Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
आराधना जोशी पुल स्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर, आनंदयात्रा मिळाली, निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली, हास्यगंगेत न्हाली असं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे, त्या पु. लं.ना जाऊन आज 25 वर्षे झाली. 8 नोव्हेंबर 1919 साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य तर होतंच, पण त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज तसेच माणुसकी कायमच दिसून आली. अशा या पुलंना दोन मिनिटांसाठी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता तो रत्नागिरीच्या समुद्रकिनारी. कोळंब्याहून रत्नागिरीला होडीने प्रवास करून आम्ही किनाऱ्याला लागत होतो आणि समोर साक्षात सुनीताबाई आणि पुलं. त्यांनीही…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 22 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 12 जून 2025 वार : गुरूवार तिथि : प्रतिपदा 14:27 नक्षत्र : मूळ 21:56 योग : शुभ 14:04 करण : तैतील 26:56 सूर्य : वृषभ चंद्र : धनु सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:16 पक्ष : कृष्ण मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – विनयशील वागण्याचे कौतुक होईल. योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक लाभ मिळवून देण्याची शक्यता आहे. संघर्ष विनाकारण वाढणार नाही, याची…
अजित गोगटे कल्याण येथे माझे वास्तव्य आणि नोकरी मुंबईत. सन 1978 ते सन 2020 अशी तब्बल 42 वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसएमटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. कल्याण ते बोरिबंदर हे रेल्वेचे अंतर 56 किमी आहे. मी सरासरी महिन्याला 25 दिवस कामावर गेलो, असे गृहित धरले तरी, या काळात मी लोकलने केलेल्या एकूण प्रवासाचे अंतर 14 लाख 11 हजार 200 किमी एवढे होते. परंतु मध्यंतरीची सलग 12 वर्षे मी तिकीट किंवा मासिक / त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. म्हणजे, माझा विनातिकिट केलेला प्रवास सुमारे चार लाख तीन हजार 200 किमी एवढा होता. मी…
यश:श्री मे महिना अर्धा सरल्यावर सर्वांनाच पावसाचे वेध लागतात अन् हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सूनची वाटचाल सुरू असल्याचे समजल्यावर पावसाचे तुषार अंगावर उडाल्यासारखे वाटते. यावर्षी पावसाचं आगमन लवकरच झालंय. उन्हाचा चटका वाढलेला असतानाच बरसणाऱ्या थेंबानं एक आल्हाददायक अनुभव सर्वांना दिला. तसं पाहिलं तर पावसात भिजायला कोणाला आवडत नाही? आकाशात काळे ढग जमले आणि गार वारे वाहू लागले की, सर्व ताणतणाव क्षणात निघून जातात. आता जलधारा कोसळणार आणि मन मोहून टाकणारा मातीचा सुगंध सर्वत्र दरवळणार… अशा वेळी आठवते कविवर्य बा. भ. बोरकर यांची कविता – टप टप टप पडती थेंब, मनी वनीचे विझती डोंब वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले गडद…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 21 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 11 जून 2025 वार : बुधवार तिथि : पौर्णिमा 13:13 नक्षत्र : ज्येष्ठा 20:10 योग : साध्य 14:03 करण : बालव 25:53 सूर्य : वृषभ चंद्र : वृश्चिक 20:10 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:15 पक्ष : शुक्ल पक्ष मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – एखाद्या व्यक्तीशी असणारे वैर त्रासदायक ठरू शकते. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमची फूट पडू शकते. भाऊ,…
चंद्रशेखर माधव लोणावळ्यापासून सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर कोराईगड नावाचा एक किल्ला आहे. सुमारे 27-28 वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझा मित्र नारायण कोराईगडला ट्रेकला जायचं ठरवलं. आम्ही शनिवारी तीनच्या लोकलने लोणावळ्याला जाऊन पोहोचलो आणि तिथे थोडसं खाऊन वगैरे चालायला सुरुवात केली. आम्ही पूर्ण रात्रभर चालून पहाटेच्या वेळी गडावर पोहोचणार होतो. साधारणपणे संध्याकाळी सात-साडेसात वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. वाट माहीतच होती. रात्री एकच्या सुमारास आम्ही ज्या वाटेने चालत होतो, त्या वाटेच्याच कडेला एक चांगली अशी जागा बघून आम्ही जो डबा नेला होता, तो खाऊन जेवण वगैरे उरकून घेतलं. थोडा वेळ विश्रांती घेऊन दोन अडीचच्या सुमारास पुन्हा चालायला सुरुवात केली.…
उमा सुहास काळे स्त्री तरुण झाली की, आईबापाची साथ सोडते आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते… मग तो चांगला असो की वाईट, सज्जन असो की दुर्जन, व्यसनी असो की ठसनी! जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते, त्यांच्या भावना समजून घेते, त्यांचे वाट्टेल ते लाड पुरविते, जे पाहिजे ते मुलांना खायला देते, नवऱ्याच्या नकळत मुलांना पैसे पुरविते. सहजिकच, ही भावनिक नाळ लहानपणापासूनच जोडलेली असते. मुलं उत्पत्तीपासूनच आईच्या उदरांत आणि जन्मापासून तिच्या सहवासात असतात. बऱ्याच परिवारात मुलं तरुण झाली, की बापाशी बोलत नाहीत! त्यांना जे मागायचं ते आईकरवी वडिलांना निरोप पाठवतात, आईशी मनमोकळेपणाने बोलतात, खुलपणाने मनातील सर्व…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 20 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 10 जून 2025 वार : मंगळवार तिथि : चतुर्दशी 11:35 नक्षत्र : अनुराधा 18.01 योग : सिद्ध 13:44 करण : विष्टी 24:27 सूर्य : वृषभ चंद्र : वृश्चिक सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:15 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आर्थिक बाजू मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. कुठल्या व्यक्तीला पैसे उधार दिले असतील तर आज ते परत…
सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे मी नक्षत्र कथा लिहीत आहे. प्रत्येक वेळी तीन अशा 27 नक्षत्रांच्या कथा आहेत. यामध्ये थोडा तुटकपणा वाटण्याची शक्यता आहे कारण मी अनुक्रमाने नक्षत्रांच्या कथा सांगणार आहे. अश्विन : आकाशात तीन ठळक तारकांचा समूह मिळून हे नक्षत्र तयार होते. आपणास या तारकांचा विशालकोन तयार झालेला आढळतो. या तीन तारकांशिवाय आणखी काही तारे या नक्षत्रात आढळतात. परंतु ते सारेच मंदतेज तारे आहेत. या नक्षत्रासंबंधीची एक सुंदर वेदकालीन कथा आहे. मधुविद्या (मृताला जीवदान देणारी विद्या) दधिची ऋषींना येत होती. अश्विनीकुमार हे देवतांचे वैद्य. तर, अश्विनीकुमार यांना दधिची यांच्याकडून ही विद्या…
आराधना जोशी “हल्लीच्या पिढीवर काहीही संस्कार झालेले नसतात,” हे वाक्य आजकाल सर्रास ऐकायला मिळतं. पण ते कितपत योग्य आहे, याचा विचार आपण करतो का? तसं बघायला गेलं तर, माणसाच्या अनेक पिढ्या हेच वाक्य ऐकत मोठ्या झाल्या आहेत. तरीही, संस्कार म्हणजे नेमकं काय? याची व्याख्या अजूनही आपल्याला करता आलेली नाही, हेच खरं. पूर्वी ‘सातच्या आत घरात’ येणं बंधनकारक होतं. नव्हे, तो संस्कारांचा भाग होता. हा संस्कार जो मुलगा किंवा मुलगी काही कारणांमुळे पाळत नव्हते ते संस्कार विसरले, असाच शिक्का त्यांच्यावर मारला जायचा. हल्ली महानगरांमधून ऑफिसेस सुटल्यावर किंवा अन्य कारणांमुळे घरी पोहोचायला साडेआठ-नऊ तरी वाजतात. त्यामुळे तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावून ‘शुभं करोती’ म्हणणं आता अनेकदा नसतं. थोरामोठ्यांना खाली…

