Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    July 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जुलै 2026

    July 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, July 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी…
    फिल्मी

    स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 2, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, छावा, दगा, संभाजीराजे, फितुरी, विकी_कौशल
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अद्वैत

    छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मराठी माणसाचं रक्त उसळतंय आणि हा चित्रपट बॉलीवूडचा असल्यामुळे तो जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचतोय. मी हा चित्रपट अजून पहिलेला नाही, पण लोकांचा प्रतिसाद बघून आणि त्याची प्रशंसा ऐकून मी तो कदाचित लवकरच बघेन.

    हिंदू वीरांचा इतिहास समजायचा एकमेव मार्ग जर आता बॉलीवूडचे चित्रपट असतील, तर ते सत्य कदाचित स्वीकारायला हवे. हे सत्य भारताच्या फाजील शिक्षणव्यवस्थेचं प्रतिबिंब आहे, पण हा लेख त्या घसरत्या शिक्षणव्यवस्थेबद्दल नाही, त्यामुळे हा विषय आता नको.

    मी लहानपणी जेव्हा पन्हाळगड बघायला जायचो आणि औरंगजेबाच्या क्रूरतेच्या गोष्टी ऐकायचो, तेव्हा माझं रक्त उसळून यायचं. औरंगजेबाने संभाजी महाराजांवर केलेल्या अतिरेकी जुलमानंतर, मी सुद्धा त्या राक्षसाला माझ्या पायाखाली ठेचून मारायची स्वप्न बघायचो. पण डोळ्यात अश्रू दाटण्याशिवाय आणि काळाच्या क्रूर सत्यासमोर हतबल होण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीच उपाय नव्हता. छावा चित्रपट पाहिल्यानंतर खूप लोकांचा सुद्धा असाच अनुभव आहे, असं दिसतंय. चित्रपटाच्या शेवटी थिएटरमध्ये पूर्ण शांतता असते, प्रेक्षक सुन्न होतात, असं मी ऐकले आहे. संभाजी महाराजांनी सोसलेले अनन्वित अत्याचार जेव्हा डोळ्यासमोर जिवंत उभे राहत असतील, तेव्हा कोणीही सुन्न होणारच!

    जसा काळ सरला आणि मी मोठा झालो, एक सत्य प्रखरपणे माझ्यासमोर आलं. औरंगजेब हा तर आपला पिढ्या-पिढ्यांचा दुश्मन होता. त्याची नीयत सर्वांना ठाऊक होती. तो या भारतभूमीवर आलेला, ते हिंदू संस्कृती नष्ट करायलाच! पण त्याला साथ देणारे कोण होते? आपलेच होते ना! हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की, औरंगजेबाच्या लालसेपेक्षा, या आपल्याच लोकांची लालसा मोठी नाही का? त्यांचा दळभद्रीपणा हा औरंगजेबापेक्षा मोठा नाही का? स्वराज्याने ज्याला आपल समजलं, संभाजी महाराजांनी ज्याला आपलं समजलं, ते औरंगजेबचे गुलाम निघाले, हा इतिहास सुद्धा खरा आहेच ना?

    संभाजी महाराजांना औरंगजेबसारख्या मगरीच्या तोंडात नेऊन सोडणारे आपलेच होते. आपला इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, अशा दगा-फटक्यांनी भरलेला आहे, ही गोष्ट वेगळी सांगायची काही गरज नाही. दुश्मन लाख मारले, तरी, आपल्या लोकांचा दगा हा सर्वात धोकादायक असतो. 16 वर्षांच्या शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याची पाहिली शिक्षा ही कुठल्या मुसलमानाला नाही, तर एका पाटलाला दिली होती.

    स्वराज्याचे मजबूत दरवाजे चंदनाचे होते, नक्कीच… पण ते लाकूड कमजोर करणारी वाळवी ही आपल्याच लोकांची होती. संभाजी महाराजांच्या मृत्यूमागे हिंदूही होता, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण जो शिकवत नाही, तो इतिहास कसला.

    आजसुद्धा देशामध्ये राजकारणी नेते आपल्याला विभागण्याची कामं करतात. फोडा आणि झोडा, ही संकल्पना जरी ब्रिटिशांची असली, तरी त्या संकल्पनेचा पूर्ण फायदा आपलेच राजकारणी आता उचलतायत. जाती, धर्म, प्रथा इत्यादी गोष्टींचा विषारी वापर करून ते त्यांचे खिसे भरतात. त्यांच्या ऐषोरामासाठी विकले जातो ते आपण. आपणसुद्धा त्या भेदाभेदांमध्ये स्वतःच वर्चस्व आणि आपली श्रेष्ठता शोधायचा प्रयत्न करतो. ही भेदाभेद, कटूता जोपर्यंत या भारत देशात जिवंत आहे, तोपर्यंत आपण कोणाचे ना कोणाचे तरी गुलाम म्हणूनच जगणार. अल्पशा फायद्यासाठी अशा शंभर स्वराज्यरक्षक संभाजींना आपण अजून औरंगजेबांसारख्या शत्रूच्या हाती देऊ.

    बाहेरचा शत्रू संपवण्याआधी, आपासातलं शत्रूत्व मिटवणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय स्वराज्य कधीच सुराज्य होणार नाही.

    P.S:  As the philosopher and historian Will Durant has rightly said, “A great civilisation is not conquered from without, until it is destroyed from within.”

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026 फिल्मी

    Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    June 28, 2026 फिल्मी

    मला कायम जपणारे स्नेहबंध…

    June 15, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    नूतन… मौनाचा संवाद!

    By विशाल कुलकर्णीJuly 5, 2026

    बहुतांश चेहरे काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. काही चेहरे मात्र आठवणींच्या कप्प्यात कायमचे जपले जातात. जसे…

    Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    June 28, 2026

    मला कायम जपणारे स्नेहबंध…

    June 15, 2026

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    July 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जुलै 2026

    July 13, 2026

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 358
    • अवांतर 196
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 487
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 776
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    July 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जुलै 2026

    July 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.