Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
शोभा भडके भाग – 18 “ए बाय… पोरी, झालं माझं जेवण… लई मदत केलीस बघ तू!” साठच्या आसपास वय असलेली आजी आरुच्या जवळ येत म्हणाली. “आजी तुमचं जेवण पोटभर झालं ना? मग झालं तर… आणि हे बघा जवळ जवळ सगळी भाजी विकली. आता ही थोडीशी राहिली, ती मी घेते. आता तुम्ही घरी जा आणि आराम करा,” आरु त्या टोपलीतली भाजी एका पिशवीत भरत म्हणाली. “खरंच गं पोरी, लई गुणाची हायास बगं. सुखी रहा… तुला लई चांगला नवरा मिळू दी…” ती आजी आरूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. “आजी नवरा तर मिळालाय, पण… चांगला आहे की नाही, ते नाही माहीत…” ती समोरून…
सुधीर करंदीकर शाळा, कॉलेज सोडून बरीच वर्षं सरतात… तेव्हाच्या बऱ्याच मित्र-मैत्रिणींचे आपल्याकडे मोबाइल नंबर नसतात. त्यामुळे कधी बोलणे नसते आणि भेटही नसते. त्यातल्या कुणाची अचानक 50 वर्षांनंतर अचानक भेट व्हावी, आणि नुसती नजरानजर होताच, त्यांनी एकमेकांना नावासकट ओळखावे, हे शक्यच नाही, असेच सगळे म्हणतील. कारण, चेहेऱ्यात बदल झालेला असतो, डोक्याचे केस पांढरे झालेले असतात, अनेकांना ‘मुलांना’ टक्कल पडलेले असते, आवाजात बदल झालेला असतो वगैरे वगैरे. पण जुन्या मैत्रीत काही खासियत असेल, तर मात्र अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होतात. यावरचा हा माझा अनुभव… नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता एकटाच फिरायला बाहेर पडलो. कोथरूडजवळ मृत्युंजय मंदिरासमोरून फुटपाथवरून जात होतो. अधून मधून इथे…
माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि बनवण्याची पद्धत पाहिली तर, आपल्याला आपल्या घरच्या पदार्थांची आठवण येईल. फलाफल आणि दक्षिण भारतात लोकप्रिय असलेल्या ‘मसाला वडा’मध्ये (Chana Dal Vada) कमालीचे साम्य आहे. फलाफलमध्ये ‘छोले’ वापरतात, तर मसाला वड्यामध्ये ‘चणा डाळ’ वापरली जाते. दोन्ही कडधान्येच आहेत. वड्यांमध्ये डाळ न शिजवता फक्त भिजवून, जाडसर वाटून त्याचे गोळे तळले जातात. फलाफलमध्ये काबुली चणे भिजवून आणि थोड शिजवून मग ते वापरतात. फलाफलमध्ये कोथिंबीर आणि लसूण असते, तर आपल्या वड्यांमध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, आले आणि हिरवी मिरची असते. उत्तर भारतात बनवले जाणारे राम लाडू (मूग डाळीचे वडे) किंवा साध्या…
मेष या आठवड्यात सकारात्मक गोष्टी घडतील. नोकरदारांना नवीन संधी मिळतील. सुट्टी सहज मंजूर होईल. नवीन जॉब स्वीकारला असेल तर, सुट्टीत फिरून या, कुटुंबाला चांगला वेळ द्या. व्यावसायिक वर्गाला कामाचा ताण जाणवेल. विशेषत:, नवीन ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. यासाठी हाताखालील लोकांच्या मागे लागून काम पूर्ण करावे लागेल. महिलांना सासरची माणसे भेटतील. काही नवीन घडामोडी घडतील आणि त्यामुळे आनंदी रहाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल. याचसाठी त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा. वृषभ हा आठवडा फायद्याचा असेल. आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे योग्य फळ नोकरदारांना या आठवड्यात मिळेल. ऑफिसमधील वातावरण चांगले राहील. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने व्यवसाय विस्तारासाठी योग्य कालावधी आहे. आर्थिक उत्पन्नात वाढ…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा- । विलासिया ॥1॥ नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या । तरुणतरतूर्या- । लालनलीला ॥2॥ नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥3॥ नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिगुणसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥4॥ नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना । विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥5॥ तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु । तैं सारस्वतीं प्रवेशु । बाळकाही आथी ॥6॥ दैविकी उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरसदीपांचा । थावो लाभे ॥7॥ जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगिकारी । तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा ॥8॥ हें असो दिठी जयावरी झळके…
दर्शन कुलकर्णी पापमोचनी एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष देशातील पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल टीम अवांतर देशातील पहिल्या महिला वैमानिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरला ठकराल यांचा जन्म 8 ऑगस्ट 1914 रोजी दिल्ली येथे झाला. वयाच्या 16व्या वर्षी सरला यांचं लग्न लाहोरमधील पी. डी. शर्मा यांच्याशी झालं. शर्मा स्वतः एअरमेल पायलट लायसन्स मिळालेले तत्कालीन अविभक्त भारतातले पहिले भारतीय पायलट होते. शर्मा यांच्या घरात ते धरून एकूण नऊ पायलट होते. लग्नानंतर सरला यांनीही विमानोड्डाणाचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 21व्या वर्षी, 1935 साली साडी नेसून कॉकपिटमध्ये बसून विमान त्यांनी उडवलं. हेही वाचा – योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास लायसन्स मिळवताना सरला यांनी…
मधुर कुलकर्णी भाग – 1 रुंजी टिफिन घ्यायला किचनमध्ये आली आणि उमा तिच्याकडे बघून म्हणाली, “रुंजी, अग हा युनिफॉर्म घेऊन फक्त सहा महिने झाले आहेत आणि हा देखील तुला आता होत नाही. काय करावं तुझं कळतच नाही. वजन कमी कर ग बाई! सायकलिंग करत जा, पोहायला जा म्हणून किती तुझ्या मागे लागायचं… नुसतं खाणं आणि झोपणं!” आईने परत खाणं काढलं तसं रुंजीचे डोळे भरून आले. “उमा, का तिला शाळेत निघताना बोलतेस? असते एखाद्याच्या शरीराची ठेवण! …आणि सारखं तिचं खाणं काढत जाऊ नको. मला आवडत नाही. रुंजी, ये राजा, डोळे पूस.” उषाताईंनी रुंजीला जवळ घेतलं. आजीचा तो मायेचा स्पर्श झाल्याबरोबर रुंजीला…
प्रणाली प्रशांत वैद्य भाग – 16 सकाळचा मंद वारा, चहाच्या वासाने भरलेलं अंगण आणि घरभर पसरलेलं एक वेगळंच औपचारिक वातावरण… सगळं काही आज खास वाटत होतं…..गुरुजींचं आगमन ही एक साधी बाब नव्हती, तर जणू काही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अदृश्य चेतना निर्माण झाली होती… गाडीचं हॉर्न ऐकताच आनंदी आणि सुमित्रा आजी धावत अंगणात आल्या. आराध्याही त्यांच्या मागून आली, तिचं मन थोडं बेचैन पण उत्सुक होतं… गुरुजी गाडीतून उतरले. मध्यम उंची, त्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा आणि चेहऱ्यावर शांततेचं, पण आतून धगधगतं तेज! त्यांच्या नजरेत अशी धार होती, जी समोरच्याला उकलून टाकायची ताकद बाळगून होती… सगळ्यांनी वाकून नमस्कार केला. गुरुजींनी प्रेमाने हात…
डॉ. विवेक वैद्य खूप जुनी गोष्ट आहे. मी लहान होतो… आम्ही चाळीत राहायचो तेव्हा. साधारण दहा-बारा घरे असतील. दोन-तीन घरांचा अपवाद वगळता सर्व कौलारू घरे. समोर एक पटांगण. पटांगणाच्या एका कोपऱ्यात छोटेसे देवीचे मंदिर. त्याच्याच बाजूला भलेमोठे वडाचे झाड. त्याच्या जाड पारंब्या थेट जमिनीला भिडलेल्या. आम्ही मुलेमुली त्यावर झोके घ्यायचो. मी चौथीत असेन. शाळा सकाळची. दुपारी जेवण, अभ्यास, थोडी झोप काढली की, चार साडेचारच्या सुमारास पटांगणात खेळायचे वेध लागायचे. कब्बडी, विटीदांडू, भोवरा, आबाधाबी असे खेळ खेळायचो. मुलीही आमच्यातच खेळायच्या. आमचा कॉमन खेळ असायचा काचापाणी. मुली क्वचित त्यांचे वेगळे खेळ खेळायच्या… सुमी चाळीतल्या शेवटच्या घरात राहायची. तीही चौथीत आणि आमची शाळा…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अहो ऐकिजत असे कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा । जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे ॥522॥ तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला । कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा ॥523॥ तऱ्ही दातारु हा आमुचा । म्हणोनि हें बोलतां मैळेल वाचा । काइ झालें ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥524॥ परि बाप भाग्य माझें । जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें । कैसा रक्षिलों मुनिराजें । श्रीव्यासदेवें ॥525॥ येतुलें हें वाडें सायासें । जंव बोलत असे दृढें मानसें । तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्विकें केलें ॥526॥ चित्त…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 245
- अवांतर 173
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 184
- मैत्रीण 16
- ललित 508
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

