Author: Team Avaantar

माधवी जोशी माहुलकर नागपूर हे रघुजी भोसले यांच्या इतिहासाचा वारसा लाभलेले शहर आहे. या शहराच्या आपल्या काही परंपरा आणि सण-उत्सव, समारंभ आहेत आणि ते उत्साहात साजरे केले जातात. यातीलच एक परंपरागत उत्सव म्हणजे काळी पिवळी मारबत! हा उत्सव समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीती, समाजविघातक गोष्टी तसेच रोगराई, इडा-पिडा, संकट टाळण्यासाठी साजरा केला जातो. समाजामध्ये सुखशांती नांदून समाज बांधवांत सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत, याकरिता या मारबतला सुरुवात झाली. जगभरात प्रसिद्ध झालेला बडग्या-मारबत उत्सव आणि मिरवणूक हा प्रकार नागपुराची एक विशेष ओळख बनला आहे. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. इंग्रजांची राजवट देशात असताना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं…

Read More

आराधना जोशी साहित्य हरभरा डाळ – दीड वाटी तेल – 3 टेबलस्पून हिरव्या मिरच्या – 2 ते 3 आलं – 1 इंच कढीलिंब पाने – सात ते आठ साखर – 1 टेबलस्पून मीठ – चवीनुसार मोहरी – 1 लहान चमचा हिंग – पाव लहान चमचा हळद – अर्धा लहान चमचा लिंबू – अर्धे कोथिंबीर – आवडीनुसार (वरून सजावटीसाठी) ओलं खवलेलं खोबरं – आवडीनुसार (वरून सजावटीसाठी) पुरवठा संख्या : 7 ते 8 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : हरभरा डाळ भिजण्यासाठी 5 तास भिजवलेली डाळ वाटून घ्यायला 7 मिनिटे शिजवण्याचा वेळ : साधारणपणे 20 मिनिटे एकूण वेळ : 5 तास 27 मिनिटे…

Read More

अर्चना कुलकर्णी (शिक्षक दिन विशेष) टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाकडे पहात मी विचार करीत होते, “या पुस्तकाच्या देवाण-घेवाणीच्या मागे काय रहस्य असेल?” नववी ‘ब’मधील सचिन सारंगच्या आईचे मला फार कौतुक वाटत होतं. त्याचं असं झालं, सचिनची आई रोज दुपारी घरी त्याचे दप्तर नेहमी पाहात असत. त्यामुळे त्यांना त्या दिवशी वर्गात काय शिकवलं, काय गृहपाठ दिला आहे,, याची माहिती मिळत असे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे दुपारी त्याचे दप्तर पाहिले त्यावेळी त्यांना ‘एक होता कार्व्हर’  हे कोरे करकरीत पुस्तक त्यात दिसलं. त्यांनी ते पुस्तक पुन्हा दप्तरात ठेवलं. ते पुस्तक सचिन स्वतः दाखवतो का, हे त्यांना पाहायचं होतं. विशेष म्हणजे, त्या दिवशी रात्रीच सचिनने त्यांना ते…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥45॥ तिन्हीं गुणीं आवृत्त । हे वेद जाणें निभ्रांत । म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ॥256॥ येर रजतमात्मक । जेथ निरुपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥257॥ म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासीच कारण । एथ झणें अंतःकरण । रिगों देसी ॥258॥ तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं । एक आत्मसुख अंतरी । विसंब झणीं ॥259॥…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 सप्टेंबर 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 14 भाद्रपद शके 1947; तिथि : त्रयोदशी 27:12; नक्षत्र : श्रवण 23:37 योग : शोभन 13:51; करण : कौलव 15:45 सूर्य : सिंह; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:50 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 शिक्षक दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस चांगला जाईल. मित्रपरिवाराकडून मोठे सहकार्य मिळेल. दिनचर्या सुधारण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण आनंददायी असेल. आजूबाजूला असणाऱ्या…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांच्याच आग्रहामुळे मी पुन्हा कामाची सुरुवात केली. दुसऱ्या इनिंगची सुरुवात ‘स्टार प्रवाह’च्या नवीन सीरियलने झाली. सीरियलचे नाव ‘वचन दिले तू मला’… सुलभा देशपांडे, ज्योत्स्ना कार्येकर, आसावरी जोशी, राजेंद्र चावला, पुष्कर जोग, मयुरी वाघ, भारती पाटील, सुश्रुत मंकणी आणि अन्य बरेच कलाकार होते. माझं कॅरेक्टर म्हणजे एकदम ठसका! खूप श्रीमंत, पैशाचा माज असलेली अशिक्षित बिनडोक पण प्रेमळ आई… कथानक पण छान होतं… मला फुटेज पण चांगलं होत… म्हणजे, लोक रस्त्यात ओळखायला लागली होती. हे पाहून छान वाटायचं. तशात मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आला. मी बाजारात जाऊन पूजा तसेच हळदी…

Read More

प्रदीप केळूस्कर कोल्हापूर ते सावंतवाडी एसटी बावड्याहून सुटली आणि घाटमार्गे कोकणात जायला मार्गस्थ झाली. नवीन एक-दोन प्रवासी होते, त्यांना वसंत कंडक्टरने तिकिटे दिली, पैसे बॅगेत ठेवले… एवढ्यात त्याचा मोबाइल वाजला, त्याने पाहिलं त्याची बायको वसुधा बोलत होती… वसुधा, “अहो, अजितचो मघाशी फोन इल्लो…” वसंतला आश्यर्य वाटले. गेल्या तीन वर्षांत स्वतःहून कधीही फोन न करणाऱ्या आपल्या मुलाने… अजितने फोन कसा काय केला? वसंत, “काय म्हणा होतो? आणि फोन करुची बुद्धी कशी झाली तेका?” वसुधा, “अहो, आनंदाची बातमी सांगून फोन केल्यानं, तुमी आजोबां व्हतालात?” वसंत, “काय?” वसुधा, “होय हो, ताच सांगून फोन केल्यानं आणि माका अमेरिकेक बोलावता…” वसंतला खूप बरं वाटलं, कधी…

Read More

माधवी जोशी माहुलकर विदर्भातील अनेक नामांकीत खाद्यपदार्थांपैकी एक असलेला गोळाभात किंवा भरडा भात! याला भरडा भात म्हणण्याचे एक कारण असे की, यातील गोळे हे हरभऱ्याच्या डाळीचा भरडा काढून तयार करतात. हा पदार्थ करण्यासाठी खरंच कस लागतो. गोळे जर फुटले तर त्या भाताचा विचका होतो म्हणून अतिशय नजाकतीने आणि लक्षपूर्वक पद्धतीने गोळाभात तयार करावा लागतो. साहित्य तांदूळ – 2 वाट्या हरभरा डाळ – 2 वाट्या हिरवी मिर्ची – 4 ते 5 आलं – एक इंच कोथिंबीरीची पेस्ट – अर्धी वाटी जिरं पावडर – 2 चमचे मोहरी – 2 लहान चमचे गोडा मसाला – 1 चमचा हळद – एक चमचा लाल तिखट…

Read More

ॲड. कृष्णा पाटील भाग – 1 दादू केरळहून गावाकडे आला की सारा गाव गोळा व्हायचा. “कधी आला?” “आता किती दिवस मुक्काम?” “परत कधी जाणार?” “घरी या..” “कधी येणार?” “गेल्यावेळी येतो म्हणाला पण आला नाही. यावेळी चुकवू नका.” लोकांचा आग्रह असायचा. दादू सोन्या-चांदीच्या दुकानात कामाला होता. वर्ष-सहा महिन्यांतून गावी यायचा. पण आला की, नडल्या-अडलेल्यासाठी धावून मदत करायचा. प्राथमिक शाळेला सर्वात जास्त देणगी दादूने दिली. ‘मुले शिकली पाहिजेत. आम्हाला शिकायची हौस होती. पण परिस्थिती नव्हती. नाईलाजाने परमुलखात जावं लागलं. म्हणूनच गावात शिक्षण वाढलं पाहिजे…’ दादूला असं नेहमी वाटायचं. दोन वर्षापूर्वी शाळेत 15 ऑगस्ट साजरा केला. त्या वेळी दादू उपस्थित होता. पहिली ते…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः । वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥42॥ वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥245॥ म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजें । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥246॥ एथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाही । ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥247॥ कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् । क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥43॥ देखें कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत ।…

Read More