Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026

    Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज

    April 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » दोन शब्द पुरे जगण्याला…
    ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 16, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मानसिक आधार, सौमित्र आणि मी, एअरपोर्टच्य कॉफी शॉपमध्ये सौमित्र, सौमित्रचे सांत्वन, सौमित्रचा आईबद्दल गैरसमज, सौमित्रला शुभेच्छा, सौमित्रच्या वडिलांचे निधन, सौमित्रच्या आईला धक्का, सौमित्रला मानसिक धक्का,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सतीश बर्वे

    मी खरं म्हणजे त्याला विसरूनच गेलो होतो. पण तसं होणं देवाच्या मनात नव्हतं बहुतेक… आज सकाळी ध्यानीमनी नसताना त्याचा ईमेल आला मला, ज्यात त्याने माझे आभार तर मानले होतेच. शिवाय Happy Journey. Take Care. या माझ्या शुभेच्छांचा त्याने खास उल्लेख करत, त्या त्याला घरी पोहोचेपर्यंत कशा आधार देत गेल्या याची मजेशीर गोष्ट त्याने लिहिली होती, त्या मेलमध्ये!

    गेल्या आठवड्यातील गोष्ट. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कॉफी शॉपमध्ये माझ्या समोरच्या टेबलावर एक मुलगा एकटाच बसला होता, विमनस्क अवस्थेत… त्यादिवशी बऱ्याच फ्लाइट काही कारणाने उशिराने सुटणार होत्या, म्हणून बहुतेक कॉफी शॉपमध्ये गर्दी होती. मी नाईलाजाने त्या मुलाच्या टेबलाजवळ जाऊन उभा राहिलो. त्याने मान वर करून माझ्याकडे बघितले.

    “Can I Sit here,” मी त्याला विचारले. त्याने मानेनेच हो म्हटले. मी खुर्चीवर बसत त्याचे आभार मानले.

    “तुझी ऑर्डर अजून तयार नाही का झाली?”

    “मी काहीच मागवलं नाहीये!” त्याचं उत्तर ऐकून मी कोड्यात पडलो.

    माझ्यासोबत सॅंडवीच आणि कॉफी घेशील का? मी थोडं दबतच त्याला विचारले.

    “चालेल…”

    “मी आलोच ऑर्डर देऊन…” असं म्हणून मी काऊंटरवर गेलो. आमची ऑर्डर आल्यावर मात्र तो मुलगा एकदम फ्रेश दिसला. हळूहळू आमच्यात गप्पा सुरू झाल्या. त्याचं नाव सौमित्र. अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठामध्ये तो पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेला होता. वडील गेल्याची बातमी अचानकपणे आल्याने त्याने तडक मुंबई गाठली होती. सगळं दिवसकार्य पार पडून तो आज परत अमेरिकेला निघाला होता. त्याच्या मनाची अवस्था आणि घालमेल त्याच्या चेहऱ्यावर लख्ख दिसत होती. आई काही दिवसांसाठी तरी, त्याच्यासोबत रहायला तयार नव्हती म्हणून त्याला तिची जास्त काळजी वाटत होती. मग मीच त्याला समजावले होते की, भरलं घर असं बंद करून निघायचं असेल तर, ते सहज शक्य नाही होतं. तिला वेळ दे थोडा…

    बॅंकेत आणि इतरत्र केलेल्या गुंतवणुकीच्या कागदपत्रांवरून वडिलांचे नाव रद्द करणं, महापालिका, गॅस आणि इलेक्ट्रिसिटी कंपनी सगळीकडे वडिलांचं नाव रद्द करणं अशी कितीतरी वेळखाऊ कामं वेळच्या वेळी करणं आवश्यक असतं. शिवाय, आईला या धक्क्यातून सावरायला वेळ लागेल थोडा…. ते त्याला पटलं शेवटी! आम्ही नंतर अर्धा-पाऊण तास गप्पा मारत होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे ढग एव्हाना नाहीसे झाले होते.

    हेही वाचा – मुलाचं परदेशी शिक्षण अन् मातृत्वाची परीक्षा!

    “बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी फक्त एकांगी विचार केला. पण आता मन शांत झालंय. विमानात बसायच्या आधी फोन करून तिची माफी मागतो, कारण थोडंसं रागावूनच मी घरून निघालो होतो विमानतळावर यायला.”

    अमेरिकेत गेल्यावर सौमित्रला आणखी एक स्थानिक विमान पकडून तासभर प्रवास करून तिथून पुढे कॅब करून त्याच्या शहरात पोहोचायचं होते. दुर्दैवाने ते विमान देखील उशिराने सुटले होते, त्यामुळे मी दिलेल्या शुभेच्छांची खरोखरच त्याला सोबत झाली, असं त्याने मुद्दाम लिहिले होते.

    हेही वाचा – बॅक स्टेज… हाच योग्य निर्णय!

    निव्वळ विमान सुटायला उशीर, या कारणामुळे माझी आणि सौमित्रची अचानक भेट झाली होती. कोण कुठला तो आणि कोण कुठला मी… पण माझ्या दोन शब्दांच्या शुभेच्छांचा त्याला घरी पोहोचेपर्यंत उपयोग झाला, हे वाचून आनंद झाला मला. खरंच, काही म्हणा तुम्ही, पण दोन शब्द कधी कधी खूप मोठं काम करून जातात, हे मला सौमित्रचा ईमेल वाचून पटलं. आपले दोन शब्द ऐकणाऱ्याच्या मनात तुमच्या नकळत आनंद, उत्साह, आधार, जिद्द, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आणि तळमळ तयार करत जगण्याला बळ देतात एवढं मात्र नक्की!


    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026 ललित

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026 ललित

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरApril 30, 2026

    एक जोडपं ओपीडीत आलं होतं. दोघांनाही किरकोळ विषाणूजन्य संसर्ग होता, पण आपल्याकडं बोलता बोलता गाडी…

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    April 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026

    Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज

    April 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 283
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 401
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 201
    • मैत्रीण 18
    • ललित 592
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026

    Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज

    April 30, 2026
    Most Popular

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.