Author: Team Avaantar

मानसी देशपांडे “कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान…” हे मंगलाष्टकाचे सूर म्हणजे वधूसाठी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू, अशा स्वरूपाचे असतात. कारण, अंतरपाट सरला की गळ्यात माळ पडल्यावर अचानक एक नवीन जबाबदारी अंगावर आल्यासारखी वाटते. प्रसिद्ध लेखक व. पु. काळेंनी किती छान म्हटलं आहे, “संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चुल पेटवायची थांबवायचं नसतं. दरी निर्माण झाली म्हणजे आपण खोल जायचं नसतं, तर ती दरी पार करायची असते…” हीच शिकवण प्रत्येक आई मुलीला देतेच. आज अचानक माझ्या मनात एक विचार आला, लग्नात मंगलाष्टकं सुरू असताना तिथे मुलीची आई उपस्थित नसते. का बरं? बहुदा, सनईच्या सुरांनी हृदय गलबलते.…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते. एका माहितीपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने विरार पूर्वेला एका वस्तीत गेले होते. तिथे मला त्या वस्तीची 90 वर्षीय मालकीण सायरा अम्मा भेटली. तिथे राहणाऱ्या तृतीयपंथीयांची ती ‘गुरुमाय’ होती. तीन-चार दिवसांत मी सायरा अम्माची मुलगी झाली होते आणि तिथे राहणाऱ्या तरुण तृतीयपंथीयांची मम्मी! अम्माचे मला नियमितपणे कॉल यायचे. माझी चौकशी करण्यासाठी… किती ते प्रेम! मी जमेल तशी वस्तीत जायची. माहेरवाशिणीला तिची आई वानोळा देते ना, तशी अम्मा मला पिशव्या भरून कांदे, बटाटे, भाज्या, ड्राय फिश अगदी भरभरून द्यायची. सायरा अम्माकडे दरवर्षी ‘नियाज़’ केला जायचा. 100 किलो तांदूळ, 100 किलो मटण अशी बिर्याणी बनायची. शाकाहारी लोकांसाठी 100 किलो रव्याचा…

Read More

मंदार अनंत पाटील परळ येथील प्राण्यांच्या इस्पितळात रीगलला गेल्यावर कळले की, जेनेटिक दोषामुळे त्याला जलोदराचा कॅन्सर झाला आहे आणि काहीही खाल्लेले रक्ताऐवजी पाण्यात रुपांतरित होते. एकदा ऑपरेशन करून पाणी काढले गेले, पण परत काही दिवसांत तीच स्थिती उद्भवली. त्याला शरीर साथ देत नव्हते. रीगलचे हाल बघवत नव्हते. शेवटी मनावर दगड ठेवून वडील आणि वेटच्या मतानुसार रीगलला दयामरण दिले गेले. 21 फेब्रुवारी 1991ला जन्मलेला माझा अतिशय जीवलग मित्र फक्त दीड वर्ष जगला; पण जाताना मला अतिशय गोड आणि शेवटपर्यंत पुरतील अशा खूप आठवणींची शिदोरी देऊन गेला. आज देखील जवळ-जवळ 33 वर्षांनी त्याची ह्रदयस्पर्शी आठवण लिहिताना डोळे अजूनही डबडबले आहेत आणि हुंदका…

Read More

आराधना जोशी 28 मे 1996… माझी TYBA च्या परीक्षेची तयारी सुरू होती. अवघ्या दोन दिवसांवर पहिला पेपर येऊन ठेपला होता… आणि त्याच दिवशी केंद्र सरकारवरील अविश्वास दर्शक प्रस्तावावर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी संसदेत उत्तर देत होते. परीक्षेचा ताण असूनही केवळ अटलजींच्या संयमित, कणखर भाषणामुळे तो संपूर्ण दिवस अभ्यास सोडून टीव्हीसमोर बसून होते. अटलजींच्या भाषणाची जादू तेव्हा पहिल्यांदा कळली आणि त्याबरोबरच राजकारणी असेही असू शकतात, हे समजलं. त्याच काळात पत्रकार होण्याचे विचार पक्के होत गेले. वृत्तपत्रांचं वाचन अधिक गंभीरतेने सुरू झालं. राजकारण, समाजकारण आणि संबंधित विषयांबाबत काही मते बनत होती, काही पूर्वग्रह दूर होत गेले. त्यानंतर 1998 साली वाजपेयी सरकार केंद्रात…

Read More

दिप्ती चौधरी आमचं बंगलोर प्रस्थान रहित झाले! आम्हाला पुन्हा आमच्या मुंबईच्या सोसायटीत आणून सोडले आणि एक महिन्याने परत प्रयत्न करू, असे ठरले. आम्हाला पुन्हा आणून सोडल्यानंतर दोन दिवस आम्ही गायबच झालो. कुठे घाबरून पळून गेलो का, या कल्पनेने साऱ्यांचे धाबे दणाणले होते. पण आम्ही परतून आलो आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. एक महिन्याने आमच्या प्रस्थानाचा दिवस ठरवला. आता आम्हाला पकडून सरळ बंगलोर गाठायचे होते. सकाळी दूध प्यायला आल्यानंतर मी अलगद डिंपल आंटीच्या हातात सापडलो. तिने रात्रीच माझा पिंजरा तिच्या घरी आणून ठेवला होता. आमचे पिंजरे खूप आधीपासून आणून आम्हाला खेळायला दिले होते, त्यामुळे त्यात आमचा वास येत होता आणि सवयीचाही…

Read More

अद्वैत छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मराठी माणसाचं रक्त उसळतंय आणि हा चित्रपट बॉलीवूडचा असल्यामुळे तो जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचतोय. मी हा चित्रपट अजून पहिलेला नाही, पण लोकांचा प्रतिसाद बघून आणि त्याची प्रशंसा ऐकून मी तो कदाचित लवकरच बघेन. हिंदू वीरांचा इतिहास समजायचा एकमेव मार्ग जर आता बॉलीवूडचे चित्रपट असतील, तर ते सत्य कदाचित स्वीकारायला हवे. हे सत्य भारताच्या फाजील शिक्षणव्यवस्थेचं प्रतिबिंब आहे, पण हा लेख त्या घसरत्या शिक्षणव्यवस्थेबद्दल नाही, त्यामुळे हा विषय आता नको. मी लहानपणी जेव्हा पन्हाळगड बघायला जायचो आणि औरंगजेबाच्या क्रूरतेच्या गोष्टी ऐकायचो, तेव्हा माझं रक्त उसळून यायचं. औरंगजेबाने संभाजी महाराजांवर केलेल्या अतिरेकी जुलमानंतर, मी…

Read More

भाईजान पुणे स्वारगेट बसस्थानकातील तरुणीवरील अतिप्रसंगाच्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी ज्या पद्धतीने स्वारगेट स्थानकातील कोपरन-कोपरा धुंडाळला… स्वच्छता गृह, इतर ठिकाणं, फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घाणीचे साम्रज्य, दारूच्या बाटल्या, प्रवाशांच्या आसन व्यवस्थेची दुरवस्था समोर आणली… तर राज्याचे मंत्री आणि शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी अलीकडेच सिडको बसस्थानकाला भेट दिली, त्यांनीही अशीच सर्व ‘हिडन’ स्थळं शोधून, जिथे कोणी साधा फोटो घेत नाही, तिथे मीडियाचे लोक तोंडाला रुमाल लावून कॅमेरे घेऊन गेले. हे सर्व पाहून मी रिपोर्टिंग करत होतो ते दिवस आठवले! माझ्याकडे एसटी बीट होते. तत्कालीन औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानक येथे दर दोन-तीन दिवसांत जाणे व्हायचे. त्यावेळी…

Read More

मंदार अनंत पाटील साधारण जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात आईने प्रथमच आपणहून विचारणा केली गेली की, माझा व्हिसा कधी करशील? व्हिसा तयार झाल्यावर आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे प्रकाश बापट आणि मिसेस अश्विनी बापट यांची लंडन ट्रिप ठरली आणि आम्ही सुटकेचा श्वास टाकला. कारण, आई अगदी घरच्या लोकांबरोबर अगदी डोअर टू डोअर येणार होती. मग क्षणाचाही विलंब न करता तिचे विमानाचे तिकीट बुक केले. भाग – 2 आता एकदाची यायची तारीख दिवस आणि वेळ नक्की झाली. आता माझे आणि पल्लवीचे विचारमंथन जोरात सुरू झाले. अगदी बारीक-सारीक गोष्टींचा सखोल आढावा घेऊ लागलो. आई येणार तेव्हाचे लंडनमधील तपमान, आईची तब्येत आणि पथ्य, तिचे रूटिन आणि…

Read More

मानसी देशपांडे आजचा लेख हा प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहायचं ठरवलं. म्हटलं रोज वैचारिक, गहन विषयावर लिहितच असते. पण आज जरा हलकाफुलका विषय घेऊन लेखाची सुरुवात करावी. तर आजचा विषय आहे “गजरा…” बघा, नाव वाचता क्षणी एक प्रकारचा सुगंध पसरला नाही का…! आता, गजरा आणि नवरा-बायकोचे नाते याचा फार जवळचा संबंध असतो. आता व.पु. काळे यांनी जसं म्हटलं आहे, “हसतीखेळती बायको, हे केवढं वैभव आहे महाराजा!!” प्रत्येक नवरा-बायकोच्या आयुष्यात या गजऱ्याच्या काही ना काही आठवणी या असतातच. मुलगी जेव्हा कोणत्याही समारंभात सजून-धजून जाते तेव्हा साडीबरोबरच तिच्या सौंदर्यात भर घालतो तो गजरा. त्यात तो गजरा जर जोडीदाराने आणलेला असेल तर, ते…

Read More

अर्चना कुलकर्णी दुपारी चार वाजता राऊंड घेऊन मी माझ्या केबिनकडे वळले. केबिनच्या बाहेर एक गृहस्थ माझी वाट पाहत उभे होते; मला पाहताच त्यांनी हसून नमस्कार केला. मी देखील हसून नमस्कार केला, ‌चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. चालता चालताच मी त्यांना म्हटलं, “या.” “थँक्यू,” असं म्हणत ते केबिनमध्ये आले. मी त्यांना खुर्चीत बसण्याची विनंती केली. ‌खुर्चीत बसल्यावर ते बोलू लागले, “मी चंद्रकांत देशपांडे. अकरावीतला अनीश देशपांडे माझा मुलगा.” “अच्छा आपण अनीशचे वडील..!” “हो, आज ऑफिसमधून लवकर घरी जात होतो. तुम्हाला भेटायला मुद्दाम आलो.” ते उत्साहाने बोलत होते. “अनीश तुमच्या कॉलेजमध्ये रमला आहे. ‌त्याला मार्क्सदेखील चांगले मिळाले आहेत‌, पहिल्या सत्रातल्या परीक्षेत. मुख्य म्हणजे…

Read More