Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – ज्यांना हितचिंतक समजता तेच तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायाशी संबंधित प्रवास लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. नोकरदार जातकांना कनिष्ठांकडून पुरेसा पाठिंबा मिळणार नाही. त्यामुळे बाहेरून मदतीची अपेक्षा कराल. कामासंदर्भातील वाटाघाटीचे प्रयत्न फारसे फलदायी ठरणार नाही. आजचा दिवस काही जातकांना नकारात्मक परिणाम देणारा ठरेल. वृषभ – रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. आशा आणि उत्साहामुळे तुमचा कामे उरकण्याकडे अधिक कल असेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबातील सदस्य एखाद्या कामासाठी स्वतःहून मदतीचा हात पुढे करतील. आज आर्थिक अडचणींमधून मुक्तता मिळेल. प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढविण्यासाठी काही सामाजिक कार्य हाती घ्याल. मिथुन -…
नितीन फलटणकर तुषार आज लवकरच घरी आला होता. त्याला ऑफिसमध्ये अस्वस्थ वाटत होतं. गेल्या काही दिवसांपासून विचारांनी त्याच्या डोक्याचे खोबरे केले होते… त्याला समजत नव्हते, नेमके काय करावं? मनाची समजूत काढता काढता तो पुरता हतबल झाला होता. हे वयही पुन्हा प्रेमात पडण्याचे नव्हते. हे प्रेम होतं, आकर्षण होतं का वासना? मनात नुसता गोंधळ. काही केल्या त्याचं मन त्याला साथ देत नव्हतं. जेव्हा मन हतबल होतं, तेव्हा आपसुकच आयुष्यातील सप्तरंग डार्क ब्लॅक ॲण्ड व्हाइट होऊन जातात. आपण का जगतोय, हा प्रश्न गोंधळ घालायला लागतो. पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडेंच्या गाण्याची जागा जगजित सिंग, गुलाम अली घेतात. सकाळपेक्षा संध्याकाळ अधिक जवळची…
यश:श्री ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटाच्या निमित्ताने डायनॉसॉर हा अजस्र प्राण्याची कल्पना सर्वांना आली. पण अजस्र प्राण्याबद्दल कुतूहल हे कायम असते. आजघडीला हत्ती हा भूतलावरील अजस्त्र प्राणी आहे. असे म्हटले जाते की, हत्ती हा प्राणी मूळचा आफ्रिकेतला आहे. नंतर तो इतरत्र आढळला. म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि अॅन्टार्टिकाच्या निर्जन भागातही ते होते. पण नंतरनंतर इतर ठिकाणचे हत्ती नष्ट होऊन केवळ आफ्रिका आणि आशियामध्ये हत्ती अद्याप उरले आहेत. मोहेंजदडोच्या काळातील कलाकुसरींवर हत्तींचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. यावरून किती प्राचीन काळापासून हत्तीचे वास्तव्य होते, हे सिद्ध होते. तसेच, सांची येथील प्रसिद्ध स्तुपामध्येही हत्तींची विविध चित्रे आहेत आणि या चित्रांवरून त्या काळच्या कलाकारांची कुशलताही आपल्या लक्षात येते.…
माधवी जोशी माहुलकर फणसाची भाजी सगळ्यांचीच आवडती असते, मग ती सुकी करा किंवा रस्सा! अनेकांना ही भाजी नॉन-व्हेजसारखी वाटते. मसालेदार तर्रीची नॉन-व्हेजसारखी चवीला असणारी ही फणसाची भाजी सगळ्यांची रसना तृप्त करू शकते, असं मला वाटतं. ही भाजी मातीच्या हंडीत ग्रीन मसाला वापरून केली आहे… साहित्य हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले कृती एकूण कालावधी – साधारण एक तास हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा टीप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या…
गजानन देवधर भाग – 1 प्रवास करणं म्हणजे फक्त ठिकाणं पहात फिरणं नव्हे… प्रवास म्हणजे वेगवेगळे अनुभव घेणं, माणसं वाचणं सुद्धा! माझी पत्नी उज्ज्वला आणि मी, आम्ही भारतात केलेल्या प्रवासातील असंख्य आठवणींपैकी काही अनपेक्षित किंवा हृदयस्पर्शी क्षण आमच्या स्मृतीत राहिले, त्या ठिकाणी भेटलेल्या गाईड्समुळे. ते गाईड आम्हाला फक्त ती ठिकाणे दाखवणारे, तिथली माहिती सांगणारे नव्हते तर, ते होते उत्कृष्ट कथाकार, भारतीय वारशाचा जिव्हाळा असणारे किंवा अकल्पित विद्वान सुद्धा! त्यांच्यापैकी प्रत्येकाने आमच्या मनात घर केले, कधी त्यांच्या ज्ञानामुळे, वागणुकीमुळे किंवा त्यांच्या विषयाच्या आवडीमुळे… ग्वाल्हेरचा अचंबित करणारा मुलगा हिवाळ्यातली एक सकाळ, छान ऊन पडलं होतं, परंतु हवेत अजून गारवा होता. आमची टॅक्सी…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा एऱ्हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्हण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ॥165॥ तैसा सांख्याहूनि प्रांजळा । तरी आम्हांसारिखियां अभोळां । एथ आहाति कांही परि काळा । तो साहों ये वर ॥166॥ म्हणोनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा । विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि ॥167॥ तंव कृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्ग गमला निका । तरी काय जाहलें ऐकिजो कां । सुखें बोलों ॥168॥…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – सध्या नकारात्मक काळ सुरू आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाने केलेले प्रयत्न नकारात्मक परिणाम देणारे असतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या व्यवसायाशी संबंधित प्रवास पुढे ढकला. सुरू असणारे काम काळजीपूर्वक हाताळा. वृषभ – ध्येय साध्य करण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्न केल्यास फायदा होईल. मात्र कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अडकून पडू नका. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कालच्या मेहनतीचे फळ आज मिळेल. आळस सोडून द्या. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य उदयास येईल. मित्रांसोबत सहकार्य केल्यास नफा होईल. मिथुन – जोखीम टाळणे शहाणपणाचे ठरेल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे…
दीपक तांबोळी तिकीट काढून देवबा मूर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला, तेव्हा तीन वाजून गेले होते. मे महिन्याची ती दुपार… भयंकर उष्मा होता… अंगाची लाहीलाही होत होती… प्लॅटफॉर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं. गर्मीमुळे त्यांचेही चेहरे सुकून गेले होते. पॅसेंजर लेट झाली होती, तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर, ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच! चमकून त्याने दहा वर्षांच्या नातीकडे पाहिलं… तशी ती म्हणाली, “दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी!” त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं, “व्हय रं बेटा?” नातवाने निरागसपणे मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले. आजोबा…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये पौष्टिक नूडल्स, चटपटीत शेवेची भाजी आणि मिरिंडा केक बनवतानाच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : इडली ढोकळा, फिंगर चिप्स अन् बटाटेवडे… हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
मनोज जोशी कुठे तरी फोनची बेल वाजत होती… वैतागून कुस बदलली अन् माझ्या लक्षात आलं की, माझाच फोन वाजतोय. मी झटकन फोन हातात घेतला, सासऱ्यांचा फोन… “अरे, तुम्हाला मुलगी झाली… बोल अनुराधाशी!” माझा आनंद गगनात मावेना! “हॅलो, कशी आहेस? बरी आहेस ना?” “हं… हं…” सासऱ्यांनी पुन्हा फोन घेतला, “सिझेरीअन झालंय, त्यामुळे सध्या ती ग्लानीत आहे… नंतर बोलूया.” मी “ठीक” बोलून फोन कट केला. सकाळचे साडेअकरा वाजले होते. नाइट शिफ्ट करून घरी आल्यावर ब्रश केल्यानंतर दोन-तीन कप चहा करून ठेवला होता. गोड म्हणून आता चहाच पिऊया आणि आंघोळपाणी आटोपून लगेच बाहेर पडूया… बेत आखला. चहा पिता-पिता वर्षभराचा काळ डोळ्यासमोरून सरकला. मी…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

