Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग टीम अवांतर या विश्वाचं गूढ केवळ एका सिद्धांतामध्ये सांगता येईल का? यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डमध्ये 8 जानेवारी 1942 रोजी झाला. त्यांचे वडील जीवशास्त्राचे संशोधक तर आई वैद्यकीय संशोधन सचिव होती. त्यामुळे संशोधनाचं बाळकडू त्यांना आपल्या आई-बाबांकडून मिळालं. अगदी बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड निर्माण झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठामधून भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. मात्र वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांना मोटार न्यूरॉन डिसीजने गाठले. या आजारामुळे हळूहळू शरीर पक्षाघातानं ग्रस्त होते. आपल्या शारीरिक मर्यादांवर विजय मिळवून ते…

Read More

डॉ. श्रीकांत राजे होमिओपॅथी चिकित्सक वजन वाढीला मानसिक चिंता आणि ताण कारणीभूत असतो. अगदी “आपण बिल्कुल टेंशन घेत नाही,” म्हणणारे असो किंवा “टेंशन नै लेने का…” असे म्हणणारे “सर्किट” असो… हे सर्व कळत-नकळत ताण… कॉर्टिसॉन… लठ्ठपणाचे शिकार झालेले असतात. वस्तुत:, कंठस्थ ग्रंथी (थायरॉईड) स्त्राव रक्तात सोडते, त्यामुळे विविध टप्प्यानंतर हाडात कॅल्शियम स्थिरावते. एकूणच चालत्या-फिरत्या शरीराला वाढीसाठी आणि एकूणच शारिरीक, मानसिक, भावनिक, विकासाला थायरॉक्झिन हे संप्रेरक प्रोत्साहन देते. निर्माण होणारी उष्मा आणि प्रोत्साहीत चयापचय यामुळे वाढ / विकास छान होतो. श्वसन (सपाट पोट असताना) छातीचा पिंजरा “फुलतो कमी होतो”… फुफ्फुसाच्या आकुंचन प्रसरणामुळे हृदय निरोगी राहते. “सुटलेल्या पोटाने” मात्र छातीचा पिंजरा न…

Read More

सुधीर करंदीकर नुकताच म्हणजे 8 मार्चला जागतिक महिला दिन खूप उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. महिलांकडून खूप काही शिकण्यासारखे असते, त्यांचे खूप काही गुण घेण्यासारखे असतात, हे आपण सगळे जाणतोच आणि याचा आपण अनुभव पण घेत असतो (मी तरी नक्कीच घेत असतो). देवाने पण आई, बहीण, बायको, मुलगी, आजी, पणजी, आत्या, मावशी… हे सगळे छान छान रोल पण बायकांकडेच दिले आहेत! बायकांचा एक आगळावेगळा आणि चांगला गुण म्हणजे – बायका एकत्र जमल्या की, मनमोकळेपणाने खुल्या दिलाने फूल व्हॉल्युममध्ये गप्पा मारणे आणि त्या पण जोरजोरात हसत हसत! यामुळे त्यांचं मन नेहमीच एकदम मोकळं आणि नितळ राहत आणि तब्येत एकदम मस्त…

Read More

प्रणाली मंगेश महाशब्दे आज बऱ्याच दिवसांनी घरात गडबड नव्हती. आम्ही दोघे आणि आता आमची दोन मुलं म्हणजे मुलगा आरोह आणि मुलगी स्वरा असे चौघेच घरी होतो. तसे तर, आम्हाला तीन मुलं. मोठी मुलगी राणी जिचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. तीन महिन्यांपूर्वी लग्न ठरले. लग्न लवकर करायचे असे ठरले होते, कारण मुलाला सुटी नव्हती. तो एक महिन्याची सुट्टी घेऊन येणार होता. लग्न झाल्यावर मुलगी दुसऱ्या घरी यापेक्षा ती दुसऱ्या देशात जाणार, याचे जास्त दु:ख वाटत होते. त्यामुळे खूपच तयारी करायची होती. व्हिसासाठी फिरणे, लग्नाच्या खरेदीसाठी फिरण्यापेक्षा महत्त्वाचे होते. असो, सगळी गडबड संपून आज बऱ्याच दिवसांनी मी निवांत बसले होते. तेवढ्यात…

Read More

माधवी जोशी माहुलकर गणपत वाणी बिडी पितानाचावायाचा नुसतीच काडी;म्हणायचा अन मनाशीच कीया जागेवर बांधिन माडी… बा. सी. मर्ढेकरांची ही अजरामर कविता आपल्याला खूप काही शिकवून जाते. इयत्ता सातवी, आठवीत असताना ही कविता अभ्यासाला होती, पण तेव्हा त्यातील मर्म समजण्याची आमची कुवत नव्हती; पण आता वयाच्या पन्नाशीत जीवनाचे विविध अनुभव घेतल्यानंतर खरा ‘गणपत वाणी’ समजायला लागला. मर्ढेकरांचा गणपत वाणी हा एक विशिष्ट व्यक्तीसमूहाचे प्रातिनिधिक स्वरूप आहे, जो एका विशेष चौकटीमधेच आपले जीवन जगत असतो आणि त्याबाहेर जाऊन फारसे कष्ट न करता सुखासीन आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून असतो. त्याचे संपूर्ण आयुष्य फक्त स्वप्नरंजन करण्यातच जातं. आजही असे अनेक ‘गणपत वाणी’ आपल्या अवतीभवती…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा जो बहुवें विषयविलासें गुंफें । तो म्हणती उवायें पडिला सापें । जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥509॥ जयाचें आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरोनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडिल म्हणोनि ॥510॥ जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजें नाचती कोडें । आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं ॥511॥ जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचियाचि ऐसें । कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥512॥ अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ॥513॥ दर्दुर सापें गिळिजतु आहे…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्या संशोधक वा. वि. मिराशी टीम अवांतर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक आणि भारतविद्यातज्ज्ञ वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म 13 मार्च 1893 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कुवळे (सध्या जि. सिंधुदुर्ग) येथे झाला. त्यांनी मॅट्रिक, बी. ए. आणि एम. ए. या सगळ्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये प्रथमवर्ग पटकाविला. त्यांनी सुरुवातीस मुंबईतील शासकीय एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात त्यांनी एलएल. बी. पदवी प्राप्त केली. पुढे ते नागपूरच्या महाविद्यालयात नोकरी करू लागले. नागपूरमधील ‘विदर्भ संशोधन मंडळʼ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी इंग्रजीतील…

Read More

वैद्य विष्णू देविदास सावंत निसर्ग जेव्हा जुनी पाने गाळून नव्या पालवीने नटतो, आम्रवृक्ष जेव्हा मोहराने बहरतात आणि कोकिळेचा कुहू-कुहू स्वर कानी पडतो, तेव्हा समजावे की ‘ऋतूराज’ वसंताचे आगमन झाले आहे. वसंतोत्सव हा केवळ निसर्गाचा उत्सव नसून तो मनाला आणि शरीराला नवचैतन्य देणारा काळ आहे. आयुर्वेदानुसार, प्रत्येक ऋतू आपल्यासोबत शरीरात काही बदल घेऊन येतो. शिशिर ऋतूत (थंडीत) शरीरात साठलेला ‘कफ’ वसंतातील सूर्याच्या उष्णतेने वितळू लागतो. ज्याप्रमाणे हिमालयातील बर्फ वितळून नद्यांना पूर येतो, तसेच शरीरातील कफ वितळल्याने अग्निमांद्य, सर्दी, खोकला, आळस आणि पचनाचे विकार उद्भवू शकतात. आपल्या पूर्वजांनी ‘वसंतोत्सव’ केवळ आनंदासाठी नाही, तर आरोग्यासाठीही आखला आहे. होळीच्या धगीतून मिळणारी उष्णता असो किंवा…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 2 रविवारी विलास येऊन बाबांना घेऊन जातोय.. असे अनंताने घरी सांगताच विभा आणि रत्ना गप्प झाल्या. दोघींना हुरहूर लागून राहिली. विभाच्या डोळ्यांतून पाणी पाझरू लागले. रविवार म्हणजे दोन दिवस राहिले, हे लक्षात येताच तिने बेसन लाडू करायला घेतले… चकल्या केल्या. त्याचे छोटे डबे भरून ठेवले. काल बोलता बोलता बाबांना शिंपल्या फार आवडतात, हे तिला कळले. ती मुद्दाम मासेबाजारात गेली आणि तिने ताज्या शिंपल्या आणल्या आणि मालवणी पद्धतीने शिंपल्या बनवल्या. शिवाय इतर मासे होतेच! रविवारी दोघी गप्प गप्प होत्या. रत्ना तर आजोबांच्या खोलीतच होती. दुपारनंतर विलास आणि सरोज आले. सरोज विभाला म्हणाली, “विभा, तुला त्रास दिला गं…”…

Read More

साहित्य हेही वाचा – Recipe : तंदुरी पनीर कबाब अन् कुरकुरीत भेंडी कृती हेही वाचा – Recipe : अशी वरी तांदळाची खिचडी करून पाहिली आहे का? टिप (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More