Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 फेब्रुवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 फेब्रुवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 15, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्राजक्ता अनंत काथे

    (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)

    मेष

    या आठवड्यात सगळी कामे ठरल्याप्रमाणे पार पडतील. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. कामे होणार नाहीत, वेळ वाया जाईल, म्हणून कोर्टाची कामे पुढे ढकला. व्यावसायिक वर्गाने अनावश्यक ठिकाणी पैसा तसेच वेळ घालवू नये. कामानिमित्त प्रवास कराल. महिला नवीन जबाबदारी स्वतःहून घेतील आणि उत्तम रीतीने पूर्ण करू शकतील. विद्यार्थ्यांचे मित्र-मैत्रिणींबरोबर वैचारिक वाद होण्याची शक्यता आहे.


    वृषभ

    या आठवड्यात अमावस्या तुम्हाला लाभदायक ठरेल. गुरूचा जप करत रहा. नोकरदारांना धनस्थानातील गुरूच्या प्रभावाने पगारवाढ आणि इतर मार्गांनी पैसा मिळेल. त्यामुळे गुंतवणूक करू शकाल. व्यावसायिक वर्गाने जमीन खरेदी-विक्री करताना सावधान राहावे. कागदपत्रे नीट तपासून घ्या. महिलांनी अमावस्येच्या दिवशी, 17 तारखेला नामस्मरण आणि दानधर्म करावे, मानसिक समाधान मिळेल. मित्रांना दिलेले उसने पैसे विद्यार्थ्यांना परत मिळतील.


    मिथुन

    या आठवड्यात अनावश्यक प्रवास टाळा. कोर्ट-कचेरीच्या कामातील प्रगतीमुळे मानसिक शांतता मिळेल. नोकरदारांची अडकलेली कामे मार्गी लागतील, नवीन उमेद निर्माण होईल. व्यावसायिक वर्गाला अमावस्या त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. महिलांच्या बाबतीत भावंडांत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. पण खर्च जास्त होईल.


    कर्क

    चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. या आठवड्यात चंद्र बलहीन आहे म्हणून मानसिक चिंता आणि भय लागून राहील. नोकरदारांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन पैसा गुंतवा. व्यावसायिक वर्गाने पार्टनरच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा, फायद्यात राहाल. महिलांना वैवाहिक समस्या त्रास देतील. सासरच्या मंडळींशी संयमाने वागावे. विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे टाळून, घरचे जेवण घ्या.


    सिंह

    या आठवड्यात अमावस्या त्रासदायक आहे. नोकरदारांनी वरिष्ठांबरोबर वाद घालू नये. हितशत्रू त्रास देतील. राग आणि अहंकारावर ताबा ठेवा. व्यावसायिक वर्गाने नवीन आलेला स्टाफ विश्वासू आहे का, ते तपासून घ्यावे. महिलांचा जोडीदाराबरोबरचा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. सांभाळून बोला, फार ताणू नका. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालावेत. सूर्याची उपासना फायद्याची ठरेल.

    हेही वाचा – पडू आजारी मौज हीच वाटे भारी…


    कन्या

    या आठवड्यात मुलांविषयी काळजी राहील. नोकरदारांनी नको ते धाडस करू नये. नेहमीच्या पद्धतीने कामे पूर्ण करा. औषधोपचारांवर खर्च होईल. व्यावसायिक वर्गाने अमावस्येला दानधर्म करावा. कामगारांच्या गरजा ओळखून मदत करावी. महिलांनी नातेसंबंध जपावेत. जोडीदाराची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी पाळीव प्राण्यांपासून लांब रहावे.


    तुळ

    हा आठवडा संमिश्र घटनांचा काळ आहे. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार शक्यतो टाळा. नोकरदारांनी नवीन कर्ज घेणे टाळावे. अतिरिक्त कामाचा मोबदला मिळणार नाही. व्यावसायिक वर्गाने कागदपत्रांवर सही करताना काळजी घ्यावी, बारकाईने कागदपत्रे वाचून घ्यावेत. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी. महिलांना आरोग्यविषयक त्रास होईल, पथ्य पाळावीत. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी, तरच यश मिळेल.

    वृश्चिक

    या आठवड्यात छोटे प्रवास होतील. प्रवासात वस्तू सांभाळा. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. त्यामुळे घरी वाद घालू नका. पत्रकार असलेल्यांसाठी चांगला काळ आहे. व्यावसायिक वर्गाने वाद घालू नये. मोठ्यांशी उद्धटपणे वागू नये. शांततेत निर्णय घ्या. महिलांचे भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांबरोबर वाद टाळा. विद्यार्थ्यांना मेहनत करणे गरजेचे आहे, हे लक्षात ठेवावे. वेळेचे नियोजन करा.


    धनु

    या आठवड्यात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरदारांनी बोलताना विचार करून बोलावे. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत भागीदारीतील व्यवसाय उत्तम प्रगती करेल. प्रवास करावा लागेल. एखादी धार्मिक सहल करू शकाल. बाहेरील खाद्यपदार्थ टाळा, विषबाधा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील शाब्दिक वादविवादांमुळे महिलांना मानसिक त्रास होईल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सूर्यनमस्कार घालावेत.


    मकर

    या आठवड्यात सांभाळून बोला. चिडचिड करू नका. नोकरदारांच्या दृष्टीने एकूण ग्रहमान ठीक नाही. तब्येतीच्या कुरबुरी असतील. जुने आजार डोके वर काढतील. काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न सुटतील. जुनी येणी वसूल होतील. नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांनी सात्विक आहार घ्यावा, अन्यथा पोटाचे आजार उद्भवू शकतात. विद्यार्थ्यांचे भावंडांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.


    कुंभ

    या आठवड्यात मानसिक अशांतता राहील. नोकरदारांनी कुणाच्या आश्वासनाला बळी पडू नये. संततीबाबत चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक वर्गाने पैशाचे मोठे व्यवहार टाळावेत. गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. घरातील समस्यांमुळे महिलांच्या मनात सतत नकारात्मक विचार येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि परीक्षेत यश मिळेल.

    हेही वाचा – ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य


    मीन

    या आठवड्यात फार धावपळ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांनी महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. स्वतःची कामे स्वतः करा, दुसऱ्यावर विसंबून राहू नका. व्यावसायिक वर्गाने कर्जाची परतफेड करावीत. परदेशी प्रवास संभवतो. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी. 17 तारखेला दानधर्म करा. विद्यार्थ्यांनी चांगल्या संगतीत रहावे, स्पष्ट बोला.


    prajaktakathe3970@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मे 2026

    May 28, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    By Team AvaantarMay 30, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 09…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मे 2026

    May 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मे 2026

    May 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    स्मृतीगंध… मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 313
    • अवांतर 187
    • आरोग्य 114
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 436
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 663
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026
    Most Popular

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.