Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » दिसलीस तू फुलले ऋतू…
    ललित

    दिसलीस तू फुलले ऋतू…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, राज सोनिया, राज सोनिया विवाह, राजची कानातले खरेदी, 100 नंबरी सोने, राजची सोनियाला पसंती, राजसाठी आत्याचा पुढाकार, ज्वेलर्समधील सोनिया, राजची सोने खरेदी, सोनिया आणि राज,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिलीप कजगांवकर

    निळ्या रंगाची पॅन्ट, पांढरा शर्ट, ब्लेझर, पॉलिश केलेले बूट आणि आकर्षक चष्मा घातलेल्या रुबाबदार तरुणाने पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील प्रख्यात ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. सेल्स मॅनेजरने “या सर” असे म्हणत मोठ्या आपुलकीने त्याचे स्वागत केले.

    “सर, काय घ्यायचे आहे आपल्याला?”

    “कानातली रिंग,” तो तरुण उत्तरला.

    “मैत्रिणीसाठी?”

    “नाही, कुणीच तयार नाही माझ्याशी मैत्री करायला.”

    “बायकोसाठी?”

    “नाही, लग्न करायला मुलगीच मिळत नाही.”

    “आय कान्ट बिलिव्ह, कुणीही अगदी सहज तयार होईल हो तुमच्याशी लग्न करायला.”

    “आय मीन, मला आवडलेल्या मुली तयार होत नाहीत.”

    “किती आवडल्या आतापर्यंत?”

    “फक्त एकच…”

    हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी!

    “कशी हवी तुम्हाला?”

    गोरा वर्ण, मध्यम उंची, झीरो फिगर, गुलाबी साडी, शोल्डर कट, अतिशय प्रसन्न नि आकर्षक चेहरा असलेल्या सेल्स मॅनेजरकडे एकटक पाहत सर म्हणाले, “तुमच्यासारखीच!”

    “अहो, मी कानातल्या रिंगबद्दल विचारतेय…”

    “मीही रिंगबद्दलच सांगतोय, अगदी तुमच्या कानातल्या रिंगसारखी!”

    दोघेही खळखळून हसले.

    “असं करा, तुमचीच द्या.”

    “अहो, माझी वापरलेली कशी देऊ मी?”

    “अहो, तुमची नाही, अगदी तुमच्या रिंगसारखी, सेम टू सेम द्या.”

    “अगदी सेम नाही, पण यापेक्षा अजून सुंदर आणि लेटेस्ट डिझाइन दाखवते. हल्ली खूप मागणी आहे या डिझाइनला.”

    “मॅम, तुम्ही घालून दाखवा ना, म्हणजे मला नीट समजेल.”

    “हं, बघा आता…?” दोन्ही कानांत रिंग घालून मॅम म्हणाल्या.

    “कुठे बघू? तुमच्याकडे की रिंगकडे?”

    डोळ्यांनीच सरांना दटावत मॅमने विचारले, “तुम्हाला आवडली?”

    “दोन्हीही आवडल्या.”

    “करू पॅक?”

    “रिंग पॅक करता येईल हो, पण…”

    मॅम लाजल्या.

    “घरच्यांना आवडली नाही तर परत करता येईल का?” सरांनी विचारले.

    “एकीबद्दल विचारता की दोघींबद्दल?” मॅमनी विचारले.

    आता मात्र लाजण्याची पाळी सरांची होती. “खरंतर नो रिटर्न्स पॉलिसी आहे आमची, पण खास तुमच्यासाठी म्हणून ॲक्सेप्ट करू.”

    “कॉफी घेणार? आय मीन, घ्या ना,” मॅम आग्रही सुरात म्हणाल्या.

    “तुमच्या आग्रहाला नाही कसं म्हणायचं? चालेल, पण तुम्ही कंपनी देणार असाल तरच… आणि कॉफी कडू नको हं, तुमच्यासारखीच गोड हवी.”

    “सर, तुम्ही पण…” म्हणताना मॅमनी डोळे मिटून मान खाली घातली. खांद्यांवर विसावलेल्या केसांनी दोन्ही गालांवर स्थान पटकावल्याने मॅमच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली.

    “सोन्याच्या दुकानात काम करता, वेगवेगळ्या डिझाइन्सची मंगळसूत्रं विकता, पण स्वतः मात्र अजून मंगळसूत्र घातले नाही?” मिश्किलपणे सरांनी विचारलं.

    “आई-बाबा प्रयत्न करताहेत, पण तुमच्यासारखं मला कुणी मिळालं नाही… आय मीन, मलाही कुणी मिळालं नाही.”

    “मॅम, तुमचं दुकान खूप लकी आहे, मला 100 नंबरी सोनं मिळालं.”

    “मलाही अगदी ‘हवा होता तसा’ कस्टमर मिळाला. माझ्यासाठी ‘हा’ कस्टमर देव आहे.”

    बिलावर त्यांचा मोबाईल नंबर लिहून आणि स्पेशल डिस्काऊंट देऊन मॅमनी सरांना बाय करताना “सी यू सून” म्हटलं.

    “परत पुन्हा दुकानातच भेटायचं का?”

    “सोन्याला दुकानात आणि सोनियाला दुकानाबाहेर.”

    गोड हसत आणि हस्तांदोलन करत, अनपेक्षितपणे काहीतरी गवसल्याच्या आनंदात दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.

    सकाळी आठ वाजताच सरांचा फोन आला.

    “सोनिया, एका तासात भेटायचं का?”

    “का? काय झालं सर? कशासाठी? काही अर्जन्सी आहे का?”

    “अगं, माझ्या आत्याने एक स्थळ आणलंय. आत्या म्हणते मुलगी खूप गुणी आहे, सुंदर आहे, तू नाही म्हणूच शकणार नाहीस. अकरा वाजता जायचं आहे त्यांच्या घरी, शनिवार पेठेत. काल तू भेटलीस आणि मी स्वतःला हरवून बसलो. आता काय करावं? काही समजत नाही मला. तूच सांग, मी काय करू?”

    “सर, जा तुम्ही. आत्या म्हणतात ते काही चुकीचं नाही. पेठेतल्या मुली खरंच खूप सुंदर असतात. ती मुलगी पसंत पडेल तुम्हाला. देऊन टाका होकार.”

    “सोनिया, अगं माझ्या हृदयाचा होकार तुला आणि तुलाच आहे. तुला पण माझ्याबद्दल असंच वाटतं ना?”

    “सर, आम्हा सेल्समधल्या मुलींना सगळ्यांशी गोड बोलावं लागतं, पण ते तेवढ्यापुरतंच असतं. मी कुठली आले एवढी नशिबवान, तुमच्यासारखा राजपुत्र मिळायला? शिवाय माझे आई-वडील लव्ह मॅरेजला परवानगी देणार नाहीत, हे मला पक्कं माहीत आहे. सर, विसरा मला… आणि हो, तुम्हाला आजच्या कार्यक्रमासाठी आणि भावी जीवनासाठी ऑल द बेस्ट. लग्नाचे दागिने घ्यायला माझ्याकडे नक्की या हं.”

    सरांना बोलायचं होतं, पण सोनियाने फोन ठेवला.

    कधी नव्हे ती मुलगी आवडली होती, पण आज तिनेच गोड बोलत, पण स्पष्टपणे नकार दिला होता. मन तयार होत नव्हतं, पण तरीही सोनियाला विसरावं लागणार होतं. “बरं झालं, मृगजळ वेळीच लक्षात आलं,” म्हणत सरांनी छान कपडे परिधान केले नि मोठ्या उत्साहात ते आई-बाबांबरोबर मुलगी पाहायला गेले.

    जुनं पण सुबक, नीटनेटकं नि हवेशीर घर, मधाळ बोलणारे मुलीचे आई-वडील… फर्स्ट इम्प्रेशन मस्तच होतं. मुलगी तर नक्षत्रासारखी सुंदर होती. चहा-पोहे झाले, गप्पा-गोष्टी झाल्या.

    “तुम्हाला आत जाऊन बोलायचं असल्यास प्लीज जा,” दोघांच्या आई-बाबांनी सांगितले. ते दोघे आत गेले नि केवळ दोन मिनिटांतच परत आले.

    मुलीचा नकार दिसतोय, राजचे आई-बाबा आपापसात कुजबुजले.

    “बेटी, तुला राजला काही विचारायचं असेल तर विचार ना,” राजच्या आई म्हणाल्या.

    “राज, तूही आमच्या मुलीला काही विचारायचं असेल तर विचार.”

    “नको, त्याची काहीच गरज नाही. तुमच्या मुलीने मी इथे येण्याआधीच मला सांगितलं होतं “होकार दे”, म्हणूनच मी होकार देतो,” राज म्हणाला.

    “एकमेकांना पाहण्याआधी सांगितलं होतं?” दोघांचे आई-बाबा गोंधळले.

    “काल बाबांनी एक प्रोफाइल पाठवलं आणि सांगितलं, “उद्या रजा घे, मुलगा परफेक्ट मॅच आहे तुझ्यासाठी. उद्या सकाळी अकरा वाजता येणार आहे.” आणि काय तो योगायोग! त्यानंतर अर्ध्या तासात राज आमच्या दुकानात इयर रिंग्ज घ्यायला आला. मला ओळख पटली, म्हणून मी स्वतः त्याला अटेंड केलं आणि मी ठरवलं की पसंतीचा कार्यक्रम उरकून टाकू — राजला किंचितही कळू न देता.”

    हेही वाचा – समीर अन् अपर्णा… दैव जाणिले कुणी?

    “मला रिंग्ज आवडल्या, पण त्यापेक्षा जास्त आवडली रिंग्ज दाखवणारी, छान बोलणारी, मस्त दिसणारी, हुशार, हजरजबाबी नि सोन्याच्या दुकानातील सोन्यापेक्षाही मौल्यवान सोनिया.”

    “बाबा, पण हे प्रेमप्रकरण नाही हं. तुम्ही बोलावलेलं स्थळंच आहे,” म्हणत सोनियाने क्षणभर तिच्या आई-बाबांना, नंतर राजच्या आई-बाबांना आणि शेवटी राजला प्रदीर्घ मिठी मारत तिचा होकार न बोलताच दिला होता.

    “राज, तू कानातल्या रिंग्ज कोणासाठी आणायला गेला होतास?” आईने गुगली टाकला.

    राज क्षणभर गोंधळला, पण पटकन स्वतःला सावरत म्हणाला, “मला उत्तर द्यायला “फोन अ फ्रेंड” लाइफ लाइन वापरावी लागेल.” त्याने कुणाला तरी फोन लावला आणि फोन स्पीकरवर टाकत मदत मागितली.

    पलीकडून आलेलं उत्तर ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

    “तुला उद्या सोनियाला पाहायला जायचं आहे. तू तिला नाही म्हणूच शकणार नाहीस. मी सोनियाचा फोटो आणि दुकानाचं नाव पाठवून राजला सांगितलं — काहीतरी खरेदी करायची म्हणून दुकानात जाऊन बघ तिला,” सोनियाचं स्थळ सुचविणाऱ्या आत्याबाईंनी सांगितलं.

    “राज, पण कानातल्या रिंग्ज घ्यायचं तू कसं ठरवलंस?” आत्याबाईंनी प्रतिप्रश्न केला.

    “सोनियाच्या चेहऱ्याकडे नीट निरखून पाहता यावं, म्हणून मी कानातल्या रिंग्ज निवडल्या.”

    काल सोनियाकडून खरेदी केलेला तो लकी दागिना प्रेमाने सोनियाला देत राजनेही त्याचा होकार दर्शविला. टाळ्या वाजवत दोघांच्या आई-बाबांनी राज आणि सोनियाच्या होकारास दुजोरा दिला.

    “राज, तू तर माझ्यापेक्षाही एक पाऊल पुढे होतास,” राजला लटक्या रागाने चिमटा काढत, पण मोठ्या प्रेमाने त्याच्याकडे पाहत सोनिया म्हणाली.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026 ललित

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026 ललित

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    By सतीश बर्वेMay 30, 2026

    ध्यानीमनी नसताना त्याने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. “मिसिंग यु अ लॉट…” ते वाचून मी मनातल्या मनात…

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    स्मृतीगंध… मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 313
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 436
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 664
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026
    Most Popular

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.