दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 08 मार्च 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 17 फाल्गुन शके 1947; तिथि : पंचमी 21:10; नक्षत्र : स्वाती 13:30;
- योग : ध्रुव 07:03; करण : कौलव 08:10;
- सूर्य : कुंभ; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:54; सूर्यास्त : 18:45;
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण;
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
रंगपंचमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!
दिनविशेष
प्रसिद्ध कवी, कथा-कादंबरीकार, नाटककार चिं. त्र्यं. खानोलकर
टीम अवांतर
प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार आणि नाटककार तसेच ‘आरती प्रभु’ या नावाने कवितालेखन करणारे चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म 8 मार्च 1930 रोजी बागलांची राई (ता. वेंगुर्ले, जि. रत्नागिरी) इथे झाला. ‘गुरूकुल’ (लोणावळा), आकाशवाणीचे मुंबई केंद्र आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणी 1959 ते 1965 या कालखंडात त्यांनी नोकऱ्या केल्या. त्यानंतर मात्र केवळ लेखनासच वाहून घेतले.
जोगवा, दिवेलागण, नक्षत्रांचे देणे यासारखे कवितासंग्रह, रात्र काळी घागर काळी, अजगर, कोंडुरा, त्रिशंकू यासारख्या कादंबऱ्या, एक शून्य बाजीराव, सगेसोयरे, अवध्य, कालाय तस्मै नमः यासारखी नाटके तर सनई, गणुराया आणि चानी, राखी पाखरू सारखे कथासंग्रह अशा साहित्याची निर्मिती त्यांनी केली. शिवाय बालगीते (गोपाळ गाणी), ललितनिबंध (वारा वाहे रुणझुणा) आणि व्यक्तिचित्रे (दीपमाळ) असेही लेखन त्यांनी केले आहे. याव्यतिरिक्त रंगभूमीवर आलेली सुमारे 15 ते 20 नाटके आणि दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या अनेक दीर्घकथा आणि कादंबऱ्या असेही खानोलकरांचे लेखन आहे.
आधुनिक पाश्चात्य विचारसरणी किंवा कलाविष्कार यांचे प्रत्यक्ष संस्कार खानोलकरांच्यावर नसूनही आधुनिक जाणिवेची अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात आढळतात. त्यामुळे नव-अनुभववाद, अस्तित्ववाद किंवा व्यस्ततावाद अशा कुठल्यातरी विचारसरणीत त्यांना बसविण्याचा प्रयत्न टीकाकार करतात.
हेही वाचा – कपालभाती अभ्यासातून निरामय आरोग्य
महाराष्ट्र शासनाची आठ पारितोषिके त्यांच्या विविध साहित्यकृतींना मिळाली. 1964 मध्ये ‘रायटर्स सेंटर’ या संस्थेतर्फे लेखनसंकल्प पुरे करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांची अभ्यासवृत्ती देण्यात आली. ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ने दशावतार या लोकनाट्यप्रकाराच्या अभ्यासासाठी त्यांना संशोधन-शिष्यवृत्ती दिली (ऑक्टोबर 72 ते सप्टेंबर 74). कालाय तस्मै नमः या त्यांच्या नाट्यकृतीचे 1972 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून आकाशवाणीतर्फे निवड झाली. तिचा सर्व भारतीय भाषांत अनुवाद करण्यात आला. अशा या चतरस्त्र व्यक्तिमत्वाचे 27 एप्रिल 1976 रोजी निधन झाले.


