Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » डॉ. इरफान अहमद यांच्याशी ऋणानुबंध
    ललित

    डॉ. इरफान अहमद यांच्याशी ऋणानुबंध

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 23, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, डॉक्टर इरफान अहमद, मल्लिका कॅटरी, दनू, पिदू
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिप्ती चौधरी

    दनूला बाहेर जाण्यात अजिबात रस नव्हता म्हणून दिदीने मला पट्टा घालून घरात फिरवायचा सराव सुरू केला. थोडे दिवस मी शिस्तीत फिरतो, हे बघून एका संध्याकाळी खालची गडबड कमी झाल्यावर थोडे उशिरा मला पट्टा घालून लिफ्ट समोर उभे केले. लिफ्ट आल्यावर मी दबकत आत शिरलो. काय होते काही कळेना, धक्का बसला आणि ती छोटीशी खोली अचानक खाली जायला लागली. चारी बाजूने बंद त्यामुळे मी खूप घाबरलो. इतक्यात पुन्हा धक्का बसून ते प्रकरण एकदाचे थांबले आणि समोर दरवाजा उघडून बघतो तो काय… जमीन!

    दरवाजासमोरील पायऱ्यांच्या बाजूला सुशोभित बाग होती. त्यात उंच झुडपांचे दाट जंगल होते… लपायला एकदम भारी जागा! मी त्या किर्र झुडपांच्या जंगलात शिरलो… माझा पट्टा आई आणि दिदी ओढत होत्या. त्यामुळे अजून एक फायदा झाला… पट्ट्याला ओढ असल्याने मी आधी डोक्याचा आणि नंतर पोटाचाही वेढा मस्तपैकी काढून टाकला… आणि त्या झुडपात अंतर्धान पावलो!


    पायाखालची जमीन सरकली… काळजाचा थरकाप उडाला… हृदयाचा ठोका चुकला… हे सारे एकदम झाले की कसे वाटते, ते आईला त्या क्षणी कळले! इमारतीच्या तिन्ही बाजूंनी दुथडी भरून वाहणारा महामार्ग… आणि चौथ्या बाजूला पडीक जमिनीवर उगवलेले घनदाट जंगल! सहज उडी मारण्याजोग्या कुंपणावरून मी जर उडी मारली तर माझी परतण्याची शक्यता शून्य…!

    थोडा धीर एकवटून आईने दिदीला वरती ट्रीट घ्यायला पाठवलं. आयडिया बरोबर होती, पण मीसुद्धा जादा शहाणा आहे ना… मी आत कुठे आहे हे काही त्यांना बाहेरून दिसत नव्हते. अंदाजानेच आईने त्या दाट झुडपात ट्रीट उघडून हात घुसवला… थोड्यावेळाने ट्रीट चाटल्याचा आवाज आला. पण मी काही पकडण्यासाठी दिसेना… हात बाहेर काढला तर ट्रीट मागे मी काही बाहेर येईना… अशा दोन तीन ट्रीट्स संपवल्यावर माझा ट्रीटमधला रसही संपला… मी काही त्यासाठीही हालचाल करत नाही हे बघून आईचे अवसान गळाले… आता मला पकडायचे कसे? काहीच कळेना.

    त्यावेळी आईला डॉ. इरफान अहमद यांची आठवण झाली. बंगलोरला आल्यावर आम्हाला कुठे ठेवून बाहेर जावे लागले तर, काय सोय आहे हे शोधताना त्यांच्या मल्लिका कॅटरीची माहिती मिळाली होती. ते मांजराचे मानसोपचरतज्ज्ञ आणि वर्तणूकतज्ज्ञ आहेत. भारतातले अशाप्रकारे मान्यताप्राप्त ते पाहिले डॉक्टर आहेत. माऊबद्दल अपार प्रेम असलेले ते आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांच्या मदतीबद्दल आणि ज्ञानाबद्दल साऱ्यांनी भरभरून कौतुक केले होते. पण त्यांची काहीच ओळख नाही, त्यांना कसा संपर्क करावा? ते फोन तरी उचलतील का? या द्विधा मनस्थितीत आईने फोन लावला. कारण, दुसरा मार्गच नव्हता. आश्चर्य म्हणजे त्यांनी फोन उचलला… घाबरलेल्या आवाजात आई जे सांगत होती, ते त्यांनी शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांनी जे मार्गदर्शन केले, ते कोणाही माऊ पालकांवर असा प्रसंग आला तर, नक्की आचरणात आणावे असे!

    आईच्या आवाजावरून ती किती भेदरली आहे, हे त्यांना समजले. त्यांनी सांगितले, “प्रथम तुम्ही पूर्ण शांत व्हा.. अगदी रिलॅक्स… तुमचा आवाजातील बदल, जोराचा श्वास, धडधडणारे हृदय हे सारे तुमचा माऊ टिपतो आहे. हे त्याच्यासाठी आहे, हे त्याला नाही कळतं. पण काही तरी संकट आहे, हे मात्र तो समजतो आणि जास्त घाबरतो. तेव्हा अगदी सहजपणे राहा. मागच्या आठवड्यात कूर्गच्या घनदाट अरण्यात हरवलेली मांजर एका दिवसात आम्ही परत आणली होती, तेव्हा विश्वास ठेवा तुमचं बाळ तुमच्याबरोबर परत घरी जाणार आहे. जसं तुम्ही बागेत मुलाला खेळायला सोडता आणि खेळून झाले की, मुल घरी परतते, अगदी हे तस्संच आहे! फक्त त्याला नजरेआड अजिबात करू नका. शांतपणे त्याचा पिंजरा आणून खाली ठेवा आणि बाजूला बसून राहा. थोडा खेळल्या नंतर पकडायचा प्रयत्न करा… आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व फक्त आणि फक्त तुम्ही आणि तुमची माऊ यातच व्हावे. इतर कोणीही आजूबाजूला असता कमा नये. प्रयत्न करा आणि मला सांगत रहा, मी मदतीसाठी इथे आहेच.” त्यांच्या धीराच्या शब्दांनी जादू केली.

    आई शांतपणे त्या झुडपाच्या बाजूला बसली. थोड्यावेळाने मी पण आईच्या बाजूला झुडपातून डोकावलो. फक्त डोकं बाहेर काढून तिच्या बाजूला बसून राहिलो. नंतर तिथून उठलो आणि पायऱ्यांच्या दुसऱ्या बाजूच्या बागेत थोड्या उड्या मारल्या. नंतर सरळ रस्ता ओलांडून समोरच्या बागेत शिरलो. तिथे विरळ फुलझाडे असल्याने आईच्या हाताला लागू शकत होतो, पण मी काही तिला हात लावू देत नाही, हे पाहून पुन्हा तिने एकदा ट्रीट आणून प्रयत्न केला. दोन तीन वेळा सटकलो; पण शेवटी एकदा तिने काही घडलेच नाही, असा साळसूद चेहरा करून मी आत बसलो होतो.

    आईने डॉ. अहमद यांचे आभार मानले. त्यांनी आईला सांगितले, अनाथ माऊंना घर मिळाले आहे, यात आनंद आहे. पुढेही काही मदत लागली तर, जरूर सांगा… आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला. जेव्हा केव्हा आमच्या वागण्याच्या काहीही समस्या आल्या तेव्हा, त्यांनी अगत्याने मार्गदर्शन केले. डंपर मधेच खूप विचित्र आवाजात ओरडायचा. विशेषतः रात्री. हा रडतो की याला बाहेर जायचे आहे? की काही वेदना होत आहेत? काही कळत नव्हते. त्याचा व्हिडीओ काढून आईने डॉक्टरांना पाठवला. त्यांनी आवाज ऐकून सांगितले, हा social call आहे. तो खेळायला इतर मांजरांना बोलवतोय. एक गंमत करा, हा व्हिडीओ दिवसा लावा आणि बघा. खरंच त्या आवाजाला प्रतिसादात देत डंपर दुसऱ्या खोलीतून हजर झाला! आईला वाटत होते की, मी डंपरला मारतो, दादागिरी करतो. पण डॉक्टरांनी सांगितले की, तसं नाही. मी खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि डंपर अजूनही स्थिरावला नसल्याने ही भांडणे आहेत. थोडे दिवस दूर ठेवा, सामोरा समोर येऊ देऊ नका. एकमेकांचे अस्तित्व जाणवू दे, पण गाठ नको पडायला! मांजरांचेही वागणूक शास्त्र आहे आणि काही नियम पाळून, काही युक्ती करून आपण त्यांचे वागणे सकारात्मक बदलू शकतो. एकमेकांना न स्वीकारणाऱ्या माऊंनाही मैत्रीत बदलू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

    स्थिरावल्यावर आम्ही आमच्या मार्जार रीतीनुसार वर्तन सुरू केले; कारण आम्ही मोठे बोके होतो. वागण्यातली आक्रमकता आणि कुठेही शू करणे हे थांबावे, यासाठी लवकर ऑपरेशन करून घ्या, असाही सल्ला त्यांनी दिला. ऑपरेशनमुळे मांजराचे आयुष्य वाढते आणि सुरक्षितही होते.

    त्यांनी वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांच्याशी काय ऋणानुबंध होता काय माहीत! पण आम्ही जेव्हा बंगलोर सोडले, ते त्यांच्या घरूनच… त्यांना दंडवत घालूनच…

    क्रमशः

    (पिदू या मांजराची आत्मकथा)

    diptichaudhari12@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026 ललित

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026 ललित

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    By प्रणाली वैद्यMay 8, 2026

    भाग – 24 समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने…

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 411
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026
    Most Popular

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.