Wednesday, February 18, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 18 फेब्रुवारी 2026

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 18 फेब्रुवारी 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 18 फेब्रुवारी 2026; वार : बुधवार
  • भारतीय सौर : 29 माघ शके 1947; तिथि : प्रतिपदा 16:57; नक्षत्र : शततारका 21:15
  • योग : शिव 22:44; करण : बालव 28:31
  • सूर्य : कुंभ; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 07:06; सूर्यास्त : 18:38
  • पक्ष : शुक्ल; मास : फाल्गुन; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

सौर वसंत ऋतू आरंभ

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. अचानक एखादे गुंतागुंतीचे काम पूर्ण झाल्याने तुमच्यासमोरील अडथळे दूर होतील. आर्थिक फायदा होईल. व्यवसायात नवे करार करताना समोरच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, सावध राहा. नोकरदारांवरी कामचा ताण वाढेल, मात्र सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

वृषभ – नोकरीच्या ठिकाणी एखादे अधिक महत्त्वाचे आणि तातडीचे काम तुम्हाला पूर्ण करायला दिले जाऊ शकते. कोणतीही कारणे न देता कर्तव्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मात्र या सगळ्यात मानसिक आरोग्य चांगले कसे राहील याचाही विचार करा. कार्यालयात बोलताना जिभेवर ताबा ठेवा, एखादा चुकीचा शब्द अडचणी निर्माण करू शकतो. व्यवसायात नेहमीप्रमाणेच कामगिरी राहील.

मिथुन – काम करण्याचा तुमचा दृष्टिकोन नाविन्यपूर्ण असेल. गुंतागुंतीची कामेही सहजतेने पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. कामाचा धडाका पाहून वरिष्ठ खूश होतील. व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. तब्येतीची काळजी घ्या. पथ्यपाणी सांभाळा. योग आणि ध्यान धारणा अवश्य करा.

कर्क – नोकरीच्या ठिकाणी आज तुमच्याकडे एखादी मोठी आणि अवघड जबाबदारी  सोपवली जाईल. ज्यामुळे तुम्हाला कामातून विश्रांती घेणे काहीसे कठीण होईल. व्यावसायिकांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. तुमच्या व्यवसायाची गुपिते प्रतिस्पर्ध्यांपर्यंत जाणार नाहीत, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च टाळा, बचतीवर भर द्या.

सिंह – एखाद्या प्रस्थापित क्षेत्रात घुसून तुमचे वर्चस्व सिद्ध करण्याची तुम्हाला जुनी सवय आहे. यामुळे आज इतरांकडून तुमच्यावर टीका होऊ शकते. आज नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीबरोबरच एखादी मोठी जबाबदारी सोपविली जाईल. त्यासाठी सहकारी तसेच वरिष्ठांकडून पाठबळ मिळेल. व्यवसायिकांना एखादे मोठे काम मिळेल. कुटुंबात वातावरण प्रसन्न राहील.

कन्या – सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी वाद घालण्याचे टाळा, अन्यथा गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसायात आणि व्यापारात येणाऱ्या चढ-उतारांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेणे शहाणपणाचे ठरेल. मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होणाऱ्या काही घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांतपणे परिस्थिती हाताळावी लागेल.

हेही वाचा – दिसलीस तू फुलले ऋतू…

तुळ – नोकरीच्या ठिकाणी वातावरण काही काळ तणावपूर्ण असेल. नंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल. अडथळ्यांनंतरच घरातील दैनंदिन कामे पूर्ण होतील. आजही व्यवसायात चढ-उतार अनुभवायला मिळतील. भागीदाराशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावा. आज जंक फूड खाणे टाळावे.

वृश्चिक – नकळतपणे एखाद्या कठीण प्रसंगात सापडू शकता. मात्र, शांतपणे, संयम राखत त्यातून मार्ग काढू शकता. आज तुम्हाला व्यवसायिक गुंतागुंतीला तोंड द्यावे लागणार आहे. गुंतवणूक करताना पूर्ण विचार करूनच जोखीम स्वीकारा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रकृतीची काळजी घ्या. आज भरपूर प्रमाणात पाणी प्या.

धनु – शेअर बाजारात पैसे चुकीच्या पद्धतीने गुंतवून नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. व्यवसाय मार्गावर परत आणणे आणि दररोज होणारे नुकसान टाळणे यावर सध्या लक्ष केंद्रित करा. नोकरदारांनाही कठोर मेहनतीनंतरच त्याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. नोकरीत बदल संभवतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मकर – आज तुम्ही सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असाल. खूप कामे हातावेगळी करावी लागतील. अर्थात तुमच्या जितक्या वेगाने कामे व्हावीत असे वाटत असेल तितकी  लवकर ती पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे दिवस अखेरीस चिडचिड होऊ शकते. रागावर ताबा ठेवा, परिस्थिती बिकट होणार नाही, याची काळजी घ्या.

कुंभ – प्रदीर्घ मानसिक संघर्षानंतर, तुम्हाला काही वेळ एकटे राहण्याची गरज भासू शकते. अस्थिर मानसिकतेमुळे कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होईल. शक्य असेल तितका वेळ ध्यानधारणा आणि योगासने करा. घरचे ताजे, सकस अन्न घ्या. आधुनिक तंत्रज्ञान शिकून घेणे काळाची गरज आहे, अन्यथा तुम्ही काळाच्या मागे रहाल.

मीन – पैसे कमवण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग तुम्हाला दिसतील. तुमचे सहकारी आणि भागीदार कदाचित त्याबाबत असहमत असतील. त्यामुळे त्यांचे म्हणणे नेमके काय आहे ते शांतपणे ऐकून घ्या आणि मगच तुमचे म्हणणे मांडा. नोकरदार जातकांना आज कामाचा ताण जास्त असेल. मात्र अंगभूत गुणांमुळे ते काम वेळेत हातावेगळे कराल. त्यासाठी वरिष्ठ तुमची प्रशंसादेखील करतील.


दिनविशेष

प्रसिद्ध चित्रकार नारायण बेंद्रे

टीम अवांतर

चतुरस्त्र प्रतिभेचे श्रेष्ठ चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1910 रोजी इंदूर (मध्य प्रदेश) येथे झाला. 1933 साली त्यांनी आग्रा विद्यापीठाची बी. ए. पदवी मिळविली. याच काळात इंदूर येथील ‘स्टेट स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दत्तात्रय दामोदर देवळालीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कला शिक्षणही घेतले. या कलासंस्थेवर बंगालच्या शांतिनिकेतन शैलीचा आणि मुबंईच्या कलासंप्रदायाचा प्रभाव होता. या दोन्ही शैलींप्रमाणेच बेंद्रे यांच्यावर ब्राक फ्रेंच चित्रकाराचाही दाट प्रभाव होता. याशिवाय, आदिम कलेपासून ते चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेषही त्यांनी आत्मसात केले.

1934 साली त्यांनी त्यावेळच्या मुंबई सरकारची ‘कला पदविका’ मिळविली. नंतरची दहा वर्षे त्यांनी भारतातील अनेक चित्रपटप्रदर्शनांत भाग घेऊन बक्षिसे मिळविली; त्यात बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक आणि सुवर्णपदक. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा करंडक, पटेल करंडक, राज्यपाल पारितोषिके आणि इतर अनेक रोख बक्षिसे त्यांना मिळाली. 1969 साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब दिला तर, 1974 साली ललित कला अकादमीतर्फे सन्मान्य सदस्यत्व (फेलोशिप) बहाल करण्यात आले. गुजरात आणि मध्य प्रदेश शासनानेही ताम्रपत्र देऊन त्यांचा गौरव केला. 1984मध्ये त्यांना विश्व भारती विद्यापीठाकडून ‘अबान-गगन पुरस्कार’ आणि त्याच वर्षी ‘कालिदास सन्मान’ मिळाला.

हेही वाचा – Bookshelf : अर्थपूर्ण जगण्याचा दृष्टीकोन देणारे Man’s search for meaning

बेंद्रे यांनी 1936 ते 39 या काळात काश्मीर सरकारच्या अभ्यागत कार्यालयात (व्हिजिटर्स ब्यूरो) कलावंत-पत्रकार या नात्याने काम केले. 1940 साली मद्रास येथे त्यांनी एका चित्रपटाचे कलादिग्दर्शन केले. 1947 ते 1950 या कालावधीत त्यांनी ग्रेट ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, हॉलंड, पश्चिम जर्मनी, इटली, इजिप्त, लेबानन, जॉर्डन, इराक, इराण, अफगाणिस्तान आणि जपान या देशांना भेटी देऊन तेथील कलासृष्टीचा अभ्यास केला. तसेच न्यूयॉर्क येथील ‘आर्ट स्टुडंट्‌स लीग’मध्ये आर्मीन लॅंडेक या कलातज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आरेख्यक कलेचा अभ्यास केला. प्रवासात असताना काही देशांमध्ये त्यांनी आपल्या कलाकृतींची प्रदर्शने आयोजित केली. 1952 साली भारतातर्फे चीनमध्ये गेलेल्या पहिल्या सांस्कृतिक प्रतिनिधिमंडळामध्ये चित्रकार म्हणून बेंद्रे यांचा समावेश होता. ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’चे तीन वर्षे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष म्हणून दिल्ली येथील राष्ट्रीय कला-अकादमीच्या ललित कला शाखेचे, तसेच ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे कार्य त्यांनी केले. बेंद्रे यांनी बडोदे (गुजरात) येथे महाराजा सयाजीराव विद्यापीठामध्ये चित्रकला विषयाचे प्राध्यापक व नंतर ललित कला विद्या शाखेचे अधिष्ठाता या नात्याने कार्य केले. बडोद्यातून निवृत्त होऊन ते मुंबई येथे स्थायिक झाले. आणि व्यावसायिक चित्रकार म्हणून काम करू लागले. 18 फेब्रुवारी 1992 रोजी त्यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!