हर्षा गुप्ते
भारतात अळूच्या पानांचा आणि देठांचा उपयोग लज्जतदार अन्नपदार्थांसाठी केला जातो. अळूपासून कर्नाटकाच्या दक्षिण तसेच उडुपी भागात पात्रोडे, केरळात चेंबिला करी आणि गुजरातमध्ये पात्रा असे पदार्थ बनविले जातात. तर, महाराष्ट्रात अळूवडी आणि अळूचे फतफते हे प्रकार प्रसिद्ध आहेत. अळूवडी देखील वेगवेगळ्या पद्धतीने बनविली जाते. आपण पाहूयात भरली अळूवडी.
तयारी आणि कृतीचा एकूण कालावधी – सुमारे अर्धा तास
पुरवठा संख्या – चार व्यक्तींसाठी
साहित्य
- अळूवडीचा कच्चा उंडा – 1
- मध्यम आकाराचे बटाटे – 3
- भिजवलेले शेंगदाणे – अर्धी वाटी
- कातलेले खोबरे – अर्धी वाटी
- हिंग – चिमुटभर
- मोहरी – 1 लहान चमचा
- मीठ – चवीनुसार
- चिली फ्लेक्स – पसंतीनुसार
- तेल – 2 पळ्या
हेही वाचा – Recipe : ही कोथिंबीर वडी करून पाहा…
कृती
- कच्च्या अळूवडीच्या उंड्याचे नीट काप करून घ्या.
- बटाटे सोलून त्याचे जाडसर काप करून त्याचे दोन हिस्से करावेत.
- कढईमध्ये जरा जास्ती तेल घालून हिंग, मोहरीची फोडणी करून गॅस बंद करा.
- आता बटाट्याच्या कापांचा एक हिस्सा कढईमधल्या फोडणीवर नीट पसरावा.
- वरून मीठ आणि चिली फ्लेक्स तुमच्या चवीप्रमाणे भुरभुरवा.
- ते सगळे काप बटाट्याच्या कापावर रचून घ्या.
- त्यावर भिजवलेले शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप नीट लावून घ्या.
- आता बटाट्याच्या कापांचा दुसरा हिस्सा वरून कव्हर करून त्यावर पुन्हा मीठ आणि चिली फ्लेक्स भुरभुरवा.
- आता घट्ट झाकण ठेऊन गॅस सुरू करा. अधून मधून झाकण उघडून बटाटे करपत नाहीत ना ते बघा.
- एक दणदणीत वाफ आली की, ते सगळं कढईत ते तळापासून उलटवा. पुन्हा छान वाफ येऊ द्यात.
हेही वाचा – Recipe : भाताचे स्वादिष्ट कटलेट आणि दही ब्रेड
टीप्स
- शिजल्यावर वरून कोथिंबीर घाला.
- पिझ्झासारखे त्याचे चार भाग करा.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल. तुमची ही वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी
या ईमेलवर आमच्याकडे पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर ही रेसिपी प्रसिद्ध केली जाईल.


