Author: Team Avaantar

मनोज जोशी असाच एकदा बसलो असताना विचार आला, तो बटाट्याचा! बटाटा… एकवेळ भाज्यांबद्दल आवडनिवड असू शकते, पण बटाटा आवडत नाही, असा विरळाच. अलीकडेच लहान-थोरांच्या आवडत्या ‘चिंटू’चे एक कार्टून प्रसिद्ध झाले होते. आईसोबत बाजारहाट करायला गेलेला चिंटू भाजीवाल्याला विचारतो, ‘अहो, या पालेभाजीऐवजी बटाटे द्याल का बदलून?’ एकूणच बटाटा हा सर्वांच्याच आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. फक्त मुंबईचाच विचार करता, या महानगरीला दरदिवशी बटाटे लागतात तरी किती? हा प्रश्न अनेक दिवसांपासून माझ्या मनातून जातच नाही. मी कधीकाळी बटाटावडा प्रेमी होतो. त्यामुळे बटाटावड्याचे अनेक स्टॉल मी धुंडाळले आहेत. त्यापैकी अनेक पसंतीस उतरले तर, काही ठिकाणी ‘आता येथे पुन्हा नाही,’ अशी मनाशी खूणगाठ मारली आहे.…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 28 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 18 जून 2025, वार : बुधवार तिथि : सप्तमी 13:34, नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 24:22, योग : प्रीति 07:39, करण : बालव 24:48 सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ 18:34 सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:17 पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल होतील. नोकरदारांसाठी आजचा दिवस खास असेल. कार्यालयातील आव्हानात्मक कामे हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. वृषभ…

Read More

चंद्रशेखर माधव साधारण 2001-2002मधील घटना असावी. आम्ही मित्रांनी कात्रज ते सिंहगड असा पौर्णिमेच्या रात्री ट्रेक करायचा ठरवलं. सुमारे आठ ते दहा लोक तयार झाले. आधी एकदा या मार्गावर येऊन गेलेला प्रशांत नावाचा आमचा मित्रही त्यामध्ये होता. रात्री आठच्या सुमारास कात्रज घाटाच्या वरच्या टेकडीवरून चालायला सुरुवात केली. साहजिकच प्रशांत पुढे झाला आणि त्याच्या मागोमाग एका ओळीत सर्वजण जाऊ लागले. आम्हा तरुणांबरोबर एक प्रौढ व्यक्ती होती. ते आमच्यापैकी एकाच्या ऑफिसमधील सहकारी होते आणि त्या ओळखीतून आमच्याबरोबर आले होते. ते सुरवातीपासूनच सतत सुपारी खात होते. आमच्यातील 2-3 जणांनी चालताना सुपारी न खाण्याबद्दल समजावण्याचा प्रयत्न केला; पण ते काही केल्या ऐकेनात. आम्ही त्यांचा नाद…

Read More

गायत्री वैशंपायन पुणे शहरात गेली वीस वर्षे वास्तव्य असल्यामुळे दुकानाच्या समोरील पाटी किंवा बोर्ड या प्रकाराची मला चांगलीच सवय झालेली आहे. तरी नीट विचार केला तर, जास्तीत जास्त वेळा मी पाहिलेली पाटी म्हणजे ‘पॅटिस संपले’. त्याचं असं आहे की, माझ्या दररोज जायच्या, यायच्या रस्त्यावर एक प्रसिद्ध बेकरी आहे. ती सकाळी साडेसातला उघडते आणि साधारण सकाळी अकराच्या सुमारास बंद करतात, संध्याकाळी परत पाच ते आठ… असे त्यांचे जबरदस्त working hours आहेत. सकाळी उघडल्यावर ‘गरम पॅटिस तयार आहेत’ असा बोर्ड ते दुकानाच्या बाहेर आणून ठेवतात. त्याच बोर्डाच्या उलट्या बाजूला ‘पॅटिस संपले’ असे दोन ठसठशीत शब्द छापलेले आहेत. सकाळी दहाच्या पुढे तो बोर्ड…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 27 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 17 जून 2025, वार : मंगळवार तिथि : षष्ठी 14:46, नक्षत्र : शततारका 25:01, योग : विश्कंभ 09:33, करण : विष्टी 26:13 सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 19:17 पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस थोडा व्यग्र असू शकतो. पैशाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती बळकट होईल. मात्र, अनावश्यक चिंता आणि राग कामात अडथळा आणू शकतो. कुटुंबातील कोणाशी तरी…

Read More

सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) पहिली तीन नक्षत्रं – अश्विन, भरणी, कृत्तिका यांच्याबाबत गेल्या लेखात मी आकाशातल्या पहिल्या तीन नक्षत्रांची माहिती आणि त्यांच्या आधारावर पुराणात आलेल्या कथा सांगितल्या होत्या. आज आपण पुढच्या तीन नक्षत्रांची माहिती आणि पौराणिक कथा पाहुया. रोहिणी : रोहिणी नक्षत्राच्या संदर्भात काही कथा पुराणात आढळतात. या ताऱ्याबद्दल आपल्या प्राचीन साहित्यामध्ये एक कथा आढळते. ती म्हणजे, प्रजापतीने प्रथम विराट नावाची स्त्री उत्पन्न केली. पण तिला यज्ञात योग्य तो मान न मिळाल्यामुळे ती उंच आकाशात गेली. उंच उडत जाणारी, आरोहण करणारी म्हणून तिचे नाव रोहिणी पडले असावे. दुसऱ्या एका कथेनुसार रोहिणी ही अत्यंत सौंदर्यवती होती…

Read More

मनोज जोशी निद्रा ही देवी कधी कशी प्रसन्न होईल हे सांगता येणार नाही. कधी कधी ही देवी न राहता, दैत्य बनून संबंधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांना छळूही शकते. साधारणपणे 20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट बहुतांश सर्वांनी पाहिला असेल. हा भ्रष्टाचार, दलाली आणि राजकारण्यांचा सहभाग… या सर्वांपासून अलिप्त असलेली नवी पिढी कशी यात ओढली जाते.. यावर भाष्य करण्यात आले आहे. त्यात एक सीन आहे. एका एफएम केंद्रावर काम करणाऱ्या मित्राची टर उडवतात. हा मित्र एफएम चॅनलचा आरजे अर्थात रेडिओ जॅकी असतो आणि कायम रात्रीच्या ड्युटीवर असतो. मग त्याची गाणी ऐकते कोण? ‘रात को बहुत लोग जागते रहते…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 26 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 16 जून 2025 वार : सोमवार तिथि : पंचमी 15:31 नक्षत्र : धनिष्ठा 25:13 योग : वैद्रुती 11:06 करण : गरज 27:12 सूर्य : मिथुन चंद्र : मकर 13:09 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:17 पक्ष : कृष्ण मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कार्यालयात वरिष्ठांच्या दबावामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील, मात्र कोणाकडूनही पैसे उधार…

Read More

अर्चना कुलकर्णी डिसेंबर महिना म्हणजे शाळा, कॉलेजांमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा यांची धमाल असते. त्या दिवशी आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. नृत्य स्पर्धा खूपच रंगतदार झाली. दुपारी बारा वाजता स्पर्धा संपली तेव्हा प्रेक्षक, विद्यार्थीवर्ग खुशीत बाहेर पडत होता तर, कलाकार विद्यार्थीवर्ग अल्पोपहारचा स्वाद घेत नृत्य सादरीकरण आणि स्पर्धेचा निकाल यावर चर्चा करून समाधानाने हॉलच्या बाहेर पडले. त्यादिवशी दुपारच्या वेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक यापैकी कोणीही संस्थेत हजर नसल्यामुळे खूप शांतता होती. माझे लक्ष यामुळे मी कार्यालयीन कामात केंद्रित केले होते. दुपारी चारच्या सुमारास एक वयस्कर गृहस्थ तावातावाने थेट माझ्या केबिनमध्ये आले. कार्यालयाच्या मदतीनीसांनी त्यांना अडवण्याचा…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी शिस्त अथवा वक्तशीरपणा यावरून थोडी चिंता उद्भवू शकते. जसजसा आठवडा पुढे सरकेल, तसतसा तणाव कमी होऊन उत्तम अनुभव येतील. मुलांनी येत्या आठवड्यात आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. रागातून बोलले गेलेले शब्द हानिकारक ठरतात. वृषभ कौटुंबिक समस्या अथवा व्यावसायिक समस्यांनी भरलेला आठवडा जाऊ शकतो. उष्णतेमुळे होणारे पोटाचे विकार या आठवड्यात आपल्याला सतावू शकतात. महिलांनी या आठवड्यात घरातील शिस्त कशी टिकेल, याकडे विशेष लक्ष द्यावे. आठवड्याच्या उत्तरार्धात ताण-तणाव कमी होतील आणि काही आनंदवार्ता ऐकायला येतील. मिथुन अहंकार अथवा अहंभाव हा या…

Read More