त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसायचं. 3 तारखेच्या पहाटे जाग आली आणि त्यांच्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली. लहानपणी त्यांच्याबद्दल मनात आदरयुक्त भीती होती. त्या भीतीमागे खरंतर त्यांच्या उंच व्यक्तिमत्त्वाचा आणि आमच्या आदराचा संगम होता. आण्णा लहानपणापासून उत्तम खेळाडू होते. मल्लखांब, कबड्डी हे त्यांचे आवडते खेळ. मुंबईपर्यंत संघाचं प्रतिनिधित्व करून त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. लग्नानंतरसुद्धा ऑफिसाहून परत येऊन ते खेळायला…
माधुरी साने रोवळी ही एक पारंपरिक मराठी रेसिपी आहे. दिवाळीचा फराळ बाहेरून तयार खरेदी करण्याचा कल वाढत असला तरी, आजही अनेक घरांमध्ये दिवाळीचा फराळ तयार केला जातो. रोवळी ही देखील त्यातीलच एक गोड पदार्थ आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ही बनविली जाते. थोडाशा साहित्यातून ही स्वादिष्ट मिठाई दिवाळीचा आनंद द्विगुणीत करते. ही रोवळी चवीला खूप छान लागते. साहित्य एकूण कालावधी – पाऊण तास हेही वाचा – Recipe : ढोबळी मिरचीचे पंचामृत कृती हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का? टीप तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची ओवाळणी । सज्जनाचिये आयणी । विसांवा जगीं ॥213॥ तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मऱ्हाठे बोल । जे समुद्राहूनि खोल । अर्थभरित ॥214॥ जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें । शब्दाची व्याप्ती तेणें पाडें । अनुभवावी ॥215॥ ना तरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा । बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावे ॥216॥ हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार भाऊबीज यमद्वितीया वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस शुभ आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कामांसाठी आज सन्मान केला जाईल. ज्यामुळे कुटुंबाला तुमचा अभिमान वाटेल. निर्णय क्षमता सुधारल्याचा फायदा होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. काही कारणाने आजारी पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. वृषभ – आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन कामासाठी घरातून बाहेर पडले तर यशच मिळेल. नोकरदार जातकांच्या ऐहिक सुखात वाढ होऊन दिवस आरामात जाईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, आर्थिक लाभ होतील. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढल्यामुळे मन प्रसन्न राहील. संततीकडून एखादी चांगली बातमी…
दीपक तांबोळी ‘श्रीगणेश ज्योतिष कार्यालय’ ही पाटी वाचून मी आत शिरलो. आतमध्ये 10-12 जण बसले होते. त्यातल्या एकाला मी “गुरुजी आहेत का?” असं विचारलं. त्यानं होकारार्थी मान हलवली. आतल्या खोलीतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता. बहुतेक गुरुजी कुणाला तरी भविष्य सांगत होते. बाहेरच्या गर्दीवरुन गुरुजी चांगलेच प्रसिद्ध ज्योतिषी असावेत असा अंदाज येत होता. दीडएक वर्षापूर्वी एखाद्या ज्योतिषीकडे एवढी गर्दी पाहिली असती तर, मी नक्कीच या लोकांच्या अंधश्रद्धेवर हसलो असतो. तसा मी नास्तिकच. ज्योतिष हे थोतांड आहे, असं मानणारा. आकाशातील करोडो मैलांवरचे ग्रह माणसांच्या जीवनावर कसले परीणाम करणार? असं म्हणून ज्योतिषशास्त्राची येथेच्छ टिंगलटवाळी करणारा! पण दीड वर्षापूर्वी बी.ई. पास झाल्यानंतर…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : टोमॅटो, आले-लसणाची पेस्ट अन् अलवार पोळ्यांसाठी… हेही वाचा – Kitchen Tips : कांद्याची पेस्ट, वाटणाच्या वड्या अन् खोबऱ्याचा किस… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

