दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 12 मार्च 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 21 फाल्गुन शके 1947; तिथि : नवमी 30:28; नक्षत्र : मूळ 24:42
- योग : सिद्धी 09:57; करण : तैतिल 17:26
- सूर्य : कुंभ; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:51; सूर्यास्त : 18:46
- पक्ष : कृष्ण; ऋतू – शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
टीम अवांतर
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1914 रोजी देवराष्ट्रे (सातारा जिल्हा) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, त्यात त्यांनी भाग घेतला होता. 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात ते सामील झाले होते. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.
1946 साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव चव्हाण दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले. 1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली तर 1952 च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 1 नोव्हेंबर 1956 रोजी सूत्रे हाती घेतली. 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. पुढे 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री आणि 1974 मध्ये ते परराष्ट्रमंत्री बनले.
हेही वाचा – Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!
यशवंतराव चव्हाण यांनी राज्यासाठी अनेक प्रगतीशील आर्थिक धोरणं राबवली. त्यामुळे अनेक क्षेत्रांचा विकास झाला. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी अनेक सहकारी संस्था स्थापण्यावर भर दिला. सहकारी पतसंस्था, सहकारी वाहतूक, सहकारी ग्राहक भांडारे, सहकारी श्रमिक संस्था, तसेच सहकारी खरेदी-विक्री संघ निर्माण केले. सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे तसेच अनेकांना राजकारणाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी पंचायत राज या त्रिस्तरीय व्यवस्थेची सुरुवात केली.
राज्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक विकासासाठी शिक्षण आणि साहित्य प्रसारावर त्यांनी मोठे काम केले. मराठवाडा विद्यापीठ आणि कोल्हापूर विद्यापीठाची स्थापना केली. मराठी साहित्य संस्कृती महामंडळ तसेच विश्वकोश मंडळाची स्थापना केली. कार्यक्षम मंत्री, यशस्वी संसदपटू आणि जनसामान्यात ज्याची मुळे रुजली आहेत, असा उदारमतवादी नेता असे यशवंतरावांचे थोडक्यात वर्णन करता येईल. चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ ते राजकारणात होते आणि पंचवीसपेक्षा अधिक काळ त्यांनी महत्वाची पदे भूषविली. ते उत्तम वक्ते आणि लेखक होते. त्यांची विचारप्रवर्तक भाषणे सह्याद्रीचे वारे आणि युगांतर या ग्रंथांतून संगृहीत केलेली आहेत. याशिवाय कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. 25 नोव्हेंबर 1984 रोजी यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – काही काळापासून अडकलेल्या फायली आणि प्रकल्पांना आता गती मिळेल. आजचा दिवस तुमचा कठीण मार्ग सोपा करेल. तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रभावी आणि नवीन प्रतिमा तयार करतील. आर्थिक लाभाच्या उत्कृष्ट संधी आज दार ठोठावू शकतात. मात्र कोणतेही ऑनलाइन पेमेंट किंवा डिजिटल गुंतवणुकीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगा.
वृषभ – आज व्यावसायिक जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडतील. प्रगतीच्या मार्गावर राहण्यासाठी, कार्यालयीन राजकारणापासून दूर रहा. कामात काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल विचार करणे फायदेशीर ठरेल. अतिशय हुशारीने कोणतेही जुने आर्थिक वाद किंवा न्यायालयीन प्रकरणे सोडवू शकाल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा.
मिथुन – व्यावसायिक दृष्टिकोनातून, टीमसोबत एकत्र काम करणे सर्वात फायदेशीर ठरेल. ऑफिसचे वातावरण सकारात्मक राखण्यासाठी संघर्षाऐवजी सुधारणा करण्यावर भर द्या. सहकाऱ्यांच्या चुका सांभाळून घ्या. आर्थिक बाबींमध्ये पूर्ण पारदर्शकता राखणे ही आज तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. जुन्या मित्रांकडून किंवा जवळच्या नातेवाईकांकडून अनपेक्षित आर्थिक मदत मिळू शकते.
कर्क – दीर्घकाळापासून रखडलेले प्रकल्प आज यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात. सहकाऱ्यांची सहकार्याची भूमिका ध्येय साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कोणालाही पैसे उधार देऊ नका. अनपेक्षित खर्च किंवा कर-संबंधित गुंतागुंत निर्माण होऊ शकते. भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनावश्यक खर्च टाळून बजेटवर विचार करणे शहाणपणाचे ठरेल.
सिंह – कठोर परिश्रम आणि समर्पणाला आज योग्य ती मान्यता मिळेल. निरुपयोगी चर्चांमध्ये ऊर्जा वाया घालवण्याऐवजी काहीतरी नवीन आणि सर्जनशील करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमची बुद्धिमत्ता आज तुमच्या करिअरला नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकते. आर्थिक परिस्थिती स्थिर आणि मजबूत राहील. मात्र आज शेअर बाजार किंवा कोणत्याही धोकादायक गुंतवणुकीपासून पूर्णपणे दूर राहणे हिताचे ठरेल.
कन्या – करिअरच्या बाबतीत आज संयम राखण्याची विशेषतः आवश्यकता आहे. नोकरीत कोणतेही मोठे बदल किंवा नवीन सुरुवात करण्यापूर्वी थोडा वेळ वाट पाहणे शहाणपणाचे ठरेल. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, परंतु घरातील फर्निचर किंवा वाहन दुरुस्तीवर अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्य आणि खाण्यावरील खर्चाकडे लक्ष द्या.
हेही वाचा – सौंदर्याचा सुवर्णपाश!
तुळ – आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची आणि नवीन जबाबदारी मिळू शकते. त्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची उदार वृत्ती आणि कामाची पद्धती रखडलेली कामे सोडवण्यासाठी आश्चर्यकारकपणे सहाय्यभूत ठरेल. मोबाइल फोन किंवा इंटरनेटवरील तांत्रिक बिघाड काही आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळा आणू शकतात. त्यामुळे मोठे व्यवहार करताना सावध राहा.
वृश्चिक – कामाच्या बाबतीत स्पष्टता आणि सत्यता ठेवा. मालमत्ता किंवा रिअल इस्टेटशी संबंधित जुने प्रश्न सोडवण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. वरिष्ठांकडून मिळालेला पाठिंबा तुमच्या क्षेत्रात तुम्हाला आणखी शक्तिशाली बनवेल. त्यामुळे तोंडावर आणि रागावर ताबा ठेवा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. योग्य बचतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
धनु – आजचा दिवस तुमच्या मूळ कल्पनांना एक नवीन ओळख देईल. तुमच्या नेतृत्व कौशल्याची कामाच्या ठिकाणी सर्वत्र प्रशंसा केली जाईल. भूतकाळातील कटू आठवणी विसरून नवीन उर्जेने कामावर लक्ष केंद्रित करणे हे तुमच्या यशाचे गमक आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. महत्त्वाची कागदपत्रांची पूर्ती करताना संयम आणि सावधगिरी बाळगा.
मकर – शिस्त आणि कामातील समर्पण यामुळे कोणत्याही कठीण परिस्थितीवर तुम्ही सुरक्षितपणे मात करू शकाल. परदेशी संपर्क किंवा परदेशी कंपन्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. वाद टाळणे आणि तुमचे काम शांततेत पूर्ण करणे हा तुमचा सर्वात मोठा विजय असेल. कोणताही प्रलंबित निधी किंवा जुनी थकित देयके मिळू शकतात. अनपेक्षित खर्च तुमच्या बजेटवर थोडासा परिणाम करू शकतो, म्हणून आर्थिक व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्या.
कुंभ – आज, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही चर्चेचा मुख्य विषय असाल. तुमचे तर्क आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येक आव्हानाला सोपे बनवेल. व्यावसायिक स्थिती सुधारण्यास योग्य अशा उच्च संधी उपलब्ध होतील. आज जुन्या गुंतवणुकीमुळे अनपेक्षित उत्पन्न मिळू शकतो. तथापि, उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार करणे फायदेशीर ठरेल.
मीन – तुमचे यश शिस्त आणि नियमांचे पालन करण्यामध्ये आहे. तुमच्या कारकिर्दीला आज बळकटी मिळेल. पूर्वी हुकलेल्या एक-दोन संधी पुन्हा उपलब्ध होऊ शकतात. आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून संतुलित असेल. गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यांची नीट तपासणी करा. संयुक्त प्रयत्न किंवा तांत्रिक कामातून संपत्ती वाढण्याची चिन्हे आहेत.


