Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
स्नेहल अ. गोखले मी आणि सुमती फोनवर बोलताना नेहमीप्रमाणे लहानपणीच्या आठवणी निघाल्या. तेव्हा उल्काही डोळ्यासमोर आली. आम्ही नेमके केव्हा भेटलो, हे आठवत नाहीये. विजू माझ्या वर्गातच होती. साधारण तिसरी, चौथीत असू आम्ही. मी, उल्का, विजू, शकू केव्हा मैत्रिणी झालो, हे कळलेच नाही. मग काय ते खेळ… डब्बा ऐसपैस, लगोरी, लंगडी, ठिकरी, सुरपारंब्या असे सर्व तऱ्हेचे खेळ आम्ही खेळलो, ते आठवते. दोरीवरच्या उड्या किती मारल्या त्याला गिनतीच नाही. मे महिन्याच्या सुट्टीत पत्ते, सागरगोटे असे बैठे खेळ… शिवाय सायकलवर भटकंती, गोखले हॉलमध्ये लायब्ररीत जाऊन पुस्तके वाचणे, सकाळी टिळक टँकवर पोहणे… सर्व काही आठवतंय. आमच्या शाळेतून चिपळूणकर सर पोहायला शिकवण्यासाठी यायचे? मी त्यांना…
आराधना जोशी अशीच एकदा फेसबुकवरील पोस्ट वाचनात आली. मानसिक आरोग्याशी संबंधित आणि मुख्य म्हणजे borderline personality संदर्भात असणारी ती पोस्ट वाचून पायाखालची जमीन सरकली. किती प्रकारच्या छुप्या मानसिक तणावांशी आणि आजारांशी आपण नकळतपणे झुंजत असतो, ते लक्षात आलं. मुख्य म्हणजे असे ताण घेऊन एखादी व्यक्ती समाजात वावरत असताना तिच्या पालकांना किंवा जवळच्या व्यक्तींना याची साधी माहिती होऊ नये, यासारखे दुर्दैव नाही. अर्थात, याला जबाबदार नेमकं कोण? याचं उत्तर मिळालं तरी, जाणाऱ्या व्यक्ती परत येणार नसतात. तणावात असताना अनेकदा पालकांकडून दुर्लक्ष केलं जातं. शारीरिक दुखण्यातून आराम मिळावा यासाठी आकाशपाताळ एक करणारे पालक मानसिक आजाराबाबत संवेदनशील का नसतात? मानसिक आजाराचा संबंध कायम…
मंदार अनंत पाटील आज ‘लंडन आय’ आणि मत्स्यालय बघायचे नियोजित केले होते. थेम्स नदीच्या काठावर उभारलेले जायंट व्हिल आणि लगतच असलेली वेस्टमिन्स्टर ऐबी, लंडनमधील प्रसिद्ध असे घड्याळ आणि लागूनच असलेले मत्स्यालय असा सगळा जामानिमा आहे. देश-विदेशातून हजारो लोक इथे कायम गर्दी करतात. वेळेनुसारच आम्ही पोहोचलो आणि रांगेत साधारण 15 मिनिटे उभे राहिल्यावर लगेचच प्रवेश मिळाला. ‘लंडन आय’ साधारण हळूहळू वर जाते, त्यामुळे सभोवतालचा परिसर सावकाश बघता आला आणि अनेक प्रेक्षणीय गोष्टी दिसल्या. यथावकाश ‘लंडन आय’ची फेरी संपली आणि मग एक छोटासा लंच ब्रेक घेऊन लंडन एक्वेरियमकडे प्रस्थान केले. मानवनिर्मित पण अतिशय उत्तम आणि सुखसोयींनी अद्यावत हे मत्स्यालय. आत शिरतानाच देवमासा…
अर्चना कुलकर्णी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हा विषय मी अकरावी आणि बारावीला शिकवायचे. हा विषय चांगला असला तरी रटाळ आहे. तो विद्यार्थ्यांना समजायला हवा, आवडायला हवा म्हणून मी तो हसत खेळत, “टीचिंग -लर्निंग” पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करायची. हा महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, याबाबत माझा कटाक्ष असायचा. माझा विद्यार्थीवर्ग प्रॅक्टिकल्समध्ये कुशल, परंतु थिअरीमध्ये एक पाऊल मागे असायचा. त्यातून इंग्रजी माध्यमाचा मोठा अडसर होता, त्यामुळे प्रत्येक तत्व मी प्रथम मराठीतून समर्पक उदाहरण देऊन समजावायचे, नंतर तेच इंग्रजीतून शिकवायचे; शिवाय “टीचिंग लर्निंग” पद्धतीनुसार प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषय समजून सांगायचे. सांगण्याचा हेतू हा की, या पद्धतीने शिकवल्यावर विद्यार्थीवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळायचा. त्यांना रटाळ आणि कठीण…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! आज थोडा वेगळा विषय आहे. सेक्युलॅरिझम वगैरे नाही; पण मी जात, धर्म विशेष मानत नाही. मी जन्माने हिंदू आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान आहेच आहे. पण म्हणून मी दुसऱ्या धर्मांना कमी लेखणे किंवा अपमानास्पद वागवणे, या गोष्टी मला पटत नाहीत अन् आवडतही नाहीत. माणसाकडे माणूस म्हणून बघणे महत्त्वाचे नाही का? तर, आज एक आठवण सांगते… रमझानची! मी मढ येथून कधीच रात्री 11-11.30 वाजल्यानंतर ऑटोने एकटी घरी येत नाही. कितीही दमले असले तरी, बेस्ट झिंदाबाद. तोच प्रवास मला सेफ वाटतो. साधारणत: 10 वर्षांपूर्वी मी ‘बेइंतहा’ हिंदी सीरियलमध्ये काम करत होते. शूटच्या तारखा सलग नव्हत्या, मधे मधे…
मनोज जोशी सकाळीच नाशिकहून फोन आला, उमा वहिनी गेली. माझा मेहुणा महेश गोखलेची पत्नी. आयुष्यामध्ये ‘होत्याचे नव्हते,’ कसे एका क्षणात होते, याचे उदाहरण द्यायचे झाले तर, या महेशदादाचे देता येईल. दोघेही सरकारी नोकरीमध्ये. दोघेही मोठ्या पोस्टवर. पण साधारणपणे अडीच वर्षांपूर्वी उमा वहिनीला मेंदूमध्ये गाठ असल्याचे निदान झाले. पण नंतर ती कॅन्सरची असल्याचे समोर आल्यावर सगळेच हादरले. ऑपरेशन झाले. पण तिच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला. ती पटकन माणसे ओळखत नव्हती. कालांतराने तिला हळूहळू नातेवाइकांची ओळख पटायला लागली. त्यांच्याशी त्याच आपलेपणाने ती बोलू लागली. पण हे कुठपर्यंत? ते कोणालाच माहीत नव्हते. जळगाव, पुणे, कोल्हापूर असे करत-करत हे दाम्पत्य नाशिकलाच स्थायिक झाले होते. योगायोगाने…
मंदार अनंत पाटील सर्व प्राणी मित्रांमध्ये आणखी कायमचा लक्षात राहील तो माझा ब्रुस… लॅब्रेडॉर जातीचा अतिशय लाघवी, खट्याळ आणी माझ्यावर विलक्षण प्रेम करणारा माझा ब्रुस. खरे पाहता तो माझा लहानपणापासूनचा मित्र अमेय महाजनचा श्वान. 2017 साली पाच वर्षांनी मी भारतात आलो असताना एके दिवशी सहजच सकाळी सोसायटीबाहेरच पहिली भेट झाली. ब्रुस त्यावेळी जेमतेम चार महिन्यांचा असेल. पण अतिशय मस्तीखोर आणि खट्याळ होता. बघता क्षणीच आम्ही एकमेकांचे घट्ट दोस्त झालो. सुटटीचे पाच आठवडे होते, पण असा एकही दिवस गेला गेला नाही, जेव्हा मी आणि तो एकत्र नसू… मला तर त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको, असे व्हायचे. तो फक्त जेवायला आणि…
जी. भालचंद्र आज-काल आपल्यापैकी प्रत्येकाचा बँकेतील व्यवहारांशी संबंध येतो. आपल्यापैकी अनेकजण नेट बँकिंग, Appवर आधारित बँकिंग सेवा, यूपीआय पेमेंट इत्यादी सुविधांचा वापर करीत आहेत. तरीपण काही ना काही कारणासाठी आपल्याला बँकेच्या जवळील शाखेत जाण्याचा प्रसंग येतो. अशावेळी मला आलेल्या अनुभवाचे मजेदार किस्से मी सांगणार आहे. अनुभव एक हा अनुभव मला एका खासगी बँकेतील मुदत ठेव व्यवहाराबद्दल आलेला आहे. या बँकेत मी आणि माझ्या बायकोच्या नावाने मुदत ठेव करताना, अखेरच्या दिवसानंतर मुदत ठेव पुढील काही दिवसांसाठी परत रिन्यू करावी असा पर्याय दिला होता. जसा मुदत ठेवीचा अखेरचा दिवस जवळ येत होता तसं माझ्या लक्षात आलं की, ज्या कालावधीसाठी मुदत ठेव मी ठेवली आहे, त्या कालावधीकरिता व्याजाचा…
दिप्ती चौधरी जवळ-जवळ चोवीस तास प्रवास करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बंगलोरला पोहोचलो. पिंजऱ्यातून काढल्यावर लगेच आम्ही पळत बाहेर आलो. दूर उभे राहून आम्हाला आमच्या जागा पकडू दिल्या. कोणीही आमच्या जवळ यायचा प्रयत्न केला नाही. आम्ही थोडे सावरल्यावर थोडे खाणे, पाणी ठेवले. लिटर बॉक्स आधीच कोपऱ्यात होता. थोडावेळ आम्हाला एकटे सोडल्यावर आम्ही थोडे शांत झालो. थोड्या वेळाने आमची भीती कमी झाली आणि अर्धवट उघड्या दरवाजातून आम्ही बाहेर पडलो. एका खोलीत कपाटाचा जमिनीलगतचा खण रिकामा करून अर्धवट उघडा ठेवला होता. दनूने लगेच आत बस्तान बसवले. त्याला लपायला जागा मिळाल्याने सुरक्षित वाटत होते. तो गेला आत म्हणून मी पण थोडा वेळ बसून…
स्नेहल अ. गोखले भूतकाळातील काही अनुभव लिहून ठेवण्याचा विचार मनात तरळला. ‘आठवणी दाटतात धुके जसे पसरावे’ अशी अवस्था झाली आणि असंख्य आठवणींची रीघच लागली. पण काय काय म्हणून लिहायचं? मागे वळून पाहताना, आयुष्याच्या पटाचे बालपण, तारुण्य आणि आताचे वार्धक्य.. असे तीन भाग केले. आम्ही नारायण पेठेत श्री मोदी गणपतीपासून आत, भानुविलास आणि विजय टॉकीजच्या मधे, कॉमनवेल्थ कॉलनीत राहात होतो. शहरात असूनही नारळाची झाडे, नीरव शांतता, सात बंगले होते. आम्ही भाडेकरू होतो, पण शेजारी असणारी माणसे खूपच प्रेमळ आणि साधी होती. खास उल्लेख म्हणजे श्रुती मंगल कार्यालयाचे आपटे, गुप्ते, साळवेकर यांनी आमच्यावर खूप माया केली. कदाचित आई नसल्यामुळे अधिकच. मैत्रिणी आसपासच…

