Author: Team Avaantar

स्नेहा सुतार भाग – 5 खरंतर, जोरात आपटल्यामुळे डोकं जाम दुखायला लागलेलं. टेंगुळ बिंगुळ नाही ना, तिने एकदा मोबाइलच्या कॅमेऱ्यात सेल्फी मोडवर बघून घेतलं. लालसर झालेलं दिसत होतं. गाडी मुळगावला पोहोचली, तेव्हा आता सगळं आवरून बसुया म्हणून तिने बॅगची चेन नीट बंद केली. इअरफोन काढून वरच्या कप्प्यात टाकले, त्याचीही चेन लावली. आता जरा ती सावरुन बसली. गार वारा चेहऱ्यावर येत होता. पाऊस पडून गेल्यामुळे सगळी झाडं निथळत थरथरत उभी होती. “सुशांत बार” कंडक्टर ओरडला. दोन माणसं पुढे सरसावली. त्यांचा स्टॉप आल्यामुळे गर्दी ढकलत, उकलत पुढे गेली आणि दाराकडल्या दांड्याला धरून उभी राहिली. “राव रे, सुशांत बार्र” पुढच्या माणसाने कंडक्टरला सांगितलं.…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले । तिये मृत्युलोकींचिये शेवटिले । येणें जाहालें हाटवेळे ॥496॥ आतां सुखेंसि जीविता । कैंचीं ग्राहिकी कीजेल पांडुसुता । काय राखोंडी फुंकितां । दीपु लागे ॥497॥ अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रस घेइजे पिळुनी । तया नाम अमृत ठेउनी । जैसें अमर होणें ॥498॥ तेविं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥499॥ कां शीस खांडुनि आपुलें । पायींचां खतीं बांधिलें । तैसें मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥500॥ म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचां…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण टीम अवांतर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1914 रोजी देवराष्ट्रे (सातारा जिल्हा) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, त्यात त्यांनी भाग घेतला होता. 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात ते सामील झाले होते. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. 1946 साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव चव्हाण दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले. 1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली तर…

Read More

दीपक तांबोळी जाँगिंग ट्रँकवर दहा राऊंड मारुन मी घामेजलेल्या अवस्थेत बाकावर बसलो. एक साठी उलटलेले गृहस्थ तिथे अगोदरच बसलेले होते. बऱ्याच दिवसांपासून मी त्यांना या उद्यानात पहात होतो. अर्थात आमचं बोलणं कधी झालं नाही. शहरात हीच समस्या असते कोणी कुणाशी स्वतःहून बोलत नाही. प्रत्येकजण आपापल्या कोषात गुरफटलेला! नाही म्हणायला ज्येष्ठ नागरिकांचे बरेच ग्रुप्स उद्यानात फिरताना दिसायचे. पण हे गृहस्थ मात्र एकटेच दिसायचे. ते त्या ग्रुपमध्ये का सहभागी होत नाहीत, हा नेहमीच प्रश्न पडायचा. आज मात्र मी स्वतःहूनच त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. “नमस्कार सर…” माझ्या बोलण्यावर ते एकदम दचकले. कदाचित मी त्यांच्याशी बोलेन, अशी त्यांना अपेक्षाच नसावी. “नमस्कार नमस्कार…” ते हात जोडत…

Read More

रेवती निलेश पांडे पंचवीस-एक वर्षांपूर्वी जवळपास सगळ्यांच्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या नातेवाईकांकडे जायच्या. काका, मामा, मावशी यांच्याकडे आम्ही अगदी महिना-महिनाभर राहायचो किंवा चुलत भावंडं आमच्याकडे यायची. तेव्हा कुठे मोबाइल होते? टीव्हीवरही फक्त ‘दूरदर्शन’च दिसायचं. मग मनोरंजनासाठी काय होतं? तर फक्त गोष्टी! आत्ताच्या लहान मुलांना कदाचित हे फार कंटाळवाणं वाटेल, पण आम्हाला गोष्ट ऐकताना खूप भारी वाटायचं. गोष्ट सांगणं ही सुद्धा एक कलाच होती आणि तेव्हा ती बऱ्याच लोकांना अवगत होती. आमचे एक मामा आजोबा नेहमीच उलट्या पायाच्या हडळीची गोष्ट सांगायचे; आजी शकुंतलेची, रामाची, कृष्णाची गोष्ट सांगायची. एक ज्योती आत्या होती, ती नेहमी राजकुमार आणि राजकुमारीची गोष्ट सांगायची. सारख्याच धाटणीच्या वेगवेगळ्या गोष्टी असायच्या.…

Read More

माधवी जोशी माहुलकर विदर्भामध्ये फार पूर्वीपासून उन्हाळा आणि कच्चा चिवडा असे समीकरण ठरलेले आहे. तसा हा चिवडा जेव्हा मनात येईल, तेव्हा करता येतो; परंतु उन्हाळ्यात कच्च्या कैरीचा यात वापर केल्यामुळे तो विशेष चवदार लागतो. सध्याच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे महत्त्व लक्षात घेता हा गॅस न वापरता केलेला कच्चा चिवडा सर्वांची मधल्या वेळेतील भूक भागवण्याकरिता उत्तम पर्याय ठरू शकतो. हा चिवडा खायची एक पद्धत आहे. अगदी भांड्याला लागलेले तिखटमीठ, शेवटचा पोह्यांचा उरलेला चुरा जोपर्यंत चाटून-पुसून खात नाही, तोपर्यंत ते भांडं हातातून सुटू द्यायचं नसतं. ही पद्धत सर्वांनी अनुसरायची असते. बहुतांश लोकांना कच्चा चिवडा कसा करतात ते माहीत असावे, तरीही त्याची रेसिपी देत…

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर दाताची विकेट जवळपास पडलीच होती, पण बेल्स मात्र काठावर अडकली होती… “आज सुट्टी आहे…” वगैरे चर्चा करून ‘डिस्ट्रॅक्शन मेथड’ वापरत… “किती स्ट्रॅांग मुलगा आहे…” कौतुकसोहळा रंगवून… ‘व्हर्बल ॲनेस्थेशिया’ देत हळूच दात उपटून काढला आणि त्याच्या हातात दिला. किंचित दुखलं, पण पडलेला दात बघून तो चकित झाला आणि म्हटला, ”काय करू?” आम्ही बालपणी पडलेला दात छतावर फेकायचो किंवा रात्री ‘दंतपरी’ येऊन भेटवस्तू देईल या अपेक्षेनं झोपताना उशीखाली ठेवायचो… मुलगा आपला ‘दात’ हातात घेऊन परतला आणि इकडं मला ‘वॉटरलू टीथ’ आठवलं! साल असावं 1815… युरोप हादरवणाऱ्या नेपोलियन…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळे । तिंहीं निर्जीवींही देवांची निडळें । बैसणीं केलीं ॥484॥ मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें । अथवा पातला हें समर्थावें । तेव्हां कायि साच ॥485॥ जेथ निववील ऐसिया आशा । हरें चंद्रमा आधा ऐसा । वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥486॥ तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहूनि आगळा । तो चंदनु केविं अवलीळा । सर्वांगी न बैसे ॥487॥ कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें । तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे ॥488॥ म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण…

Read More

दर्शन कुलकर्णी कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय क्रिकेटर विजय हजारे टीम अवांतर भारताला पहिली टेस्ट मॅच ज्यांनी जिंकवून दिली होती, त्या भारतीय क्रिकेटर विजय सॅम्युएल हजारे यांचा जन्म 11 मार्च 1915 रोजी सांगली येथे झाला. देवासचे महाराजा विक्रम सिंग यांनी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू क्लॅरी ग्रिमेट यांना भारतात बोलावले होते. त्यावेळी मध्यमगती गोलंदाजी किंवा थोडीफार लेगस्पिन गोलंदाजी करणाऱ्या विजय हजारे यांच्यावर ग्रिमेट यांची नजर पडली. त्यांना हजारे यांची फलंदाजी अधिक आवडल्याने त्यांनी हजारे यांना फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ग्रिमेट यांचा सल्ला मानून हजारे यांनी फलंदाजीवर मेहनत करण्यास सुरुवात केली. क्रिकेटर म्हणून वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात…

Read More

डॉ. अस्मिता हवालदार प्रतिभा कणेकर लिखित ‘इरावती कर्वे : भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ’… पुस्तकाचे नाव लांबलचक असले तरी सार्थ आहे. 2025मध्ये जानेवारी महिन्यात पहिली आवृत्ती निघाली आणि लगेच ऑगस्टमध्ये दुसरी सुद्धा आली. मुखपृष्ठावर इरावती बाईंचा सुंदर प्रसन्न हसरा फोटो आहे. लेखिकेची भाषा ओघवती आहे. इरावती बाईंचे संशोधन सोपे करून, समजेल अशा भाषेत सांगितले आहे. लेखिकेचे मनापासून आभार. इरावती कर्वेंबद्दल मला कुतूहल वाटत होतं, ते पुरातत्वाच्या अभ्यासक होत्या म्हणून! त्यावेळी हा विषय लोकांना माहीत नव्हता. आजही ते पुरेसे गांभीर्याने घेतले जात नाही. मी या विषयात पदविका अभ्यासक्रम केला, त्यावेळी याचे महत्त्व अधिकच लक्षात आले. इरावतीबाईंबद्दल बापलेकी पुस्तकात त्यांच्या दोन्ही मुलींनी…

Read More